Category: ठाणे

Thane news

महाराष्ट्रवादी व्हाॅट्स्ॲप हेल्पलाईन ९८६१ ७१७१७१ यानंबरवर शासकीय योजनांची माहिती उपलब्ध – आनंद परांजपे

ठाणे : महाराष्ट्रवादी व्हाॅट्स्ॲप हेल्पलाईन ९८६१ ७१७१७१. या नंबरवर राज्यातील सर्व शासकीय योजनांची माहिती उपलब्ध आहे. यासाठी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस ठाणेकरांच्या मदतीसाठी, सेवेसाठी तत्पर असून महाराष्ट्रवादी व्हाॅट्स्ॲप हेल्पलाईनचा लाभ घ्या,…

महाविकास आघाडी सोनिया गांधी, राहुल गांधी, पंडित नेहरूंना जोडे मारणार का? – केशव उपाध्ये

अनिल ठाणेकर ठाणे : मालवण येथील घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली असली, तरी माफी मागणे पुरेसे नसल्याची विधाने महाविकास आघाडीकडून केली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर डिस्कव्हरी…

शहरातील बेकायदा बॅनरबाजीविरोधात सामाजिक कार्यकर्ता उपोषणाला बसणार

ठाणे : ठाणे शहरात विशेषतः घोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बॅनरबाजी केली जात आहे. त्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनावले यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. बेकायदेशीर बॅनरबाजी करणाऱ्यांना दंड आकारून ठाणे…

महाविकास आघाडी विरोधात भाजपचे निषेध आंदोलन

अनिल ठाणेकर   आज भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे शहर तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे महाविकास आघाडीचे घाणेरडे राजकारण सुरू आहे त्याविरोधात निषेध आंदोलन ठाण्याच्या तलावपाली ठिकाणी छत्रपती शिवाजी…

आनंद कांबळे, राजेश पोवळे, दिलीप शिंदे यांना गौरवणार

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्ता सन्मान दिवसाचे साधणार औचित्य   ठाणे : संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री ऍड.मनोजदादा आखरे यांच्या वाढदिवसाचे – ३ सप्टेंबरचे औचित्य साधून कार्यकर्ता सन्मान या उपक्रमांतर्गत संभाजी ब्रिगेडच्या…

स्व. विनायक निम्हण यांचा आदर्श सुरु ठेऊ – सनी निम्हण

खेळाडूंना पुनीत बालन यांच्याकडून लाखो रुपयाचे सहाय्य जाहीर   पुणे : स्व. विनायक निम्हण यांनी सुरु ठेवलेला आदर्श व सामाजिक कार्याचा वसा कायम सुरु ठेऊ असे आश्वासीत करत खेळ आणि…

इस्कॉन मंदिरातील सोहळ्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता

ठाणे : बाळकुम येथे नुकतेच इस्कॉन मंदिर उभारण्यात आले आहे. कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने या मंदिरात ५० हजाराहून अधिक भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील बाळकुम, कापूरबावडी, कोलशेत, ढोकाळी भागात मोठ्या कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाहतुक कोंडी…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी दुसऱ्या टप्प्यात

 १ लाख महिला ठरल्या पात्र एकूण लाभार्थी महिलांची संख्या सुमारे २ लाख ठाणे- राज्य सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील एक लाख अर्जांची छाननी ठाणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करून वेळेत…

आज डोंबिवलीतील वर्दळीचे रस्ते वाहतुकीसाठी बंद

डोंबिवली : डोंबिवलीतील राजकीय दहीहंड्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर बांधण्यात येतात. या कालावधीत रस्त्यांवर वाहन कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशावरून मंगळवारी कृष्ण अष्टमीच्या दिवशी दहीहंडी उत्सव असलेल्या रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी रस्ते मार्गावरून वळविण्यात आली आहे. डोंबिवली पूर्व भागातील बाजीप्रभू चौकात भाजपतर्फे दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. सर्वाधिक वर्दळीचा फडके रस्ता आणि रेल्वे स्थानक भागाशी निगडित हा चौक आहे. या चौकात मंगळवारी वाहन कोंडी होऊ नये म्हणून फडके रस्त्याने बाजीप्रूभ चौक भागात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना फडके रस्त्यावरील महावितरण कार्यालय आणि कुळकर्णी ब्रदर्स येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही सर्व वाहने फडके रस्त्यावरून डावे वळण घेऊन अंबिका हॉटेल, के. बी. विरा शाळेवरून पी. पी. चेंबर्स मॉल किंवा पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावरून इच्छित स्थळी जातील. मानपाडा रस्त्यावरील चार रस्ता पाटणकर चौक येथे फडके वॉच दुकानाच्या बाजुला मनसेतर्फे दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद रस्त्याने जोधपूर स्वीट ते गिरनार चौक भागातून चार रस्ता भागात येणाऱ्या वाहनांना अडथळा होणार आहे. त्यामुळे टंडन रस्त्याने, दत्तनगर भागातून राजेंद्र प्रसाद रस्त्याने चार रस्ता पाटणकर चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गिरनार चौक येथे प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने लेवा भवन सभागृह येथील छेद रस्त्याने किंवा दत्तनगर चौकातील टिपटॉप कॉर्नर म्हाळगी चौकातून दत्तनगर चौकातून, संगीतावाडी, प्रगती महाविद्यालय दिशेने इच्छित स्थळी जातील. मानपाडा रस्ता, टिळक चौकाकडून चार रस्त्यावरून दत्तनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पाटणकर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने संत नामदेव पथ, मानपाडा रस्ता, ग्रीन चौक, चिपळूणकर मार्गे इच्छित स्थळी जातील. डोंबिवली पश्चिमेत माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे फाऊंडेशनतर्फे पंडित दिनदयाळ रस्त्यावरील सम्राट चौकात दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवासाठी डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाकडून दिनदयाळ रस्त्याने सम्राट चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दिनदयाळ रस्त्यावरील गणपती मंदिर येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने गणपती मंदिराजवळ डावे वळण घेऊन जी. एन. गॅरेज, येलोरा सोसायटीकडून सम्राट हॉटेल चौकाकडून रेतीबंदर, माणकोली पूल दिशेने जातील. रेतीबंदर, जुनी डोंबिवली, मोठागाव, देवीचापाडा भागातून सम्राट चौकाकडे येणाऱ्या वाहनांना सम्राट चौक व्यंकटेश सोसायटी येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने सम्राट चौकात डावे वळण घेऊन नाना शंकरशेठ मार्गे घनश्याम गुप्ते रस्ता किंवा महात्मा फुले रस्ता मार्गे इच्छित स्थळी जातील. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना या प्रवेश बंदीमधून मुक्तता आहे. माणकोली पूल दिशेने जाणारी वाहने दिनदयाळ रस्त्यावरून धावतात. त्यामुळे रेतीबंदर चौक, गुप्ते रस्ता, सम्राट चौक भागात अभूतपूर्व वाहन कोंडी होण्याची शक्यता प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. या तिन्ही ठिकाणी पुरेसा वाहतूक पोलीस, पोलीस बंदोबस्त ठेवण्याची प्रवाशांची मागणी आहे.

मानाच्या समजल्या जाणाऱ्या टेंभीनाका हंडीकरिता, गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी  १ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक

अनिल ठाणेकर ठाणे : धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात टेंभीनाका येथे दहिहंडी उत्सव सुरु करुन साहसी उत्सवाला एका उंचीवर नेऊन ठेवले. तोच उत्साह, तीच तरुणाईची धुम, थरांचा थरार आणि गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची मांदियाळी, गीत संगीतासह भगव्याचा जल्लोष यंदा मंगळवार  २७ ऑगस्ट २०२४ रोजी टेंभीनाक्यावर पहायला मिळणार असून हा दिमाखदार सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे. मुंबईचा जल्लोष आणि उत्साह ठाण्यात आणण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी टेंभीनाक्यावरची हंडी मोठ्या जल्लोषात साजरी करण्याचा चंग बांधला. दिघेसाहेबानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा कायम ठेवत या महोत्सवाला वेगळे वलय निर्माण करुन दिले.  टेंभीनाक्यावरच्या  हंडीत बक्षीसांबरोबरच त्याच दिवशी जाहीर केलेली बक्षीसे रोख स्वरुपात देण्यात येऊ लागली. खास मराठमोळा साज दिमाखदार सोहळा व आकर्षक बक्षीसे यामुळे ठाण्यातील ही परंपरा असलेली हंडी ठाण्याची मानाची हंडी म्हणून ओळखली जात आहे. हा दिमाखदार सोहळा साजरा करताना ठाणे व मुंबईतील गोविंदा पथकांकरीता प्रत्येकी रोख बक्षीस व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. या हंडीसाठी जाहीर करण्यात आलेले बक्षीस हे मानवीशक्ती असलेल्या थरांकरीता आहे. दहीहंडी हा पारंपारिक उत्सव असला तरी तो एक साहसी खेळ आहे. या दहीहंडी महोत्सवात मुंबई व ठाण्यातील गोविंदासाठी वेगवेगळी हंडी लावण्यात येणार आहे. मुंबईतील गोविंदा पथकासाठी व ठाण्यातील गोविंदा पथकासाठी प्रत्येकी १ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महिला गोविंदा पथकासाठी १,००,०००/- रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तर सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी १२,००० हजार, सहा थरांसाठी ८,००० हजार, पाच थरांसाठी ६,००० हजार तर चार थर लावणाऱ्या गोविंदा पथकांसाठी ५००० हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. दहीहंडी फोडणान्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी रॅपलिंगसाठी असणारे दोरखंड वापरण्यात येणार असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख  ,खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे .या दहीहंडी उत्सवात नामवंत गायक तसेच चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांचा नृत्य व संगीतमय जल्लोष असणार आहे. तसेच सुप्रसिध्द मराठी व हिंदी चित्रपट व मालिकांमधील प्रसिद्ध नायक/नायिका उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राच्या लोककलेचा नृत्याविष्कार सुप्रसिध्द लावणी सम्राज्ञी आपल्या आकर्षक नृत्याने प्रेक्षकांचे मनोरंजन तसेच या उत्सवात आपल्या सुमधूर व जल्लोषमय गाण्यांनी येणाऱ्या गोविंदांना बेधुंद करणार आहेत. त्याचबरोबर उत्तम असा साउंड तसेच नेत्रदिपक रोषणाई या कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहे. हा दहीहंडी महोत्सव यशस्वी करण्याकरिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, हेमंत पवार (शिवसेना ठाणे शहर विधानसभा  प्रमुख ,टेंभीनाका मित्रमंडळाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे विभाग प्रमुख कमलेश चव्हाण आदी विशेष प्रयत्न करीत असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख ,खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केले आहे.