Category: ठाणे

Thane news

आठ दिवसांत अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करू

भाजपा माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांचा इशारा रोहिणी दिवाण ठाणे : घाटकोपर येथील महाकाय होर्डिंग्ज दुर्घटनेनंतर ही ठाणे महापालिका प्रशासनाचे ठाण्यात ठिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंग्ज बाबत कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही.  शहरात एखादी दुर्घटना घडून निरपराध माणसांचे जीव गमावण्याची हे सुस्त प्रशासन वाट पाहत आहे का असा प्रश्न ठाणेकर नागरिक विचारत आहेत. ठाणेकर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि घाटकोपर सारखी दुर्घटना घडू नये यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना त्वरीत शहरांतील अनधिकृत होर्डिंग्ज मोजणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.अन्यथा महापालिकेच्या समोर  तीव्र  आंदोलन करण्याचा सज्जड इशारा भाजपाच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दिला आहे.  आज ठामपा समोर. अनधिकृत होर्डिंग्ज वर कारवाई करण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात आले.त्या वेळी महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. ठामपा बरखास्त होऊन तीन वर्षे लोटली असून सध्या महापालिकेचा कारभार प्रशासन हाकत आहे.  परंतू तत्पूर्वी २०१९ मध्ये तत्कालीन महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत प्रश्नोत्तराच्या तासाला आपण  शहरातील अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग्ज संख्या बाबत माहिती विचारली असता  अधिकृत होर्डिंग्जची संख्या ५९६ असल्याचे  सांगण्यात आले होते.तर अनधिकृत होर्डिंग्ज बाबत  कोणतीही मोजणी झाली नसल्याची माहिती  दिल्यानंतर माजी महापौरांनी त्वरीत मोजणी करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. परंतू  पाच वर्षांनंतरही सुस्तावलेल्या महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग्ज बाबत कोणतीही मोजणी केली नसून  कोणाच्या आशिर्वादाने ठाणे शहरात अनधिकृत होर्डिंग्ज लावून शहर विद्रूप केले जात आहे,असा संतप्त सवाल माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केला आहे. तरी  घाटकोपर होर्डिंग्ज सारखी दुर्घटना होण्यापूर्वी  अनधिकृत होर्डिंग्ज मोजणी करून त्वरीत होर्डिंग्ज काढण्याची कारवाई करण्यात यावी नाही तर  महापालिका समोर  तीव्र आंदोलन करू असा इशारा महापालिका प्रशासनाला दिला.

ठाण्यात होर्डींगची ‘झाडाझडती’

ठाणे : मुंबईच्या घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यामुळे काही जणांचा मृत्यू झाला होता. त्यापार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेकडून आता अशी दुर्घटना ठाण्यात घडू नये म्हणून होर्डींगची झाडाझडती सुरु करण्यात आली आहे.अनेक होर्डिंग मालकांना नोटीस पाठवली आहे. तसेच अनधिकृत होर्डिंग महापालिकेकडून…

‘यू विन पोर्टल’मार्फत नियमित लसीकरण – डॉ. गंगाधर परगे

  ठाणे: जिल्ह्यातील गरोदर माता व बालक लसीकरण विना राहू नये तसेच बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता ‘यू विन पोर्टल’वर नोंद…

महाविद्यालयीन शिक्षकेतर संघाचा आमदार निरंजन डावखरे यांना पाठिंबा

ठाणे : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांना विविध संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत असून, अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघानेही आमदार डावखरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. संघाचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंह, सरचिटणीस माधव राऊळ यांनी आमदार डावखरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल, असा विश्वासही व्यक्त केला. कोकणातील महाविद्यालयांमधील हजारो कर्मचारी अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाचे सदस्य आहेत. कोकणातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार डावखरे यांनी सातत्याने पुढाकार घेतला. अशासकीय शिक्षकेतरांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात बैठका आयोजित करण्यासाठी प्रयत्न करून, अनेक प्रश्नांवर तोडगाही काढला. त्याचे कोणतेही श्रेय न घेता प्रामाणिकपणे शिक्षकेतर संघाला मदत केली. त्यामुळे संघाने सलग दुसऱ्या निवडणुकीत आमदार निरंजन डावखरे यांना पाठिंबा दिला, असे संघाचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंह यांनी सांगितले. कोकणातील पदवीधर मतदारांपर्यंत शिक्षकेतर कर्मचारी पोचून डावखरेंचा मोठ्या मताधिक्याने विजय घडवून आणतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, यापूर्वी कोकणातील शिक्षकांची अग्रगण्य संघटना दिवंगत माजी आमदार स्व. रामनाथ मोते यांच्या विचाराने कार्य करणारी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना, आमदार किसन कथोरे यांचा महाराष्ट्र राज्य स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघाने आमदार डावखरे यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पदवीधर मतदारांबरोबर संपर्क साधला जात आहे.

महाविद्यालयीन शिक्षकेतर संघाचा आमदार निरंजन डावखरे यांना पाठिंबा

ठाणे : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांना विविध संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत असून, अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघानेही आमदार

वाऱ्याने हलणारे होर्डिंग ठाणे महापालिका काढणार!

ठाणे :  पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील वाऱ्याने हलणारे होर्डिंग तत्काळ काढण्यात येणार आहे. त्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. तसेच, महापालिकेने होर्डिंग मालक आणि जागा मालक यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्याचबरोबर, या होर्डिंगच्या नव्याने प्राप्त झालेल्या स्थिरता प्रमाणपत्राची (स्टॅबिलिटी रिपोर्ट) छाननी करण्याचा निर्णयही महापालिकेने घेतला आहे. सेवा रस्त्यावरील मुक्ता अडर्व्हटायझिंग कंपनीकडे असलेले होर्डिंग वाऱ्याने हलत असल्याची तक्रार आल्यानंतर तेथे जाहिरात विभाग उपायुक्त दिनेश तायडे, उथळसर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यासह महापालिकेच्या अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीनंतर, कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी हे होर्डिंग काढले जात आहे. तसेच, जागामालक व होर्डींग कॉन्ट्रॅक्टरला नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. 00000

शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती – अमोल यादव

ठाणे : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी निवडणूक आयोगामार्फत मतदारसंघनिहाय  निवडणूक निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाच्या प्रसिध्दी पत्रकानुसार २६ जून २०२४ रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचे मतदान होणार आहे.  या निवडणूकीच्या अनुषंगाने मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी श्रीमती. अंशु सिन्हा,भाप्रसे (एमएच:99) यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती. सिन्हा यांचा दूरध्वनी क्रमांक 9920793676 असून त्यांचा ईमेल आयडी anshus72@yahoo.com असा आहे. उमेदवार,राजकीय पक्ष,मतदार व नागरिकांना विभागीय आयुक्त कार्यालय, पहिला मजला, जुनी सचिवालय, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई -32 या कार्यालयात सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या वेळेत श्रीमती. सिन्हा यांच्यांशी संपर्क साधता येईल. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी एन नवीन सोना, भाप्रसे (एमएच:2000) यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  श्री. सोना यांचा दूरध्वनी क्रमांक 8591248668 असून त्यांचा ईमेल आयडी nawin.sona@gmail.com असा आहे. उमेदवार,राजकीय पक्ष,मतदार व नागरिकांना विभागीय आयुक्त कार्यालय,पहिला मजला, जुनी सचिवालय, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई -32 या कार्यालयात सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 या वेळेत श्री. सोना यांच्यांशी संपर्क साधता येईल.मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी डॉ.महेंद्र कल्याणकर, भाप्रसे (एमएच:2007) यांची निवडणूक निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  डॉ. कल्याणकर यांचा दूरध्वनी क्रमांक 9324565110 असून त्यांचा ईमेल आयडी mahendrakalyankar@gmail.com असा आहे. उमेदवार,राजकीय पक्ष,मतदार व नागरिकांना विभागीय आयुक्त कार्यालय,पहिला मजला, जुनी सचिवालय, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई -32 या कार्यालयात सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 या वेळेत डॉ. कल्याणकर यांच्यांशी संपर्क साधता येईल.

आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील घोडबंदर रोड येथील गायमुख चौपाटीजवळील विसर्जन घाट आणि दशक्रिया घाट या कामांची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना कामासंबंधी सूचना दिल्या. यावेळी, ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र समन्वयक साजन कासार, विभाग प्रमुख रवि घरत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

स्वस्तिक संघाला विजेतेपद

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भाईंदर : येथे नुकत्याच  झालेल्या बालयोगी श्री सदानंद महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत  स्वस्तिक क्रीडा मंडळाने विजेतेपदाचा मान मिळवला. स्वस्तिकने‌ उपांत्यफेरी मध्ये ओवळी क्रीडा  मंडळाचा आरामात पराभव केला. तर  अंतिम सामन्यामध्ये त्यांनी…

अर्धवट रस्त्याच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी !

सलमान पठाण ठाणे : नुकत्याच मुंबई आणि ठाण्यात झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं बघायला मिळालं. कापूरबावडी ते बाळकूम रोडवरील कोलशेतकडे जाणाऱ्या नाक्यावर मोठया  प्रमाणात पाणी साचले आहे.  अवघ्या १ तास पडलेल्या पावसातच  इथे पाणी साचलेले दिसले. या साचलेल्या पाण्यामुळे मोठया प्रमाणात ट्राफिक  जामचा वाहनचालकाला त्रास होत आहे. गाडी चालवताना ड्रायव्हयर्सना योग्य ती खबरदारी घ्यावी लागत आहे.  महत्वाचं म्हणजे  याठिकाणी रस्त्यावर खोदकाम सुरू आहे. आणि…