Category: ठाणे

Thane news

उल्हासनगरातील ४ मजली अवैध इमारतीवर पाडकाम कारवाई

उल्हासनगर : कॅम्प नं-२, सोनार गल्लीत उभी राहिलेली अवैध ४ मजल्याची इमारतीवर आयुक्त विकास ढाकणे यांच्या आदेशानुसार पाडकाम कारवाई सुरू केली. अश्या अवैध बांधकामावर कारवाईचे संकेत सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिले आहे. उल्हासनगरात विना परवाना अवैध बांधकामे सुरू असल्याच्या असंख्य तक्रारी आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्याकडे आल्या आहेत. त्यापैकी कॅम्प नं-२, सोनार गल्लीत उभी राहिलेल्या ४ मजली अवैध इमारतीवर पाडकाम कारवाई करण्याचे आदेश आयुक्त ढाकणे यांनी सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्यासह संबंधित प्रभाग अधिकाऱ्याला दिले. त्यानुसार सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली इमारतीवर पाडकाम कारवाई सुरू केली. अश्या अवैध बांधकामावर कारवाई करण्याची मागणी शहरातून होत आहे. कॅम्प नं-३ मधून वाहणाऱ्या वालधुनी नदी किनारी शांतीनगर व हिराघाट परिसरात अवैध शेड उभे राहिले असून गावडे शाळेजवळ अवैधपणे असंख्य खोल्या बांधण्यात येत आहे. तसेच महादेव कंपाऊंड व जुन्या डम्पिंग परिसरात अवैध बांधकामे उभे राहिल्याची चर्चा शहरात होत आहे. उल्हासनगर म्हणजे अवैध बांधकामाचे शहर असे समीकरण झाले आहे. अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर राज्य शासनाने अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी विशेष अध्यादेश काढला. त्यामध्ये वेळोवेळी बदल करून अतीधोकादायक इमारतीचा प्रश्न समाविष्ट करण्यात आला. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने, बांधकाम नियमित झालेल्या इमारतीची पुनर्बांधणी रखडली आहे. तर दुसरीकडे अवैध बांधकामावर नियंत्रण ठेवण्यात महापालिका अपयशी ठरल्याचा आरोप शहरातून होत आहे. सोनार गल्लीतील शौचालये गेले कुठे? कॅम्प नं-२, शिरू चौक ते सोनार गल्ली परिसरात चक्क महापालिका शौचालये भूमाफियांनी हडप करून अवैध बांधकामे उभी राहिली आहे. एकेकाळी सार्वजनिक शौचालयासाठी प्रसिद्ध असलेल्या सोनार गल्लीत अपवादात्मक एखादे शौचालये शिल्लक राहिले आहे. तसेच शौचालये हडप करून बांधलेल्या अवैध बांधकामावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान

 सर्व नागरिकांनी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन..   विरार :- शासनाच्या निर्देशानुसार वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात १४ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत…

गौरी-गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांकडे भाविकांचा ओघ

 महापालिका क्षेत्रात १४३९९ श्रीगणेश मूर्तींचे तसेच ११४७ गौरी मूर्तींचे भावपूर्ण विसर्जन   ठाणे : श्रीसह गौरी विसर्जनाच्या सहाव्या दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण १४३९९ गणेश मूर्ती तसेच ११४७ गौरी…

माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत इंद्रलोक जेष्ठ नागरिक संस्था (रजि), इंदलोक केज ४, भाईंदर (पूर्व), ४०११०५ ~येथील विरंगुळा केंद्रात नुकताच जेष्ठ नागरिक सभासदा‘चा वाढदिवस साजरा करण्यांत आला. संस्थेचे अध्यक्ष…

भारतीय मराठा महासंघ च्या जिल्हा अध्यक्षा ठाणे लोकसभा क्षेत्र उद्योग आघाडी आणि तसेच मानवता सेवा जनकल्याण प्रतिष्ठान उपाध्यक्षा आणि कुटुंब फॉउंडेशन उपाध्यक्षा आणि आदिवासी बहुजन पर्यावरण सेवा ची सल्लागार आणि…

 कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना

 भांडुप परिमंडलातील १ लाख २० हजार ग्राहक पात्र   ठाणे : वीजबिल थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित केलेल्या भांडुप परिमंडलातील १ लाख १९ हजार ५७५ ग्राहकांना नवीन वीजजोडणी मिळू शकते. त्यासाठी…

पॅरेगॉन सारख्या नामांकित कंपनीने गणेश भक्तांसाठी रांगेत विश्रांती धाम बनवलं असून चालून थकलेल्या गणेश भक्तांना फूट मसाज केंद्र मोफत सेवा पॅरेगॉन ने दिली आहे. मुंबईमध्ये मुंबईचा राजा, खेतवाडीचा राजा, फोर्टचा…

जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसची पहिलीवहिली शाखा ठाण्यात

ठाणे : भारतातील सर्वात प्रतिष्ठित वित्तीय सेवा कंपनी पैकी एक, जेएम फायनान्शियल सर्व्हिसेसने (जेएमएफएस) तिची पहिली शाखा ए/४१०, सेंट्रम बिझनेस स्क्वेअर, वागळे इस्टेट, ठाणे येथे सुरू केल्याची घोषणा केली.गतिशील आणि…

जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागातील कामवाटप झाले आता ऑनलाईन

महाराष्ट्रात पहिल्यांदाच पेमेंट गेटवेचा वापर अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे जिल्हा परिषदे मार्फत सुशिक्षित बेरोजगार अभियंता मजूर कामगार सहकारी संस्था यांना बांधकाम विभागातील १० लाखाच्या आतील विकास काम विनास्पर्धा ऑनलाईन…

 उल्हासचे प्रदुषित पाणी मराठवाड्याला नेणार का ?

पर्यावरणप्रेमींचा सवाल, उल्हास, वैतरणाचे पाणी मराठवाड्यात नेण्याच्या निर्णयावर नाराजी बदलापूरः उल्हास आणि वैतरणा उपखोऱ्यातील अतिरिक्त पाणी मराठवाडा प्रदेशातील गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी राज्य सरकारने ६१ कोटींना…