Category: ठाणे

Thane news

सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध -प्रशांत ठाकूर

अशोक गायकवाड पनवेल : पनवेल विधानसभा मतदार संघात ज्या पद्धतीने आत्तापर्यत्त विकासाची कामे झाली. त्याच वेगाने येणाऱ्या काळात देखील तुम्हाला अपेक्षीत असलेली सर्व विकासाची कामे करण्यासाठी आपण ताकद द्यावी आणि…

मुरबाडमध्ये भाजपच्या कथोरेंना तुतारीची मिळतेय छुपी साथ ?

विशेष प्रतिनिधी मुरबाड: विधानसभेच्या निवडणूकीत सर्वाधिक लक्षवेधी ठरणाऱ्या मुरबाडमध्ये दरदिवशी चित्र बदलत आहे. खासदारकीच्या निवडणूकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाळ्या मामांना किसन कथोरेंनी मदत केल्यामुळेच भाजपाचे कपिल पाटील पडल्याचे म्हटले जात होते.…

ठाणे पोलिसांनो! २३ नोव्हेंबर नंतर सरकार कोणाचे येतेय, याची वाट बघा’

 जितेंद्र आव्हाडांचा ठाणे पोलीसांना इशारा   ठाणे : ” महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे उद्योग ठाणे पोलिसांकरवी सुरू करण्यात आले आहेत. पोलिसांनी आपल्या कार्यकर्तव्यानुसारच काम करावे. दबावाखाली येऊन कुणाच्याही हातचे बाहुले बनू नये. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे आपले काम आहे. पकडून आणून कोणालाही बसविणे, हे आपले काम नाही ” असा आशयाचा मजकूर ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मुंब्रा – कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे पोलिसांवर आरोप केला आहे. तर २३ नोव्हेंबरच्या निकालानंतर सरकार कोणाचे येतेय, याची वाट बघा जरा ” असा इशारा देखील त्यांनी पोलिसांना दिला आहे. तर तुम्ही सत्तेत असताना पोलिसांचा किती गैरवापर केला हे विसरलात का असे प्रतिउत्तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी आव्हाडांच्या ट्विटला केले आहे. विधानसभा निवडणुकांची प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र सुरु असताना राजकीय व्यासपीठावरून आपल्या विरोधी उमेदवारावर सर्व नेते मंडळींकडून टीकांची झोड उठवली जाते. तर सध्याच्या समाजमाध्यमांच्या जगात राजकीय नेत्यांकडून एक्स या समाज माध्यमांवरून विविध महत्वाच्या विषयांबाबत आपली भूमिका मांडत असतात. याच पद्धतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे पोलिसांवर ट्विट करून आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड मुंब्रा – कळवा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नजीब मुल्ला निवडणूक लढवत आहेत. यामुळे यंदाची निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. तर आव्हाड आणि मुल्ला या दोन्ही उमेदवारांकडून प्रचाराचा नारळ देखील फोडण्यात आला असून मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन देखील केले जात आहे. असे असतानाचा आता आव्हाड यांनी ठाणे पोलिसांवर महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्याचा आरोप केला आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे उद्योग ठाणे पोलिसांकरवी सुरू करण्यात आले आहेत. पोलिसांनी आपल्या कार्यकर्तव्यानुसारच काम करावे. दबावाखाली येऊन कुणाच्याही हातचे बाहुले बनू नये. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे आपले काम आहे. पकडून आणून कोणालाही बसविणे, हे आपले काम नाही ” असा आशयाचा मजकूर ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मुंब्रा – कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे पोलिसांवर आरोप केला आहे. तर २३ नोव्हेंबरच्या निकालानंतर सरकार कोणाचे येतेय, याची वाट बघा जरा ” असा इशारा देखील त्यांनी पोलिसांना दिला आहे. तुम्ही पोलिसांचा किती गैरवापर केला – आनंद परांजपे जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. कायदा व सुव्यवस्थेची भाषा करणारे तुम्ही सत्तेत असताना पोलिसांचा किती गैरवापर केलात ते विसरलात का? उदा. अनंत करमुसे ला स्वतःच्या बंगल्यात नेऊन केलेली मारहाण, ठाणे महानगरपालिका अधिकारी महेश आहेर यांना तुमच्या सहकाऱ्यांनी केलेली मारहाण, भाजपाच्या महिला पदाधिकारी रिदा रशीद यांना खोट्या पीटा व पोस्कोमध्ये अडकविण्याचे षडयंत्र. असा मजकूर ट्विट करत आव्हाडांना प्रतिउत्तर दिले आहे. यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये समाजमाध्यमांवर चांगलीच जुंपली असल्याचे दिसून येत आहे. ०००००

सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

ठाणे : सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार (सर्वसाधारण) किशोर मराठे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी,…

सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

ठाणे : सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार (सर्वसाधारण) किशोर मराठे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी,…

 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात

 भरारी पथकामार्फत 17 लाखांची रोकड जप्त   ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची आदर्श आचारसंहिता पालन करण्यासाठी विविध पथके कार्यरत असून, त्याअंतर्गत कार्यरत भरारी पथक क्र. 06 ने 31 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सुमारे 2.00 वाजता मोठी कारवाई केली. कल्याणकडून मुरबाडकडे वाहन क्र. MH05 DZ9911 हे जात असताना संशयास्पद वाटल्याने या वाहनाची तपासणी केली. त्यावेळी त्या वाहनात रु.17 लाख रोख रक्कम असल्याचे निदर्शनास आले. संबंधित वाहनचालकाची विचारणा केली असता, त्यांनी कोणताही ठोस पुरावा दिला नाही. त्यामुळे ही रक्कम जप्त करुन ती कोषागारात भरणा करण्यात आली व याबाबत आयकर विभागाला कळविले असून या प्रकरणी सखोल तपासणी सुरु आहे, अशी माहिती 141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विजयानंद शर्मा आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती कल्याणी मोहिते यांनी दिली आहे.

ठामपाचे सुका कचरा संकलनासाठी केंद्रे सुरु, प्रक्रिया करून होणार पुनर्निर्माण – मनीष जोशी

अनिल ठाणेकर ठाणे महानगरपालिकेले स्वच्छ सर्वेक्षण २०२४ या मोहिमेत पुनर्निर्माण अभियान हाती घेतले आहे. या अभियानात दीपावलीत जमा होणारा सुका कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने संकलन केंद्रे सुरू केली आहेत. ही संकलन केंद्रे सहा नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. या उपक्रमातून स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ठाणेकर नागरिक स्वच्छतेचा सकारात्मक संदेश देण्यात यशस्वी होतील असा, विश्वास उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी यांनी व्यक्त केला आहे. दिवाळीच्या काळात शहर स्वच्छ राहावे, तसेच, निर्माण झालेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, असा या पुनर्निर्माण अभियानाचा उद्देश आहे. दिवाळीमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या भेटवस्तूंसह इतर प्रकारची खरेदी होते. त्यामुळे इतर दिवशी निर्माण होणाऱ्या कचऱ्यासोबतच दिवाळी सणाच्या काळात जास्तीचा सुका कचरा निर्माण होतो. या कचऱ्याचे संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्याचे ठाणे महानगरपालिकेने ठरवले आहे. या अभियानासाठी महापालिका क्षेत्रात, परिसर भगिनी (स्त्री मुक्ती संघटना), समर्थ भारत व्यासपीठ, ऑंटी प्लास्टिक ब्रिगेड या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले आहे. हिरानंदानी इस्टेट, भूमी एकर, लोढा अमारा, हिरानंदानी वन, दोस्ती इम्पेरिया, सिद्धाचल, हिरानंदानी मेडोज या मोठ्या गृहसंकुलांसोबत, डी मार्ट टिकुजीनी वाडी येथेही सुक्या कचऱ्याचे संकलन केले जाणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सुमारे दररोज सुमारे ३० हजार घरापर्यंत हे अभियान पोहचवण्यात येईल. या काळात सुमारे २५० टन सुका कचरा गोळा होईल, असा अंदाज आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नितीन कंपनी उड्डाणपुलाखालील मुख्य संकलन केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेबाबतची माहिती घेतली. तसेच, स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. नागरिकांनी त्यांच्या जवळच्या संकलन केंद्रांवर सुका कचरा जमा करावा. त्यामुळे, स्वच्छता राखली जाईल आणि सुक्या कचऱ्यातून पुनर्निर्माण करणे शक्य होईल, असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले. तत्पूर्वी, संकलन केंद्रांमधील कचरा एकत्र केला जाणार असलेल्या मुख्य संकलन केंद्राचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी उपस्थित होते नागरिकांनी सुका आणि ओला कचरा याचे वर्गीकरण करून, सुका कचरा महापालिकेच्या या संकलन केंद्रात किंवा प्रभाग समिती कार्यालयात असलेल्या ‘आर आर आर’ केंद्रात द्यावा. या उपक्रमातून स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ठाणेकर नागरिक स्वच्छतेचा सकारात्मक संदेश देण्यात यशस्वी होतील असा, विश्वास उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी यांनी व्यक्त केला आहे.

ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथे ३१ ऑक्टोबर रोजी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात, माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी  यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय संकल्प दिन आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता…

भाजप उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांना मातृशोक

ठाणे: ठाणे शहर (जिल्हा) उपाध्यक्ष डॉ. राजेश मढवी यांच्या मातोश्री अनुराधा मुरलीधर मढवी यांचे बुधवारी रात्री  वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यु समयी त्या ८२ वर्षाच्या होत्या. भाजपच्या मा.नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी…

सुतिकागृह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पनवेलसाठी वरदान-अ‍ॅड. यशवंत भोपी

अशोक गायकवाड पनवेल : सुतिकागृह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हा दवाखाना पनवेलकरांसाठी वरदान ठरत आहे. सर्व शासकीय योजनांचा लाभ या ठिकाणी मिळत आहे अशी माहिती अ‍ॅड. यशवंत भोपी यांनी दिली. आजच्या धकाधकीच्या जीवनात दवाखाना आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. त्यात सर्व सुविधायुक्त,स्वच्छ,उत्तम निदान होणारे व परवडणारे असे दवाखाने लाभणे ही दुर्मिळ गोष्ट बनलेली आहे. अशा युगात पनवेलकरांना सर्व आरोग्य सुविधा देणारा सुतिकागृह दवाखाना नव्या रूपात सुसज्ज इमारतीमध्ये चालू झालेला असून तिथे सुतिकागृहासह अनेक रोगांवर उत्तम प्रकाराने सज्ज असे शुश्रुषा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तयार झालेले आहे. अलीकडेच या दवाखान्याची नवीन वास्तू आपल्या सेवेसाठी कार्यान्वित झालेली असून या ठिकाणी आयसीयू पासून लॅप्रोस्कोपी सारख्या अनेक रोगांवर उत्तम सुविधा उपलब्ध आहेत. पूर्वीच्या( जुने पोस्ट ऑफिस पनवेल )जवळ सुतीकागृह म्हणून नावाजलेल्या या दवाखान्यास यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. नव्या रूपात साकार झालेला हा दवाखाना दोनच वर्षात पनवेलकरांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. या दवाखान्यात दोन नातेवाईकांना उपचारासाठी घेऊन जाण्याचा योग आला. तेथील उपचार सुविधा,कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व झालेली शस्त्रक्रिया पाहून हा लेख लिहिण्याचा मोह आवरला नाही. अजूनही अनेक लोकांना ह्या दवाखान्याची माहिती नसावी असे दिसते.त्यामुळे पनवेलच्या मध्यवर्ती असलेल्या या दवाखान्याचा लाभ व अनुभव गरजू जनतेने घ्यावा असे जनतेस आवाहन आहे. येथील डॉक्टर अंजली मॅडम तसेच डॉक्टर स्वप्नील वाघ व जनसंपर्क अधिकारी चांदसर हे आरोग्य सेवेसाठी तत्पर असून थोड्याच अवधीत त्यांनी दवाखान्याचे नावलौकिक वाढविले असून सदरचा दवाखाना जनतेसाठी वरदान ठरत आहे. सर्व शासकीय योजनांचा लाभ या ठिकाणी मिळत आहे हे आणखी एक विशेष आहे असे अ‍ॅड. यशवंत भोपी यांनी सांगितले. 0000