Category: ठाणे

Thane news

अपक्ष उमेदवार शैलेश वडनेरे यांचा मोठया जनसमुदाय सोबत उमेदवारी अर्ज दाखल

राजीव चंदने मुरबाड : मुरबाड विधानसभे मधे रंगत वाढणार, अपक्ष उमेदवार शैलेश वडनेरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरल्या नंतर अनेक मात्तबरांच्या भुवव्या उंचावल्या मुळे खरी लढत कोणाकोणात होणार अशी चर्चा…

दिवाळीच्या सणात मुंबईतील आशांची पणती मात्र कोरडी !

अनिल ठाणेकर ठाणे : दिवाळीच्या सणात मुंबईतील आशांची पणती मात्र कोरडी झाल्याने दिवाळी बोनस आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांसाठी सीएसटी समोरच्या बीएमसीच्या मुख्य गेटवर २९ ऑक्टोबर रोजी, मुंबई जिल्हा आशा व…

सर्व विधानसभा मतदारसंघातील माध्यम कक्षाचे कामकाज सुरळीत सुरू

जिल्हा माहिती कार्यालयामार्फत साधला जात आहे समन्वय ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील कामकाज समन्वयाने पार पाडण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी सज्ज झाले…

प्रतीक तुलसानीचे दुहेरी यश

ठाणे  ; ठाण्याच्या प्रतीक तुलसानीने राष्ट्रीय पातळीवर सलग दोन अजिंक्यपद मिळवत आपली छाप पाडली आहे. प्रतीकने गोव्यात झालेल्या १३ वर्षखालील मुलांच्या यूटीटी राशयात्री मानांकन टेबल टेनिस आणि त्यानंतर लगेचच हिमाचल…

शेकडो दिव्यांनी उजळले धर्मवीर आनंद दिघे यांचे शक्तीस्थळ

ठाणे : लाखो शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ दिवाळीच्या पहिल्या दिवशी शेकडो दिव्यांनी उजळून गेले.   दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस या दिवसाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव…

साईराम मित्र मंडळाच्या वतीने ठाणे ते शिर्डी सायकलयात्रा

ठाणे: साईबाबांचा जयघोष करत ठाण्यातून शेकडो साईभक्त सायकलवरून शिर्डीकडे रवाना झाले. ठाण्यातील नामदेवाडी ,पाचपाखाडी येथील साईराम मित्र मंडळाचा वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही ठाणे ते शिर्डी सायकल यात्रा आयोजित केली होती.…

मर्जिया पठाण यांनी उघडकीस आणला शैक्षणिक घोटाळा, बनावट युनिव्हर्सिटीच्या रॅकेटचा फर्दाफाश

गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होऊ देणार नाही – मर्जिया शानू पठाण ठाणे : शहरातून चालविले जाणारे बनावट फिजिओथेरपी शिक्षण देणारे एक रॅकेट राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय…

शिवाईनगरमध्ये मोफत आरोग्य, फिजिओथेरपी ॲक्युप्रेशर व ॲक्युपंक्चर शिबिर

समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी आणि स्थानिक  माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांच्या माध्यमातून अनिल ठाणेकर ठाणे : समाजसेवक भास्कर बैरीशेट्टी आणि स्थानिक माजी नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी यांच्या माध्यमातून शिवाईनगर परिसरामध्ये मोफत आरोग्य…

मुख्यमंत्री शिंदे, संजय केळकर, नजीब मुल्ला, केदार दिघे, संदीप पाचंगे यांचे उमेदवारी अर्ज दाखल

ठाण्यात ‘शक्तीप्रदर्शन’ ठाणे : वसुबारसच्या दिवसाचा मुहूर्त साधत शिवसेनेचे कोपरी पाचपखाडीतील उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे शहरातील भाजपचे उमेदवार संजय केळकर आणि कळवा-मुंब्य्रातील राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे उमेदवार नजीब मुल्ला या महायुतीच्या नेत्यांनी मिरवणुकांद्वारे शक्तीप्रदर्शन…

रतन टाटांचे स्वप्न साकारण्यासाठी युवा उद्योजक अर्जुन देशपांडेंचा पुढाकार

रास्त दरातील औषधांकरता राबवणार मिशन जेनरिक औषधे घराघरात ठाणे : दिग्गज भारतीय उद्योजक रतन टाटा यांच्या निधनानंतर सामाजिक दृष्टिकोन आणि भारतीयांना रास्त दरातील वैद्यकीय सेवा पुरवण्याचे त्यांचे स्वप्न साकारण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान युवा उद्योजक अर्जुन देशपान्डे यांनी स्वीकारले आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाला स्वस्त किमतीत औषधे मिळायला पाहिजेत या उद्देशाने वयाच्या १६ व्या वर्षी अर्जुन देशपांडे यांनी जेनरिक आधार या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली होती.रतन टाटा यांना आपले प्रेरणास्रोत मानून अर्जुन देशपांडे यांनी किफायतशीर किंमत असणाऱ्या जेनरिक औषधे उपलब्ध करून देण्यास प्रार्थमिक्ता दिली होती. अर्जुन देहस्पंडे यांना टेड टॉकच्या माध्यमातून रतन टाटा यांना भेटण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी देशपांडे यांनी आपला उद्देश आणि कल्पना त्यांच्यासमोर मंडळी होती. समाजाच्या कल्याणासाठी नेहमीच आग्रही पावले उचलणाऱ्या रतन टाटा यांनी देशपांडे यांच्या संकल्पना आर्थिक आणि नैतिक पाठबळ दिले होते. आपल्यासाठी रतन टाटा हि एक व्यक्ती नसून एक ऊर्जास्रोत होते.त्यामुळे त्यांचे स्वप्न साकारणे हाच आपला आता दृढसंकल्प असल्याचे अर्जुन देशपांडे यांनी सांगितले. महाराष्ट्रासह देशातील उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली आणि पंजाबच्या जोडीने १७ राज्यातील नागरिकांना स्वस्त दरातील औषधे अर्जुन देशपांडे पुरवत आहेत. हा आपल्यासाठी केवळ एक उद्द्योग नसून सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न आहे, असे अर्जुन देशपांडे म्हणाले. रतन टाटा आणि  अर्जुन देशपांडे या जोडीने भारतीय युवकांपुढे एक प्रेरणादायी उदाहरण कायम केले आहे. रतन टाटा यांच्या जयंतीच्या निमीत्ताने दृढ संकल्प आणि योग्य मार्गदर्शनामुळे कुठलेही स्वप्न प्रत्यक्षात उतरवता येते असा संदेश अर्जुन देशपांडे यांनी युवकांना दिला आहे.