Category: ठाणे

Thane news

‘राजावाडी’च्या शवविच्छेदन केंद्राचे काम पूर्ण

मृतांच्या नातेवाईकांसाठी पाणपोई व इतर सुविधा घाटकोपर, ता. १ (बातमीदार) ः घाटकोपर येथील राज्य सरकारच्या अखत्यारीतील राजावाडी शवविच्छेदन केंद्राच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. केंद्राची मोडकळीस आलेली इमारत, शवविच्छेदन सुरू असताना नातेवाईकांना बसायला नसलेली जागा, पाणपोई आदी सुविधा आता निर्माण झाल्या आहेत. विशेष म्हणजे यासाठी पोलिस सर्जन डॉ. कपिल पाटील तसेच शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी यांनी सतत पाठपुरावा केला होता. अखेर या केंद्राला आता नवी झळाळी मिळाली आहे. पालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाजवळील हे शवविच्छेदन केंद्र फारच जुने होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. मोडकळीस आलेली इमारत, छत कोसळण्याचे प्रकार, मृतांच्या नातेवाईकांची आसन व्यवस्‍था, पिण्याचे पाणी, अस्‍वच्छता, कमी मनुष्यबळ अशा तक्रारींत वाढ झाली होती. याची दखल घेत केंद्राचे मुख्याधिकारी, पोलिस सर्जन डॉ. कपिल पाटील यांनी या ठिकाणी पाहणी करून राज्याचे वैद्यकीय उपसंचालक यांच्याकडे सतत पत्रव्यवहार केला होता. दररोज ४० मृतदेहांची चिकित्सा घाटकोपरच्या या केंद्रावर नवी मुंबई, मुंबई उपनगरे तसेच ठाण्यापासून ते अगदी रेल्वेच्या हद्दीतील मृतांचे शवविच्छेदन केले जाते. रोज हा आकडा सरासरी ३५ ते ४० इतका असतो. मात्र त्या तुलनेत सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकदा नागरिकांना याचा त्रास होत होता. याची दखल घेत डॉ. पाटील यांनी पोलिस सर्जन म्हणून नागपाडा येथे पदभार घेतल्यानंतर कमी वेळेत या केंद्राचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

कल्याण लोकसभेसाठी ८४ टेबल्सवर मतमोजणी होणार

कल्याण : कल्याण लोकसभेसाठी २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्याची मतमाेजणी डोंबिवली पूर्वेतील वै. हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडागृहात ४ जूनला सकाळी ८…

‘शिळफाटा रस्त्यावरील मेट्रोची दिखाव्याची कामे बंद करा!’

मनसे आमदार राजू पाटील यांची ‘एमएमआरडीए’वर टीका कल्याण : शिवसेना-भाजपवर विकास कामांच्या माध्यमातून नेहमीच टिकेची झोड उठविणारे मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी महायुतीचा धर्म बाजुला ठेऊन…

जड-अवजड वाहनांमुळे घोडबंदर मार्गावर कोंडी

एक किलोमीटर अंतर गाठण्यासाठी दोन तास ठाणे : ठाणे आणि मुंबई अहमदबाद मार्गांना जोडणाऱ्या घोडबंदर मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या मार्गावर जड अवजड वाहनांना बंदी घालण्यात…

जिल्हा परिषदेचे ८१ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान

मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते ठाणे : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियान अंतर्गत प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येत आहे या अनुषंगाने सेवानिवृत्त होत असलेल्या ८१ अधिकारी…

आरटीई प्रवेशासाठी १८ हजार ८०७ अर्ज प्राप्त, ४ जूनपर्यत मुदतवाढ –  बाळासाहेब राक्षे

ठाणे : जिल्ह्यात ११ हजार ३७७ जागासाठी १८ हजार ८०७ अर्ज प्राप्त झाले आहेत. आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने १७ मे पासून सुरु करण्यात आलेली आहे. आरटीई प्रवेशासाठी…

बोराळेपाडा भागातील विद्यार्थ्यांसाठीची यांत्रिक बोट चालू स्थितीत – अशोक शिनगारे

अनिल ठाणेकर ठाणे : शहापूर तालुक्यातील तानसा धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील बोराळे पाडा भागातील विद्यार्थ्यांसाठी असलेली यांत्रिक बोट सुव्यवस्थित असून शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ने आण करण्याचे काम नियमितपणे सुरू होईल.…

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

कासा : गेल्या काही दिवसांपासून कासा, चारोटी परिसरातील वीजपुरवठा नेहमी खंडित होत आहे. त्यामुळे विद्यार्थी, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने परिसरात ऑनलाईन सेवा-सुविधा केंद्राचे…

गंगाधर जामनिक यांनी शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी उत्तम कार्य केले – उपसंचालक डॉ.गणेश मुळे*

अशोक गायकवाड पालघर : शासकीय सेवा काळात गंगाधर जामनिक यांनी शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी उत्तम कार्य करून शासकीय कामकाजाबरोबरच सामाजिक भान ठेवून समाज उपयोगी कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. असे प्रतिपादन…