Category: ठाणे

Thane news

जितेंद्र आव्हाड तुम्ही प्रचार करू नका, तुमचे काम बोलतयं

कळवा-खारेगाव संकुल पदाधिकाऱ्यांचे आव्हाडांना पत्र ठाणे : राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघामध्ये जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला असा सामना रंगला असतानाच, या मतदार संघातील कळवा- खारेगाव भागातील गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हाड यांना पाठविलेले पत्र सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे. त्यात जितेंद्र आव्हाड तुम्ही प्रचार करू नका…तुमचे काम बोलतय अशा आशयाचा मजकूर आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर ठाणे जिल्ह्यातही पक्षात उभी फुट पडली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांची साथ दिली तर, आव्हाड यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी अजीत पवार यांची साथ दिली. तेव्हापासून या दोन्ही गटात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची लढाई सुरू आहे. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातून जितेंद्र आव्हाड हे तीनदा निवडुण आले आहेत. या मतदार संघातून राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडुण येतात. यामुळे हा परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हा बालेकिल्ला कोणात्या पवारांचा असेल, हे स्पष्ट होणार आहे. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षाने जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा निवडणकीच्या रिंगणात उतरविले आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी (अजीत पवार) या पक्षाने नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे येथे गुरू-शिष्याची लढाई होणार आहे. या दोन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्ती प्रदर्शन केले असून त्याचबरोबर दोन्ही नेते मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी मेळावे घेत आहेत. असे असतानाच, या मतदार संघातील कळवा- खारेगाव भागातील गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हाड यांना पाठविलेले पत्र सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे. त्यात जितेंद्र आव्हाड तुम्ही प्रचार करू नका…तुमचे काम बोलतय अशा आशयाचा मजकूर आहे. वास्तुआनंद, गोपीनाथ टाॅवर, चावंडाई रेसीडेन्सी, वेदांत पार्क, साई विहार, राज पार्क, वैष्णवीधाम, विराट, समृद्धी हाईट यासह इतर संकुलांनी असे पत्र आव्हाड यांना पाठविले आहे. काय म्हटलयं पत्रात… गेले अनेक दिवस आम्ही आपणास गल्लीबोळात प्रचार करताना पाहत आहोत. आपण मागील १५ वर्षे प्रामणीकपणे एवढे काम करीत आहात आणि आमच्या पारसिक परिसराचा विकास केल्यानंतर आपण गल्लीबोळात प्रचार करत फिरणे आम्हांला पाहवत नाही. तरी आपणास प्रचार करण्याची आवश्यकता नाही. आम्ही नागरीक आपणा सोबतच आहोत. त्यामुळे आमच्या सोसायटीने निर्णय घेतला आहे की आपणास एकमताने मतदान करणार. आपले प्रचारक आम्हीच आहोत. ही निवडणूक आता आम्ही आमच्या हातात घेतली आहे. ही निवडणुक आता लोकचळवळ झाली असुन केलेल्या कामाची पावती देण्याची हीच वेळ आहे, असे संकुलांच्या पत्रात मजकूर आहे.

ठाण्यातील सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित

ठाणे : ठाणे आयुक्तायल क्षेत्रातील सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांचे सायबर पोलीस ठाणे अखेर कार्यान्वित झाले आहे. नव्या पोलीस ठाण्यामुळे आता सायबर गुन्ह्यासंदर्भात तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. या पोलीस ठाण्यात सहा अधिकारी आणि ३० कर्मचारी असणार आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाजवळ हे पोलीस ठाणे बांधण्यात आले आहे. गेल्याकाही वर्षांमध्ये ठाणे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. त्याप्रमाणे गुन्ह्यांची प्रकरणे देखील वाढली आहेत. ठाण्यात दररोज सायबर गुन्हे घडत आहेत. शेअर मार्केटच्या नावाने फसवणूक, मोबाईलवर एखादी लिंक पाठवून बँक खाते रिकामे करणे, ऑनलाईन ‘टास्क’ देऊन आर्थिक फसवणूक करणे अशा प्रकरणांमध्ये फसवणुकीचे प्रमाण अधिक आहे. फसवणूक होणाऱ्यांमध्ये सर्वच वयोगटातील नागरिक आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र असे पोलीस ठाणे नव्हते. त्यामुळे सायबर गुन्हे शोध कक्षामार्फत पोलीस तपास करत होते. काही महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाजवळ सायबर पोलीस ठाण्याचे बांधकाम पूर्ण झाले होते. मंगळवारी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले. या पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सहा अधिकारी आणि ३० पोलीस कर्मचारी कार्यरत असणार आहे.

कल्याण ग्रामीणचा निर्णय वरिष्ठांचा!

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची स्पष्टोक्ती ठाणे –महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवार दिला जाणार नसल्याचे बोलले जात असतानाचा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने अखेरच्या यादीत कल्याण…

मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारताच ठाण्यातील बंड शमले

  ठाणे : ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्याविरोधात दंड थोपटत अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा करणारे शिंदे सेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे या दोघांनी शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केलेले नसल्यामुळे महायुतीमधील बंडखोरी टळली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोळे वाटारत महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिल्याने या दोघांनी निवडणूक लढायची नाही असा निर्णय घेऊन अर्ज दाखल केलेले नसल्याचे सुत्रांकडून समजते. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले शिंदेच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले होते. दादाचं काम बोलतय असे पोस्टर शहरभर झळकवून त्यांनी या मतदारसंघावर दावाही ठोकला होता. परंतु महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा भाजपला गेली. या मतदारसंघातून भाजपचे आमदार संजय केळकर हे दोनदा निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघाची जागा महायुतीच्या जागा वाटपामध्ये भाजपच्या वाट्याला गेली आणि भाजपने येथे संजय केळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. यामुळे भोईर हे नाराज झाले होते. त्याचबरोबर शिंदे सेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनीही संजय केळकर यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा करत बंडखोरी करण्याची तयारी सुरू केली होती. हे दोघे अपक्ष निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम होते. यामुळे ठाणे शहर मतदारसंघात बंड अटळ मानले जात होते. या बंडामुळे भाजप आणि महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली होती. शिंदे सेनेच्या नेत्यांकडून ठाणे शहरात बंडाची भाषा होऊ लागताच मतदारसंघाशेजारीच असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ देण्याची मागणी करत भाजपनेही दबावतंत्राचा अवलंब केला होता. असे असतानाच, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात भाजप इच्छुकांनी अपक्ष अर्ज दाखल केले नाहीत. तर, अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा करणारे शिंदे सेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे या दोघांनी शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केलेले नसल्यामुळे महायुतीमधील बंडखोरी टळली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोळे वाटारत महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिल्याने या दोघांनी निवडणूक लढायची नाही असा निर्णय घेऊन अर्ज दाखल केलेले नसल्याचे सुत्रांकडून समजते. कोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश दिले. त्यांचा शब्द अंतिम मानून निवडणूक लढवायची नाही असा निर्णय घेतला. – संजय भोईर, माजी नगरसेवक, शिवसेना (शिंदे गट) ०००००

भाजपा युवा व महिला मोर्चाने शिकविला सीईडीपी स्कील्ड इन्स्टिट्यूटला धडा!

ठाण्यातील ८ विद्यार्थीनींचे पैसे मिळवून दिले परत ठाणे : जनरल नर्सिंग कोर्स देण्याच्या नावाखाली सर्वसामान्य कुटुंबातील गरीब मुलींची फसवणूक करणाऱ्या ठाण्यातील बनावट सीईडीपी स्कील्ड इन्स्टिट्यूटला भाजपा महिला मोर्चाने धडा शिकविला आहे. फसवणूक झालेल्या ८ मुलींची १ लाख ६२ हजारांची रक्कम संस्थेने परत दिली आहे. या संस्थेवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुरज दळवी, समर्थ नायक व नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले यांनी केली आहे. सामान्य घरातील तरुण मुलींना लवकर रोजगार मिळवून देण्याचे आमिष दाखवून राममारुती रोडवरील सीईडीपी स्कील्ड इन्स्टिट्यूटने मुलींना प्रवेश दिले होते. प्रवेश घेताना महाराष्ट्रातील विद्यापीठाची अभ्यासक्रमाला मान्यता असल्याचे सांगण्यात आले. या अभ्यासक्रमाचे शुल्क म्हणून एका वित्तीय संस्थेकडून मुलींच्या कागदपत्रांची शहानिशा न करताच कर्ज मंजूर करुन संस्थेला दिले गेले. त्यानंतर या मुलींचे परराज्यातील बनावट विद्यापीठात प्रवेश करण्यात आल्यावर या प्रकाराला ८ मुलींनी आक्षेप घेतला. त्यांनी भाजपा मध्यवर्ती कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुरज दळवी, समर्थ नायक, नौपाडा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले, सरचिटणीस प्रशांत कळंबटे,गुलाब झा, कीर्ती शेट्टी, प्रसाद विश्वकर्मा,हिमांशू राजपूत यांनी इन्स्टिट्यूटमधील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर आठ मुलींनी प्रवेशावेळी जमा केलेली रक्कम १ लाख ६२ हजारांची रक्कम परत करण्यात आली. या इन्स्टिट्यूटवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी भाजपा महिला मोर्चाने केली आहे. त्याचबरोबर अशा फसवणूक करणाऱ्या शैक्षणिक संस्थांची सातत्याने तपासणी करुन कारवाईचा आग्रह धरला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि केळकर कुटुंबियांचे फार जुने संबंध – ना. रामदास आठवले

अनिल ठाणेकर ठाणे : संजय केळकर हे सर्वसामान्य लोकांशी संवाद ठेवणारे आमदार आहेत, प्रामाणिक आहेत तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि केळकर कुटुंबियांचे फार जुने संबंध आहेत. केळकरांना जास्तीत जास्त मतांनी…

नवी मुंबईत मतदार जागरुकतेच्या स्वीप कार्यक्रमांना वेग

नवी मुंबई : विधानसभा निवडणूक मतदार जागरुकता कार्यक्रमांतर्गत 150 ऐरोली व 151 बेलापूर या नवी मुंबईतील दोन विधानसभा मतदार संघ क्षेत्रात स्वीप कार्यक्रमांतर्गत मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये…

अपक्ष उमेदवार शैलेश वडनेरे यांचा मोठया जनसमुदाय सोबत उमेदवारी अर्ज दाखल

राजीव चंदने मुरबाड : मुरबाड विधानसभे मधे रंगत वाढणार, अपक्ष उमेदवार शैलेश वडनेरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्या नंतर अनेक मात्तबरांच्या भुवव्या उंचावल्या मुळे खरी लढत कोणाकोणात होणार अशी चर्चा…

दिवाळीच्या सणात मुंबईतील आशांची पणती मात्र कोरडी !

अनिल ठाणेकर ठाणे : दिवाळीच्या सणात मुंबईतील आशांची पणती मात्र कोरडी झाल्याने दिवाळी बोनस आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांसाठी सीएसटी समोरच्या बीएमसीच्या मुख्य गेटवर २९ ऑक्टोबर रोजी, मुंबई जिल्हा आशा व…

सर्व विधानसभा मतदारसंघातील माध्यम कक्षाचे कामकाज सुरळीत सुरू

जिल्हा माहिती कार्यालयामार्फत साधला जात आहे समन्वय ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील कामकाज समन्वयाने पार पाडण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी सज्ज झाले…