Category: ठाणे

Thane news

  प्रभाग क्र. ८ मध्ये पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा

प्रभाग क्र. ८ मध्ये पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा नगरसेविका कांचन कुलकर्णी आक्रमक कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्र. ८ मध्ये गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास कॉंग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. प्रभाग क्र. ८ या प्रभागात बहुसंख्य मुस्लिम बांधव वास्तव्यास असून सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना गेल्या दहा दिवसांपासून बिना पाण्याचे राहावे लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. निवडणुकीच्या काळात या भागात पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात पुरवले जात होते. मात्र निवडणुकीनंतर अचानक पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पुढील आठ दिवसांच्या आत प्रभाग क्र. ८ मधील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत व नियमित करावा, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने आयुक्त, महापौर तसेच संबंधित अधिकारी यांच्या निवासस्थानाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाची राहील असा इशारा नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी दिला आहे.

पाच हजार कर्मचाऱ्यांना दिलासा, कंत्राटी शिक्षकही होणार कायम – संजय केळकर

पाच हजार कर्मचाऱ्यांना दिलासा, कंत्राटी शिक्षकही होणार कायम – संजय केळकर ठाणे-ठाणे महापालिकेत झालेल्या संयुक्त बैठकीत आयुक्तांनी दिलेल्या तत्वतः मान्यतेनुसार सुमारे फायलेरिया विभागात कर्मचाऱ्यांसह पाच हजार कंत्राटी कामगारांना दिलासा मिळणार…

 अनिवार्य `वंदे मातरम’चा निर्णय ठाण्याच्या महापौरांनी टाळला

अनिवार्य `वंदे मातरम’चा निर्णय ठाण्याच्या महापौरांनी टाळला नगरसेविका अर्चना मणेरा यांची नाराजी ठाणे: केंद्र सरकारने राष्ट्रीय गीत `वंदे मातरम’चे पूर्ण गीत अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, ठाणे महापालिकेच्या प्रत्येक महासभेत सहा…

ठाणे, नवीमुंबई महानगपालिकेत भाजपाची शिंदेंच्या शिवसेनेला ठसण

 ठाणे महानगर पालिकेच्या महासभेत व्यासपीठ सोडून भाजपाचे उपमहापौर मैदानात नवी मुंबईत भाजपाच्या महापौरांना शिवसेना नगरसेवकांचा घेराव, केला सभात्याग स्वाती घोसाळकर ठाणे : राज्यात आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून महायुतीतील भाजापा आणि…

 ‘मोर्चा’ या कथेस प्रथम क्रमांक तर ज्ञान तेच देव या कथेस द्वितीय क्रमांक

राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धा संपन्न ‘मोर्चा’ या कथेस प्रथम क्रमांक तर ज्ञान तेच देव या कथेस द्वितीय क्रमांक कल्याण : नाट्य रसिकहो कल्याण आयोजित राज्यस्तरीय कथा साहित्य अभिवाचन स्पर्धेत इरसाल स्टोरी टेलर्स, मुंबई यांनी सादर केलेल्या “मोर्चा” या कथेचे अभिवाचन प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. तसेच ज्ञान वैखरी, पुणे या संस्थेने सादर केलेल्या “ज्ञान तेच देव” या कथा अभिवाचनास द्वितीय क्रमांकाचे व प्रायोगिक रंगमंच संघ, मुंबई यांनी सादर केलेल्या “राडा” या कथा अभिवाचनास तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे. तसेच  स्टुडिओ- ६४ पुणे या संस्थेच्या “डियर फादर”, सुमंगल फाउंडेशन कल्याण या संस्थेच्या “गुडघ्या एवढ्या महापुराची कहाणी” व प्रायोगिक रंगमंच संघ, मुंबई  यांच्या बेईमान या कथा अभिवाचनाला सांघिक उत्तेजनार्थ क्रमांक जाहीर झाला असल्याचे नाट्य रसिकहोचे अध्यक्ष व प्रमुख आयोजक सुरेश पवार यांनी सांगितले. या राज्यस्तरीय कथा साहित्य अभिवाचन स्पर्धेसाठी मुंबई, पुणे, नाशिक ठाणे तसेच कल्याण डोंबिवली मधील एकूण २३ संघांचा सहभाग होता. कल्याण मधील आचार्य अत्रे रंगमंदिर येथील कॉन्फरन्स हॉलमधील या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ करिता नगरसेविका आर्या नाटेकर, ज्येष्ठ साहित्यिक व रंगकर्मी भिकू बारस्कर, नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे कार्यकारणी सदस्य शिवाजी शिंदे, नाट्य परिषद कल्याण शाखेचे अध्यक्ष रवींद्र सावंत, बालरंगभूमी परिषद कल्याण अध्यक्षा सुजाता डांगे, ज्येष्ठ अभिनेते राम दौंड, आनंद जाधव, सुधीर चित्ते, डॉ. प्रदीप सरवदे, किरण डांगे आणि राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे ठाणे जिल्हाध्यक्ष हेमंत यादगिरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ नाट्य अभ्यासक आणि चतुरस्त्र रंग कर्मी अरुण कदम व आकाशवाणी वृत्त निवेदिका तसेच अनेक अभिवाचन कार्यक्रमाच्या अनुभव असलेल्या श्रद्धा वझे यांनी परीक्षण केले. नाट्य रसिकहो अध्यक्ष म्हणून बोलताना सुरेश पवार म्हणाले की, यंदाचे या स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे. व यंदाचा प्रतिसाद हा अधिकच सुखावह असाच असल्याने यापुढे सदर स्पर्धा अधिकाधिक आकर्षक व दर्जेदार करण्यासाठी निश्चितच कटिबद्ध राहू असे सांगितले.  याप्रसंगी अभिनेते सुधाकर वसईकर, अविनाश साळवी, विशाल राऊत, निलेश शास्त्री, किरण खांडगे, माणिक शिंदे, सिताराम शिंदे, महेश जोशी, हेमंत कर्णिक, डोंगरे, आदी मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती.

संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन ठाणे :- थोर समाजसुधारक, स्वच्छता व सामाजिक समतेचे प्रणेते संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) वरुणकुमार सहारे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शशिकांत गायकवाड, तहसीलदार (सर्वसाधारण) सचिन चौधर, तहसीलदार (संगणक/सांख्यिकी) संदीप थोरात, तहसीलदार (रेतीगट) अमोल कदम तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संत गाडगे महाराज यांनी कीर्तनांच्या माध्यमातून समाजात स्वच्छता, नैतिकता आणि समतेचा संदेश दिला. त्यांच्या कार्यातून समाजजागृतीची चळवळ उभी राहिली.

 ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रात स्वतंत्र वाहतूक विभागासाठी ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’ची मागणी

ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रात स्वतंत्र वाहतूक विभागासाठी ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’ची मागणी डंपर अपघाताने दिला इशारा कल्याण  : भरधाव डंपरच्या धडकेने नुकतेच टिटवाळा हादरले आणि शहरातील वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा ठळकपणे समोर आल्या. वाढती जड वाहनांची वर्दळ, अपुरे नियंत्रण आणि मनुष्यबळाची कमतरता यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची भावना नागरिकांत तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, टिटवाळा शहर यांच्यावतीने ॲड. जितेंद्र जोशी यांनी स्वतंत्र वाहतूक विभाग स्थापन करण्याची ठाम आणि व्यापक मागणी केली आहे. नुकत्याच झालेल्या डंपर अपघातात वाहनांचे नुकसान होऊन वाहतूक कोंडी निर्माण झाली. या घटनेने केवळ टिटवाळ्यातीलच नव्हे तर संपूर्ण ठाणे ग्रामीण परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि जड वाहनांच्या सततच्या रहदारीमुळे प्रभावी व समर्पित वाहतूक शाखेची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत आहे. महत्वाचे म्हणजे, ही मागणी केवळ टिटवाळा किंवा कल्याण तालुका पोलीस ठाण्यापुरती मर्यादित नसून, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय व त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांसाठी स्वतंत्र वाहतूक विभाग स्थापन करण्याची आहे. सध्या उपलब्ध पोलीस यंत्रणेवर कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण या दोन्ही जबाबदाऱ्या असल्याने कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे मत व्यक्त होत आहे. या मागणीचा पाठपुरावा करत ॲड. जोशी यांनी  पोलीस महासंचालक, महाराष्ट्र यांची सुनियोजित भेट मिळावी यासाठी अधिकृत अर्ज सादर केला आहे. भेट निश्चित झाल्यानंतर ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा, आवश्यक मनुष्यबळ, विशेष पथके आणि जड वाहनांवर कठोर नियंत्रण यासाठी ते प्रखरपणे भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कुत्रा चावल्यानंतर रेबिज रिपोर्ट पॉझेटीव्ह आल्याने ३० वर्षीय युवकाची आत्महत्या

कुत्रा चावल्यानंतर रेबिज रिपोर्ट पॉझेटीव्ह आल्याने ३० वर्षीय युवकाची आत्महत्या कल्याण : कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात कुत्रा चावल्यानंतर रेबिजचा रिपोर्ट पॉझेटीव्ह आल्याने त्यापासुन होणारा त्रास आपल्या आईवडीलांना सहन होणार नाही या भावनेने ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आयेश विश्वनाश अमिन असे या युवकाने नांव असून त्याच्या पश्चात एक भाऊ आणि वृध्द आई वडील असा परिवार आहे. तिसगांव नाक्यावरील सहजीवन सोसायटी मध्ये राहणारा आयेश विश्वनाथ अमीन (३०) असे मृत युवकाचे नाव आहे. तो गेली आठ वर्षांहून अधिक काळ भारत बँक, ठाणे शाखेत नोकरी करत होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तिसगांव नाका परिसरात एका भटक्या कुत्र्याने आयेश यांच्या पायाला चावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी केवळ एकच इंजेक्शन घेतल्याचे सांगितले जाते. मागील चार दिवसांपासून त्यांच्या हालचालींमध्ये असामान्य बदल जाणवत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. दरम्यान, काल सायंकाळी घरात कोणीही नसताना आयेश यांनी आपण आत्महत्या का करीत आहोत याबाबतची सुसाईड नोट लिहून गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या सुसाईड नोट मध्ये ‘आपल्याला रेबिजमुळे जो त्रास होणार आहे तो त्रास आपले आई वडील सहन करू शकणार नाहीत त्यामुळे आपण आत्महत्या करीत असून आपल्या मृत्युस कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये’ असे त्याने नमुद केले असून या सुसाईड नोट सोबत डॉक्टरांचे प्रिशेपशनही जोडले असल्याचे समजते.या प्रकरणाचा पुढील तपास कोळसेवाडी पोलीस ठाणे करत आहेत.

‘माझी वसुंधरा’अभियानात केडीएमसीला प्राप्त झालेला दीड कोटीचा पुरस्कार ही अभिमानास्पद बाब – महापौर हर्षाली चौधरी

‘माझी वसुंधरा’अभियानात केडीएमसीला प्राप्त झालेला दीड कोटीचा पुरस्कार ही अभिमानास्पद बाब – महापौर हर्षाली चौधरी कल्याण : माझी वसुंधरा अभियान ५.० (सन २०२४-२५) अमृत गटात कोकण विभागीय स्तरावर कल्याण डोंबिवली महापालिकेला प्राप्त झालेला दीड कोटीचा पुरस्कार ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी आज केले. महापालिकेला या मिळालेल्या पुरस्कारासाठी परिश्रम घेतलेल्या अधिकारी, कर्मचारी वर्गाच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन आज स्थायी समिती सभागृहात करण्यात आलेले होते. त्यावेळी बोलताना महापौरांनी हे प्रतिपादन केले आणि पुरस्कार प्राप्त अधिकारी, कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले. महानगरपालिका चांगले काम करीत आहे, याची पोचपावती म्हणजे हा पुरस्कार आहे. चांगल्या कामाचे समाधान नक्कीच मिळते, असे उद्गार महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आपल्या भाषणात काढले. तथापि कचऱ्याची समस्या मोठी आहे, यासाठी कचरा विलगीकरण करणे आवश्यक आहे. मनपा क्षेत्रातील गृहसंकुले, विद्यार्थी, एनजीओ यांच्या मदतीने याबाबतची जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश  त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या समन्वयाने शहराचा विकास पुर्णत्वास जावू शकतो, असे सांगत उप महापौर राहुल दामले यांनी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. पृथ्वी, जल, अग्नि, वायू आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये राज्यातील ४२२ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपला सहभाग दर्शविला होता. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी शहरात विविध पर्यावरणपूरक प्रकल्प, व्यापक जनजागृती मोहिमा, नागरीकांचा सक्रीय सहभाग तसेच पर्यावरण संवर्धन व साश्वत विकासासाठी तांत्रिक आणि व्यवहारीक उपयोजनांची अंमलबजावणी परिणामकारकरित्या करण्यात आली. त्यामुळे हे यश प्राप्त होण्यासाठी वर्षभर सातत्याने परिश्रम घेतलेले अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत) प्रशांत भागवत आणि त्यांचे सहकारी, अतिरिक्त शहर अभियंता (जनि:मनि:) जगदीश कोरे आणि त्यांचे सहकारी, पर्यावरणाचे उपआयुक्त समीर भुमकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे आणि त्यांचे सहकारी, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे आणि त्यांचे सहकारी, मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव आणि त्यांचे सहकारी तसेच कार्यकारी अभियंता शैलेश मळेकर, मनोज सांगळे, या अभियानाचे शहर समन्वयक गितेश झुंझारराव, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे व मनपाच्या सोशल मिडीया टिमचे उमेश यमगर तसेच या अभियानासाठी परिश्रम घेतलेले इतर अधिकारी/कर्मचारी वर्ग यांचा महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल, उपमहापौर राहुल दामले व उपस्थित शिवसेना गटनेते‍ विश्वनाथ राणे, भाजपा गटनेते शशिकांत कांबळे, काँग्रेस गटनेते कांचन कुलकर्णी, एनसीपी गटनेते रमीज मनीयार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यावरण विभागाचे उपआयुक्त समीर भुमकर आणि सुत्रसंचालन महापालिका सचिव किशोर शेळके यांनी केले. महानगरपालिकेने ऊर्जा संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत महाराष्ट्र शासनाने  “Certificate Of Excellence” हा पुरस्कार महानगरपालिकेला जाहीर केला,  ऊर्जा संवर्धन क्षेत्रात योगदान दिल्याबाबत महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता (विद्युत /यांत्रिकी) प्रशांत भागवत आणि त्यांचे सहकारी यांचा  महापौर, आयुक्त व  उपमहापौर यांच्या हस्ते सन्मानपत्र  व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 १० वीच्या लेखी परीक्षेदरम्यान वीजपुरवठा खंडित

१० वीच्या लेखी परीक्षेदरम्यान वीजपुरवठा खंडित राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार कल्याण :  इयत्ता १० वीच्या पहिल्या लेखी परीक्षेदरम्यान शाळेत वीजपुरवठा खंडित झाल्याची घटना कल्याणमधील अनेक शाळांमध्ये घडली होती. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला असून याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कल्याण पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष रुपेश थळे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण अधिकारी भारत बोरनारे यांची भेट घेत निवेदन देत वीजपुरवठा खंडित झाल्यास शाळांनी पर्यायी व्यवस्था तयार ठेवण्याची मागणी केली. यावेळी भानुदास घुगे, दिनेश मढवी, प्रेमनाथ मढवी, मजरखान पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते. २० फेब्रुवारीला इयत्ता १० वीचा पहिला लेखी पेपर सुरू असताना कल्याण डोंबिवली महानगर पालिका शेत्रातील शाळांमध्ये सकाळी ११:३० वाजे पासून वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना अत्यंत उकाडा व अस्वस्थतेमध्ये परीक्षा द्यावी लागली. इयत्ता १० वीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असते. वर्षभर कष्ट करून तयारी केलेल्या वि‌द्यार्थ्यांना योग्य वातावरण मिळणे आवश्यक आहे. मात्र वीज नसल्यामुळे पंखे, लाईट तसेच इतर आवश्यक सुविधा बंद होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता बाधित झाली व त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. ही बाब अत्यंत गंभीर असून भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी संबंधित शाळांना वीजपुरवठा नियमित व अखंडित ठेवण्याबाबत तात्काळ उपाययोजना करावी, तसेच या घटनेची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी रुपेश थळे यांनी केली आहे.