Category: ठाणे

Thane news

ठाणे स्थानकाजवळ रेल्वेची संरक्षण भिंत कोसळली

एक वृद्ध जखमी     ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक येथील फलाट क्रमांक दोन जवळ रेल्वेच्या २० फूट उंच संरक्षण भिंतीचा भाग कोसळून वृद्ध जखमी झाले. नरेंद्र कोळी (६२) असे जखमीचे नाव असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वीच ही भिंत बांधली होती. जमीन खचल्याने ही भिंतीचा भाग कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी रेल्वे रुळ ओलांडू नये तसेच रुळांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाने ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील फलाट क्रमांक दोनजवळील कोळीवाडा भागात भिंत उभारली होती. शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास या भिंतीचा ६० फूट लांब आणि २० फूट उंच भाग कोसळला. याच दरम्यान, नरेंद्र कोळी हे या भागातून जात होते. कोळी या घटनेत जखमी झाले. त्यांच्या पायाला दुखापत झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिका, रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धोकापट्टी उभारली आहे. जमीन खचल्याने ही भिंत कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 00000

सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे शहरातील बेकायदेशीर

पब्ज-बार व अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर महापालिकेची धडक कारवाई   ठाणे : ठाणे शहरातील पब्ज, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याची कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही…

कल्याण- डोंबिवलीत बीअरबार, मद्य विक्रीचे परवाने देण्यासाठी पालिकेची परवानगी आवश्यक

आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची माहिती   कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बहुतांशी बीअरबार, मद्य विक्रीची दुकाने अनधिकृत इमारतीत सुरू आहेत. या अनधिकृत बांधकामांमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.…

माझा प्रभाग माझी जिम्मेदारी

ठाणे : कोपरी पूर्व च्या शिवसेना विधानसभा संघटिका सौं.मालती रमाकांत पाटील ( मा. नगरसेविका ) यांच्या अथांग प्रयत्नाने प्रभाग क्रमांक 20 (अ) शांतीनगर कोपरी ठाणे पूर्व येथे नव्याने नूतनीकरण करण्यात…

अजय जेया यांच्या जनजागृती अभियानाचा, ठाणे वाहतूक शाखेने घेतला धसका…

टोइंग व्हॅनच्या माध्यमातून होणारी बेकायदेशीर वसुली तूर्तास बंद!     ठाणे : ठाणे शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले अजय जेया हे, सुमारे वर्षभरापासून टोइंगच्या माध्यमातून होणारा गैरप्रकार, लोकांसमोर मांडत आलेले…

पावसाळा सुरु होताच प्रवाशांचे हाल सुरु; शहरात रिक्षांचा तुटवडा

ठाणे : पावसाळा सुरु होताच, ठाणे शहरातील मुख्य तसेच अंतर्गत मार्गांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीत रिक्षा अडकून पडत आहेत. याचा फटका सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना बसू लागला आहे. सायंकाळच्या वेळी…

क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षणासाठी प्रवेशासाठी नोंदणी करण्याचे जिल्हा क्रीडा कार्यालयाचे आवाहन

ठाणे : महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनी मध्ये सन 2024-25 या वर्षा करीता सरळ व कौशल्य चाचणीद्वारे खेळाडूंना निवासी व अनिवासी प्रवेश…

विश्वास सामाजिक संस्थेतर्फे आज रानभाज्यांचे प्रदर्शन

ठाणे : विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने रानभाज्या व औषधी वनस्पतींचे प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे उद्या शनिवारी (ता. २९) आयोजन करण्यात आले आहे. नौपाडा येथील सरस्वती विद्या मंदिरात उद्या सायंकाळी ५…

आदिवासी विकास विभागाच्या नोव्हेंबर 2023 रोजीच्या पदभरती जाहिरातीला तूर्तास स्थगिती- आदिवासी विकास आयुक्त

ठाणे : आदिवासी विकास विभागामधील 602 विविध रिक्त पदांकरिता आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाकडून दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिध्द करुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. सामाजिक व शैक्षणिक…

वाडा परिसरातील सहा वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल सव्वा पाच लाखांची वीजचोरी उघडकीस

वसई : महावितरणच्या वाडा उपविभागातील वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम निरंतर सुरू आहे. कारवाईनंतर वीजचोरीच्या देयकाचा मुदतीत भरणा न करणाऱ्या सहा जणांविरूद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार जव्हार पोलिस…