Category: ठाणे

Thane news

मिरा भाईंदर पालिकेतर्फे ‘स्वच्छता हीच सेवा ’ हा उपक्रम

भाईंदर : राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी 2 ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या जयंतीनिमित्त पूर्वतयारी म्हणून स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि…

विजय सहाने कुटुंबीयांच्या आत्महत्येचे सखोल चौकशी करून  दोषीनविरुद्ध  कठोर कारवाई करा – डॉ. डी.एल.कराड

अनिल ठाणेकर   ठाणे : मे.बॉस कंपनी, सातपूर नाशिक येथील कंपनीतील कामगार विजय सहाणे यांची पत्नी ज्ञानेश्वरी व कन्या अनन्या या एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली. आत्महत्या  करण्याची धक्कादायक व दुर्दैवी घटना इंदिरानगर परिसरात झाली आहे. संपूर्ण कुटुंबानेच आत्महत्या करण्याची ही घटना अत्यंत दुःखदायक व चिंताजनक आहे. यामुळे विजय सहाने कुटुंबीयांच्या आत्महत्येचे सखोल चौकशी करून  दोषीनविरुद्ध  कठोर कारवाई करा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात सिटूचे पदाधिकारी डॉ. डी एल कराड यांनी केली आहे. विजय शहाणे हे मे.बॉस कंपनीमध्ये ११ वर्षापासून काम करीत होते, त्यांना कंपनीने इतर ७०० कामगारांसह कामावरून कमी केले होते. या संदर्भात या सर्व कामगारांनी नाशिकच्या औद्योगिक न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय व देशाचे सर्वोच्च न्यायालयात दाद मागितले होते. सर्वोच्च न्यायालयाने कामावर घेण्याचा औद्योगिक न्यायालयाचा निर्णय कायम केला होता. त्यानुसार या कामगारांना कामावर घेण्यात आले. परंतु त्यांना काम दिले नाही व वेगळ्या शेडमध्ये बसून ठेवले. तसेच सुमारे २८ कामगारांना कामावर घेतल्यानंतर निलंबित केले व २३७ कामगारांची देशात इतरत्र ठिकाणी बदली करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात जाऊनही व सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असूनही कंपनी दाद देत नाही. यामुळे या कामगारांमध्ये प्रचंड नैराश्य निर्माण झाले आहे. याच नैराश्यामधून विजय सहाने कुटुंबियांनी आत्महत्या केली अशी सर्वांचे भावना आहे. परंतु ही आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेला हा कामगार कुटुंबीयांचा खूनच आहे. कंपनीच्या अत्यंत निर्दयी भूमिकेमुळे ही घटना घडली आहे. कंपनी व्यवस्थापन न्याय देत नाही, सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊनही व निकाल मिळूनही कंपनी दाद देत नाही असे दिसून आल्यानेच सदर कुटुंबीयांनी आत्महत्या केली आहे. या संबंध आत्महत्येची सखोल चौकशी करावी. ही आत्महत्या करण्यास परिस्थिती निर्माण करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा व या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी कामगार संघटना करीत आहे. सर्व कामगार संघटना व राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींनी या घटनेकडे आत्महत्या म्हणून न पाहता गंभीरपणे विचार करावा. राज्यात आणि नाशिक शहरात कामगारांची अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे, याची दखल घेऊन हस्तक्षेप करावा. असे आवाहन सिटू कामगार संघटना करीत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेकडे आत्महत्या म्हणून न बघता याची सखोल चौकशी करण्याचे आदेश करावेत व शहाणे कुटुंबीयांना न्याय द्यावा. तसेच कामगारांची ही परिस्थिती बदलण्यासाठी उर्वरित ७०० कामगारांना न्याय मिळण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी सिटू संघटना करीत आहे, असेही डॉ.डी.एल.कराड, सिताराम ठोंबरे, देविदास आडोळे, तुकाराम सोनजे, हिरामण तेलोरे यांनी केली आहे. ०००००

शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांची करोडो रुपयांची संपत्ती हडप करण्याचा डाव

बनावट मृत्यु प्रमाणपत्र उघडकीस ! सागर जोंधळे यांच्या तक्रारीवरून गीता खरे, प्रीतम देशमुखांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल अनिल ठाणेकर ठाणे : डोंबिवली येथील स. है. जोंधळे विद्यासमुहाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षणसम्राट दिवंगत शिवाजीराव जोंधळे यांची मालमत्ता हडप करण्यासाठी डोंबिवली येथील डॉक्टरचे बनावट पत्र, खोटी स्वाक्षरी, शिक्के मारुन वैद्यकीय उपचाराचे बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. बनावट मृत्यु प्रमाणपत्र उघडकीस आल्यानंतर शिवाजीराव जोंधळे यांचा मुलगा सागर जोंधळे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीनुसारया प्रकरणात विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गीता खरे, उपाध्यक्ष प्रीतम देशमुख, हर्षकुमार खरे, संतोष देशमुख, रितेश यशवंतराव यांच्याविरुद्ध विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोंधळे समूहाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणसम्राट दिवंगत शिवाजीराव जोंधळे यांची कटकारस्थान रचून हत्या करण्यात आली असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. त्या संदर्भात सविस्तर कायदेशीर प्रक्रिया सुरु असून या प्रकरणातील दोषी आरोपींना अटक करण्याची अशी जोंधळे परिवाराने नुकतीच पत्रकार परिषदेत मागणी केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता शिक्षणसम्राट शिवाजीराव जोंधळे यांची मालमत्ता हडप करण्यासाठी डोंबिवली येथील डॉ.क्टरचे बनावट पत्र, खोटी स्वाक्षरी, शिक्के मारुन वैद्यकीय उपचाराचे बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट मृत्यु प्रमाणपत्रात विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गीता खरे, उपाध्यक्ष प्रीतम देशमुख, हर्षकुमार खरे, संतोष देशमुख, रितेश यशवंतराव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहेम अशातच ज्या ऑप्टिलाईफ रुग्णालयाचे डॉ.हेमंत इंगोले, यांच्या स्वाक्षरी शिक्क्याचे प्रमाणपत्र शिवाजीराव जोंधळे यांच्या मृत्युपत्रात जोडण्यात आले आहे त्या डॉ.हेमंत इंगोले यांनी आपल्या या प्रमाणपत्राशी संबंध नसल्याचे सांगितले आहे. यामुळे विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गीता खरे, उपाध्यक्ष प्रीतम देशमुख, हर्षकुमार खरे, संतोष देशमुख, रितेश यशवंतराव यांच्या अडचणीत भर पडणार असल्याचे बोलले जात आहे.

टिटवाळा उपविभागातील १८४ वीज चोरांविरुद्ध गुन्हे दाखल

४४ लाखांची वीजचोरी उघड   कल्याण : महावितरणच्या टिटवाळा उपविभागात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम नियमितपणे सुरू आहे. उपविभागातील सर्वाधिक गळती असलेल्या वीज वाहिनीवर गेल्या दीड महिन्यात केलेल्या तपासणीत १८४ जणांकडे ४४ लाख रुपयांची वीजचोरी आढळली. या सर्व १८४ जणांविरूद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार मुरबाड पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. चंद्रमणि मिश्रा आणि कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, कल्याण ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता विनय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली १ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या दीड महिन्याच्या कालावधीत ही कारवाई करण्यात आली. मांडा-टिटवाळा शाखा कार्यालयांतर्गत टिटवाळा मंदिर, बल्याणी, बनेली, मांडा पश्चिम भागात १३४ तर गोवेली शाखेंतर्गत म्हारळ व वरप भागात ५० जणांकडे वीज चोऱ्या आढळून आल्या. यात वीजबिल थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ४० ग्राहकांचा समावेश आहे. टिटवाळा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, सहायक अभियंते धनंजय पाटील, तुकाराम घोडविंदे, कनिष्ठ अभियंते सचिन पवार, अलंकार म्हात्रे आणि त्यांच्या टिमने ही कामगिरी केली.

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे भाजपातर्फे आज रक्तदान शिबीर

 संजय वाघुले यांच्याकडून सॅटीस पुलाखाली शिबीर   ठाणे : भाजपाचे नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपा ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष संजय संतु वाघुले यांनी आज शुक्रवारी ,  ठाणे रेल्वे स्टेशनबाहेरील सॅटीस पुलालगत भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस हा रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने कोकणातील अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनीही ठाणे रेल्वे स्टेशनजवळ सॅटीस प्रकल्पालगत उद्या शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी पाचपर्यंत शिबीर भरविले आहे. या शिबिरात रक्तदान करून नागरिकांनी सामाजिक जाणीव जोपासून गरजूंना जीवन द्यावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केले आहे. या शिबिराच्या यशस्विततेसाठी भाजपाचे सर्व माजी नगरसेवक-नगरसेविका, जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांकडून मेहनत घेतली जात आहे.

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

 दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या बाबींचा समावेश करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी   पनवेल : सिडको प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे त्यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीस आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी आमदार संदीप नाईक, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, सिडकोचे अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी सर्वसमावेशक निर्णय घेण्याबाबत राज्य शासनाकडून अंतिम कार्यवाही सुरु आहे, त्याच अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या बाबींचा त्यात समावेश करावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज मुंबई येथे झालेल्या नगरविकास विभागाच्या बैठकीत केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांना निवेदनही दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि,  स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सातत्याने मुख्यमंत्री साहेब तसेच पालकमंत्री यांना प्रत्यक्ष भेटून आणि पत्राद्वारे सिडको प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांबाबत ती नियमित करून सकारात्मक निर्णय घेण्याकरिता पाठपुरावा करीत आहोत. त्या अनुषंगाने सदर घरे नियमित करत असताना प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीतील बाबींचा अंतर्भाव अत्यंत आवश्यक आहे. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करताना गावठाणाबाहेरील प्रकल्पग्रस्तांनी बांधलेल्या विशिष्ट हद्दीचा विचार न करता अर्थात सर्व बांधकामांचा विचार होणे आवश्यक असून प्रकल्पग्रस्तांनी बांधलेल्या निवासी बांधकामांसोबतच अंशतः वाणिज्य किंवा भाडेकरू वापर (निवासी/वाणिज्य/भाडेकरू वापर) ही बांधकामेदेखील नियमित करणे गरजेचे आहे. कारण बऱ्याच ठिकाणी त्यावरच प्रकल्पग्रस्तांच्या कुटूंबियांची उपजिविका अवलंबून आहे, त्यामुळे याबाबतही सकारात्मक कार्यवाही झाली पाहिजे. सिडको व्यतिरिक्त नवी मुंबईतील या ९५ गावाअंतर्गत एमआयडीसी अथवा अन्य शासकीय जमिनीवरील प्रकल्पग्रस्तांची घरे देखील नियमित होणे आवश्यक आहे. बिगर प्रकल्पग्रस्तांकरिता रहिवासी वापराकरीता नियमित करणेबाबत शासनाचा / सिडकोचा दर देखील मर्यादित राहिला पाहिजे कारण ही बांधकामे प्रकल्पग्रस्तांनीच बांधलेली असून बिगरप्रकल्पग्रस्तांना राहण्याकरिता अथवा भाडेतत्त्वावर दिलेली आहेत. (त्यामुळे दर हा सिडको Reserve Price च्या ३०% ते ५०% असावा ३०० % नको),  यापूर्वी ज्यांना १२.५% योजनेअंतर्गत भूखंडांचे वाटप झाले आहे व ज्यांची बांधकामाची पात्रता त्यामधून वगळण्यात आलेली आहे, सर्वप्रथम अशा सर्व प्रकल्पग्रस्तांची नोड निहाय माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच त्या सर्व प्रकल्पग्रस्तांना जर त्यांच्या वगळलेल्या पात्रतेएवढा भूखंड देणे शक्य नसेल तर वगळलेल्या क्षेत्राएवढा टीडीआर देण्यात यावा व तो टीडीआर त्याच क्षेत्रांत अथवा नोडमध्ये वापरणे शक्य नसल्यास, आजूबाजूच्या क्षेत्रांत अथवा नोडस् मध्ये वापरण्यासाठी परवानगी देण्यात यावी. प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करीत असताना गावठाणामध्ये अथवा गावठाणाबाहेर अस्तित्वातील कातकरी, ठाकूर, मागासवर्गीय तसेच अन्य भूमीहीन कुटूंबांची घरे देखील नियमित करणेबाबत निर्णय होणे गरजेचे आहे. गरजेपोटी घरे नियमित करीत असताना, मुख्य रस्ते, मुलभूत सोयीसुविधा, सामाजिक सेवा भूखंड, आरक्षण, डीपी आरक्षण अशा ठिकाणी येणाऱ्या सर्व जुन्या बांधकामांना योग्य तो मोबदला अथवा टीडीआर देणे आवश्यक आहे. गरजेपोटी क्षेत्राबाहेरील भूखंडांचे सिडकोतर्फे वाटप करताना त्या परिसराकरिता सामाजिक सुविधा तसेच नागरिकांच्या सामाजिक सोयींकरता प्रथमतः भूखंड आरक्षित ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर उर्वरीत भूखंडांचे (१२.५%) वाटप करणे गरजेचे आहे. या बाबी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उल्लेखित करून प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करून त्यांना दिलासा देताना या बाबींचाही त्यात समावेश करावा, अशी मागणी या बैठकीत केली .

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

पनवेल : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी पनवेलमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. युवा मोर्चाच्यावतीने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेले हे शिबीर सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आले आहे.

मिरा भाईंदर पालिकेतर्फे ‘स्वच्छता हीच सेवा ’ हा उपक्रम

भाईंदर : राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी 2 ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या जयंतीनिमित्त  पूर्वतयारी म्हणून स्वच्छ भारतासाठी स्वयंप्रेरणा आणि सामूहिक…

राज्य तायक्वांदो अध्यक्षपदी संदीप ओंबासे यांची निवड

कल्याण : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (टाम) या राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी संदीप ओंबासे (ठाणे) तर सचिवपदी गफार पठाण (सातारा) यांची एकमताने निवड करण्यात आली. देशातील   शिखर संघटना इंडिया तायक्वांदो च्या मान्यतेने…

 आजपासून बारामतीमध्ये रंगणार

 खेलो इंडीया ‘वुमेन्स लीग’ सायकल स्पर्धा   बारामती : सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, क्रीडाजागृती आणि बारामती येथील एनव्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडीया यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून खेलो इंडीया वुमेन्स लीग स्पर्धेचे आयोजन बारामती येथे करण्यात आले आहे. २० आणि २१ सप्टेंबर रोजी संत तुकराम महाराज पालखी मार्गावर होत असलेल्या या स्पर्धा सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार होत आहेत. क्रीडा स्पर्धामधील मुलींचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने केवळ मुलींसाठी ‘वुमेन्स लीग’ सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेनिमीत्ताने बारामती तालुक्यामधील मुलींच्या क्रीडागुणांना वाव मिळवा म्हणून युवा नेते जयदादा पवार यांच्या पुढाकाराने बारामती तालुका स्तरावर शालेय मुलींसाठी तीन वयोगटात सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सुमारे २०० हुन अधिक मुलींनी सहभाग घेतला आहे. वुमेन्स लीग सायकल स्पर्धा सबज्युनीअर (१२ ते १६ वर्ष वयोगट), ज्युनिअर (१७ आणि १८ वर्षे) आणि १९ वर्ष व त्यावरील अशा तीन वयोगटात होईल. टाईम ट्रायल आणि रोड रेस (मास स्टार्ट) या दोन प्रकारात या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन आज, शुक्रवारी सकाळी ९:०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे युवा नेते मा. जयदादा पवार यांच्या शुभहस्ते होत आहे. याप्रसंगी बारामती शहराचा आणि तालुक्याचा क्रीडाक्षेत्रात नावलौकीक जगभर पसरवणा-या युवा खेळाडूंना सन्मानीत करण्यात येणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी सकाळी १०:०० वाजता खासदार सौ. सुनेत्रावहिणी पवार यांच्या शुभहस्ते स्पर्धेठिकाणी होणार असून यावेळी मुंबई मराठी क्रीडा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष, बित्तमबातमिचे संपादक आणि सलग सहा वेळा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना हजर राहुन वार्तांकन करणारे  संदीप चव्हाण, मराठीमधील पहिल्या महिला क्रीडा पत्रकार  स्वाती घोसाळकर, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष प्रताप जाधव, संयोजन समिती आणि बारामती सायकल क्लबचे अध्यक्ष अॅड श्रीनिवास वायकर आदी मान्यवर हजर राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय पंच मा. धरमेंदर लांबा यांची या स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून नेमणूक झाली असून सुदाम रोकडे, दिपाली पाटील, मिनाक्षी शिंदे, प्रा. साईनाथ थोरात, भिकन अंबे, बिरु भोजने, संजय दराडे स्पर्धेची तांत्रिक जबाबदारी पार पाडणार आहेत. केंद्र सरकारतर्फे साईचे निरीक्षक म्हणून सार्थक गंगावणे आणि कुस्ती प्रशिक्षक अमरसिंग निंबाळकर यांची नेमणूक झाली आहे. 0000