जेव्हा राज ठाकरे मित्राला भेटतात…
INTRO ‘मनसेप्रमुख राज ठाकरे आणि टेलिव्हीजन अँकर कुणाल विजयकर हे कॉलेज दोस्त. मुलाखतीच्या निमित्ताने हे दोन दोस्त एकत्र भेटता आणि मग सुरु होते दोस्तीची मैफल. या मैफीलीबाबत सांगतायत स्वता कुणाल विजयकर’…
Thane news
INTRO ‘मनसेप्रमुख राज ठाकरे आणि टेलिव्हीजन अँकर कुणाल विजयकर हे कॉलेज दोस्त. मुलाखतीच्या निमित्ताने हे दोन दोस्त एकत्र भेटता आणि मग सुरु होते दोस्तीची मैफल. या मैफीलीबाबत सांगतायत स्वता कुणाल विजयकर’…
ठाणे : मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. या लोकसभा निवडणुकीत मतदान करून आपली लोकशाही बळकट करायला हवी.कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे आपण मतदानाचा अधिकार बजवायला हवा असे आवाहान…
ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाचा हक्क बजावावा यासाठी स्वीपच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीत 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ज्या…
ठाणे महानगरपालिका शाळा क्र. 4 मध्ये ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाचा हक्क बजावावा यासाठी स्वीपच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. लोकशाहीने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येकाने बजावावा यासाठी शालेय विद्यार्थ्यांमार्फतही जनजागृती केली जात आहे. 149 कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील घोलाई नगर येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्र. 4 मध्ये निवडणुक जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांनाही निवडणुकीचे महत्व कळावे व त्यांनी त्यांच्या माध्यमातून घरातील पालक, शेजारी, मित्रपरिवार यांना मतदान करण्यास प्रवृत्त करावे यासाठी शाळा क्र. 4 मध्ये चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या सर्व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “वोट फॉर बेटर इंडिया, आपले मत अमूल्य आहे, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा”अशा प्रकारची घोषवाक्य विद्यार्थ्यांनी लिहून मतदानाचा संदेश दिला. तसेच चित्रकला व रांगोळीच्या माध्यमातून मतदानाबाबतची जनजागृती विद्यार्थ्यांनी केली. या स्पर्धांबरोबरच परिसरात विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी विविध मंडळांच्या भेटी घेवून नागरिकांशी संवाद साधला. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्वीपचे सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले. 00000
ठाणे,दि.19(जिमाका):- विधानसभा मतदानाची टक्केवारी वाढावी किंबहुना नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून देण्याच्या दृष्टीने 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघतील शाळा क्र. 38 येथे महिला पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. स्वीपच्या माध्यमातून…
आंतर महाविद्यालयीन खो खो स्पर्धेत ठाणे – 18 ऑक्टोबर आणि 19 ऑक्टोबरला कर्मवीर भाऊराव पाटिल महाविद्यालय वाशी येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन ठाणे विभाग खो खो स्पर्धेमध्ये आपल्या श्री मावळी मंडळ संस्थेतील पुरुष गटातील खेळाडू आयुष राव ह्याने ज्ञानसाधना महाविद्यालयतर्फे प्रतिनिधित्व करीत तृतीय क्रमांक पटकावला, महिला गटात सानिया मोरे हिने जोशी बेडेकर महाविद्यालय तर्फे प्रतिनिधित्व करीत द्वितीय पारितोषिक पटकावले तर पुरुष गटातील खेळाडु शुभम जाधव, देवेश देशमुख आणि प्रज्वल महाडिक ह्यांनी सुद्धा जोशी बेडेकर महाविद्यालयतर्फे प्रतिनिधित्व करून द्वितीय पारितोषिक पटकावले असून मुंबई विभागाकरिता देवेश देशमुख आणि शुभम जाधव ह्यांची निवड करण्यात आली आहे.
घोरपडे, शेट्टे, ताकमोगे, तांबवेकर, सोमण, आरंडे, गुंजाळ यांना सुवर्णपदक पुणे १९ ऑक्टोबर २०२४: सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि क्रीडा प्रबोधिनी सायकलिस्ट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित ३-या महाराष्ट्र राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी संस्कार घोरपडे, सिद्धेश घोरपडे, साहील शेट्टे, मंगेश ताकमोगे, गायत्री तांबवेकर, आभा सोमण, सायली आरंडे, श्वेता गुंजाळ यांनी आपापल्या वयोगटात चमकदार कामगिरी करताना टाईम ट्रायल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. आज या स्पर्धेचे उदघाटन सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष श्री प्रताप जाधव, निगडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री शत्रुघ्न माळी, स्पर्धेचे मुख्य कॉमिशर सुदाम रोकडे, आंतरराष्ट्रीय पंच धर्मेंद्र लांबा, स्पर्धा संचालक दिपाली पाटील, मिलींद झोडगे, मिनाक्षी शिंदे, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार भिकन अंबे, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सहसचिव अभिजीत मोहिते आदी मान्यवर हजर होते. आज पावसामुळे काही काळ स्पर्धेत व्यतय आला. आज सर्व वयोगटातील टाईम ट्रायल प्रकारामधील अंतिम स्पर्धा पार पडल्या. आज झालेल्या स्पर्धांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे. टाईम ट्रायल :- युथ बॉईज ५०० मीटर्स – सुवर्ण – संस्कार घोरपडे (पुणे ३८.८९ से.), रौप्य – अर्नव गौंड (पुणे ४२.५२ से.) कांस्य – अनुज गौंड (पुणे – ४२.६२से). युथ गर्ल्स ५०० मी. – सुवर्ण – गायत्री तांबवेकर (पुणे – ४१.८९ से.), रौप्य – ज्ञानेश्वरी माने (पुणे ४१.८९ से.), कांस्य – मुग्धा कर्वे (पुणे – ४६.०२). सब ज्युनिअर बॉईज ५०० मी. – सुवर्ण – सिद्धेश घोरपडे (३६.२५ से), रौप्य – प्रणय चिनगुंडे (३९.६० दोघे क्रीडा प्रबोधिनी), कांस्य – संस्कार घोरपडे (पुणे ३९.७९ से), सब ज्यनिअर गर्ल्स ५०० मी. – सुवर्ण – आभा सोमण (४१.०१ से.) रौप्य – गायत्री तांबवेकर (४२.३० से.), कांस्य – श्रीवणी परीट (४४.८१ से. सर्व पुणे). ज्युनिअर:- मुले १००० मी. सुवर्ण – साहील शेट्टे (पुणे १.१३.६०), रौप्य – हरीश डोंबाळे (क्रीडा प्रबोधिनी पुणे १.१४.३१) कांस्य – सोहम पवार (पुणे १.१४.९४) मुली ५०० मी. – सुवर्ण – सायली आरंडे (कोल्हापूर ३९.७१ से.) रौप्य – आभा सोमण (पुणे ४१.०३से) कांस्य – झायना पिरखान (पालघर ४१.७६ से). मेन ईलाईट (पुरुष खुला गट) १००० मी. – सुवर्ण – मंगेश ताकमोगे (१.१२.०३) रौप्य – वेदांत जाधव (१.१२.३७ दोघे पुणे) कांस्य – मंथन लाटे (ठाणे १.१३.२३) वुमेन ईलाईट (महिला खुला गट) – ५०० मी. – सुवर्ण – श्वेता गुंजाळ (पुणे ३९.८० से) रौप्य – सायली आरंडे (कोल्हापूर ४०.४८ से.) कांस्य – आदिती डोंगरे (क्रीडा प्रबोधिनी, पुणे ४१.८८ से) 0000
ठाणे : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सरू आहे, तर दुसरीकडे लोकशाहीच्या या उत्सवासाठी जिल्हा प्रशासनदेखील सज्ज झाले आहे. त्यानुसार नुकतेच जिल्हा प्रशासनाकडून १८ विधानसभा…
ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता कल्याण : २०१९च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विजय मिळालेला एकमेव मतदारसंघ अशी कल्याण ग्रामीण मतदार संघाची ओळख आहे. आगरीबहुल असा हा मतदारसंघ असून मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांचा हा मतदार संघ असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. या मतदारसंघातून राजू पाटील हे पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणारे हे निश्चित असले तरी मनसे प्रमुख राज ठाकरे या मतदारसंघात नेमका कोणता पवित्रा घेणार, याविषयी सर्वाधिक उत्सुकता आहे. गेल्या निवडणुकीत माघार घेऊन निवडणूक न लढवणारे माजी आमदार सुभाष भोईर शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असल्याने ही लढत चुरशीची ठरणार आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे महापालिकेतील काही भाग, कल्याण तालुका, अंबरनाथ तालुक्यातील काही भाग, नवी मुंबईतील गावे तसेच कल्याण पूर्वेतील लोकग्राम परिसर अशा विस्तृत परिसरात कल्याण ग्रामीण मतदारसंघाचा विस्तार आहे. या मतदारसंघात आगरी मतदारांचे प्राबल्य असल्याने सर्वच राजकीय पक्षाकडून या मतदाराच्या मतांचे दान मिळविण्यासाठी आगरी चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र काहीही असले तरी यावेळी मातब्बरांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केल्याने या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या मतदारसंघाने यापूर्वी दोनवेळा मनसेच्या बाजूने कौल दिला आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी शिवसेनेकडून मनसेला विधानसभेत सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनानंतर खासदार शिंदे यांच्या प्रचारात राजू पाटील पुढाकार घेतला होता. त्यामुळे या मदतीची परतफेड शिवसेना आणि डॉ. शिंदे यांच्याकडून होईल, अशी मनसेला अपेक्षा आहे. तर मागील विधानसभा निवडणुकीत भोईर यांना उमेदवारीपासून दूर ठेवळे होते. मात्र शिवसेनेत विभाजन झाल्यानंतर भोईर हे उमेदवारीचे प्रमुख दावेदार झाले आहेत. मतदारसंघात असलेला दांडगा जनसंपर्क आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या मताची जोड त्यांना मिळणार असल्याने महाविकास आघाडीचे आव्हान असणार आहे. महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या भाजपकडूनही या मतदारसंघावर दावा केला जात असून भाजपाचे नंदू परब उमेदवारी मिळविण्यासाठी खटाटोप करत आहेत. तर शिवसेनेकडून डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, ठाणे महापालिकेचे उप महापौर रमाकांत मढवी आणि कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील यांच्यात चुरस वाढली आहे. मात्र महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिंदे गटाला सुटल्यास ठाकरे गटाच्या उमेदवाराला शह देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून भोईर यांच्या मतामध्ये विभाजन करण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गत निवडणुकांची पार्श्वभूमी २००९च्या निवडणुकीत या मतदारसंघातून मनसेकडून रमेश पाटील यांची लढत शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांच्यामध्ये बरोबरी होती. मात्र त्यावेळी मनसेच्या लाटेत रमेश पाटील यांचा विजय झाला होता. तर २०१४ च्या निवडणुकीत रमेश पाटील यांच्यावर शिवसेनेच्या सुभाष भोईर यांनी मात करत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात घेतला होता. तर २०१९ च्या निवडणुकीत मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांच्यावर मात करत हा मतदारसंघ जिंकला. सुभाष भोईर यांनी यावेळी शांत राहण्याचा घेतलेला निर्णय काहीसा मनसेच्या पथ्यावर पडल्याची चर्चा होती. २०१९ च्या निवडणुकीत मनसेने हा मतदारसंघ जिंकला असला तरी आता परिस्थिती बदलली आहे. 0000
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री.अशोक शिनगारे यांच्या निर्देशानुसार जिल्हा नियोजन समिती सभागृहात FST/SST/VST/ VVT व कंट्रोल रुममधील अधिकारी- कर्मचाऱ्यांना CVIGIL App व ESMS App चे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी आदर्श आचारसंहितेबाबत क्षेत्रीय स्तरावर काम करणारे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे यांनी आयटी ॲप्लिकेशन्स विषयी मार्गदर्शन केले तसेच उपजिल्हाधिकारी सुकेशिनी कांबळे-पगारे व तहसिलदार सायली भगत यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.