Category: ठाणे

Thane news

 अंगणवाडी कर्मचारी करणार १ ऑक्टोबरला संपूर्ण राज्यात चक्का जाम !

 मानधनवाढ, ग्रॅच्युइटी, मासिक पेन्शनच्या मागण्यांसाठी ठाणे : मानधनवाढ, ग्रॅच्युइटी, मासिक पेन्शन या मागण्यांचा शासकीय निर्णय न झाल्यास अंगणवाडी कर्मचारी आक्रमक पवित्रा घेणार असून १ ऑक्टोबरला संपूर्ण राज्यात चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील या नेत्यांनी दिली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी २३ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचे पाऊल उचलले. २४ तारखेला मा महिला व बालविकास मंत्र्यांनी २६ तारखेला वित्त मंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करण्याचे व लगेच कॅबिनेटमध्ये मांडून निर्णय घेण्याचे मान्य केले. त्यांच्या विनंतीवरून बेमुदत उपोषणाचे रुपांतर बेमुदत धरण्यामध्ये करण्यात आले. २५ सप्टेंबर रोजी सुमारे १६ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सत्याग्रह करून स्वतःला अटक करून घेतली. पोलिसांची संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडली. २६ सप्टेंबर रोजी बेमुदत धरण्यामध्ये मुंबईतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले व मागण्या कॅबिनेटमध्ये मान्य होऊन शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार जाहीर केला. इतके होऊनही शासनावर काही परिणाम झालेला दिसत नाही. त्यामुळे आज धरणे आंदोलन करणाऱ्या कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक होऊन ३० सप्टेंबर पर्यंत शासनाने मानधन वाढ, ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शनचा निर्णय न घेतल्यास १ ऑक्टोबर मुंबईसह संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करतील असा इशारा कृती समितीने दिला आहे.

विधानसभेच्या १२ जागा लढविण्यावर माकप ठाम – डॉ. उदय नारकर

अनिल ठाणेकर   ठाणे : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने राज्यभरात पक्षाचे व जनसंघटनांचे मजबूत काम असलेल्या आणि प्रदीर्घ व यशस्वी लढे केलेल्या १२ विधानसभा जागांची मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटून केली आहे. या १२ जागा लढविणार माकप ठाम असून याबाबत महाविकास आघाडीने सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. मात्र तसे झाले नाही तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी डावे पक्ष व पुरोगामी शक्तींना गृहीत धरणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांचीच असेल असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी डॉ.उदय नारकर यांनी दिला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन याबाबत आपली भूमिका दोन महिन्यांपूर्वीच स्पष्ट केली होती, आणि आपण लढणार असणाऱ्या १२ जागांची यादी या सर्व नेत्यांना तेव्हाच लिखित स्वरूपात सादर केली होती. महाविकास आघाडीने या १२ जागा माकपला सोडाव्यात व त्यानंतरच उर्वरित जागांच्या बाबत आपसात वाटाघाटी कराव्यात अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली होती. महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्ष मात्र माकप व डाव्या पुरोगामी शक्तींना गृहीत धरून जागावाटपाबाबत आपसात चर्चा करत आहेत. इतर डावे पक्ष व पुरोगामी शक्तींना अद्याप या प्रक्रियेत सामावून घेण्यात आल्याचे दिसत नाही. महाविकास आघाडीच्या अंतर्गत एकजुटीसाठी हे घातक आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीने लोकसभेच्या महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागा तीन मुख्य पक्षांमध्ये वाटून घेतल्या व त्यानंतर इतर पक्षांच्या बरोबर त्यांचा केवळ पाठिंबा मिळवण्यासाठी चर्चा केली. माकपने तेव्हाही महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांचे हे असे करणे चुकीचे असल्याबद्दल आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आणून दिले होते. किमान विधानसभेच्या जागावाटपात तरी अशा प्रकारे आपसांत तीन पक्षांनी जागा वाटून घेऊन नंतर डावे पुरोगामी पक्ष व संघटनांबरोबर चर्चा सुरू करण्याची चूक होणार नाही याची काळजी घेण्याबद्दल विनंती केली होती. मात्र लोकसभेच्या वेळेस जे झाले तेच विधानसभेच्या वेळेस घडताना आज दिसत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, इतर डावे पुरोगामी पक्ष व विविध जनसंघटनांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक व महिलांच्या बाबतच्या विविध प्रश्नांवर सत्ताधारी भाजप व त्याच्या मित्रपक्षांच्या विरोधात वर्षानुवर्ष तीव्र संघर्ष केला आहे. जनतेच्या या संघर्षांमधून पुढे आलेल्या मागण्या व डावे पक्ष विविध प्रश्नांबाबत घेत आलेली धोरणे यांचे प्रतिबिंब महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात उमटावे असा आग्रहही पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या शिरस्त नेत्यांकडे लावून धरण्यात आला होता. मात्र याबाबतही कोणताही सकारात्मक प्रतिसाद अद्याप देण्यात आलेला नाही. दुसऱ्या बाजूला हे प्रमुख तीनही पक्ष वेगवेगळ्या संवाद यात्रा, सभा व प्रसार माध्यमांमधील चर्चेच्या माध्यमातून माकपने व इतर डाव्या पक्षांनी लढवण्यासाठी सादर केलेल्या जागांवर आपले उमेदवार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे केंद्रस्थानी आणत आहेत. महाविकास आघाडीतील या तीन पक्षांची ही कृती समन्वयाच्या व एकजुटीच्या प्रक्रियेस बाधा आणणारी आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, विविध जनसंघटना, वर्गीय संघटना, पुरोगामी विचारवंत, पत्रकार, बुद्धिजीवी या सर्वांनी अपार मेहनत घेऊन राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण तयार केले होते. तेव्हा सर्वांनी आपली संपूर्ण ताकद लावली होती. परिणामी महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. मात्र असे असले तरी महाविकास आघाडी व महायुती मधील मतांचे अंतर पाहता डाव्या शक्ती, विचारवंत, लेखक, विविध जनसंघटना, वर्गीय संघटना यांना दूर ठेवून महाविकास आघाडीला विधानसभा निवडणूक जिंकता येईल असे आकलन करणे अतिआत्मविश्वासाचे ठरू शकते. देशाच्या जनतेत फूट पाडून जनविरोधी, धर्मांध, जातीय, भ्रष्ट व हुकूमशाही राजकारण करणाऱ्या भाजप व त्याच्या मित्रशक्ती संविधानाला व भारताच्या एकतेला धोका निर्माण करू पाहत आहेत. अशा पार्श्वभूमीवर संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता व भारतीय जनतेच्या हितरक्षणासाठी सर्व लोकशाहीवादी शक्तींची एकजूट अत्यंत आवश्यक बनली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये ही एकजूट जास्त बळकट व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाने अत्यंत काळजीपूर्वक पावले टाकण्याची आवश्यकता आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पार्श्वभूमीवर जाहीर मागणी करतो की विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या प्रक्रियेत महाराष्ट्रातील सर्व डावे व लोकशाहीवादी पक्ष व पुरोगामी संघटनांना महाविकास आघाडीने तातडीने सामावून घ्यावे. निवडणूक लढण्याबद्दल त्यांचे आग्रह अत्यंत प्रामाणिकपणाने विचारात घेतले जाऊन सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. मात्र तसे झाले नाही तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी डावे पक्ष व पुरोगामी शक्तींना गृहीत धरणाऱ्यांची असेल, अशी भूमिका डॉ. उदय नारकर यांनी मांडली आहे. 00000

आमदार गीता जैन आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यात निवडणूकपूर्व संघर्ष

मिरा भायंदर – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली भारत निवडणूक आयोगाचे एक पथक मुंबई दौऱ्यावर आले आहे. निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या…

श्री जानकादेवी उत्कर्ष मंडळातर्फे वर्तकनगर येथील जानकादेवी मंदिरात नवरात्रोत्सव

ठाणे : श्री जानकादेवी उत्कर्ष मंडळातर्फे श्री जानकादेवी मंदिर, वर्तक नगर, पोखरण रोड नं. 1 व 2, ठाणे (प.) येथे प्रति वर्षाप्रमाणे ग्रामदेवता श्री जानकादेवीच्या पुरातन मंदिरात 3 ऑक्टोबर ते…

 कथाकथन स्पर्धेचे आज आयोजन

 मुग्धा चिटणीस -घोडके आंतरशालेय – महाविद्यालयीन ठाणे : शारदा एज्युकेशन सोसायटीचे ‘आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय, मुग्धा चिटणीस-घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि तन्वी हर्बल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी ठाणे शहरातील…

रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून श्लाघ्यता ठाकूरला उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत

पनवेल : परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी नवीन पनवेल येथील श्लाघ्यता राजेश ठाकूर या विद्यार्थिनीला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या रामशेठ ठाकूर सामाजिक विकास…

 भागवत सत्संग सनातन राष्ट्रसंमेलनात आज मुख्यमंत्र्यांसह दोन जगदगुरु शंकराचार्यांची उपस्थिती

 आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विकासकामांचे मुख्यमंत्री करणार लोकार्पण, भूमिपूजन ठाणे : शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मीरा भाईंदर शहरात येत असून त्यानिमित्ताने संपूर्ण…

सोसायट्यांच्या कचर्‍यापासून खतनिर्मिर्तीसाठी अत्याधुनिक यंत्रणा सज्ज

घोडबंदरातील गोदरेज एमरॉल्ड सोसायटीत शुभारंभ ठाणे – भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आता सोसायटीतील कचर्‍याची सोसायटीनेच विल्हेवाट लावावी असे स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता बहुतेक सोसायट्यांनीच…

 ‘स्वच्छता सायक्लोथॉन’ रॅलीस मिळाला सायकलस्वारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे : ‘रुबाबदार ठाणे शहराचा मी जबाबदार नागरिक..’ ‘स्वभाव स्वच्छता.. संस्कार स्वच्छता’, ‘इतरत्र कुठेही कचरा टाकू नका.. आपले शहर स्वच्छ ठेवा’ असा संदेश देणारी ‘स्वच्छता सायक्लोथॉन रॅली 2024’ रविवारी ठाणे…

 हराची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा, कचरा वेचक महिलांचा आदर करा – अभिनेत्री मधुराणी गोखले

स्वच्छता पंधरवड्यानिमित्त कोरम मॉलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन ठाणे : सर्वत्र स्वच्छता पंधरवडा सुरू आहे, याच अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. ठाणे बदलतंय..हे दृश्य स्वरूपात दिसू…