Category: ठाणे

Thane news

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाजरत्न पुरस्काराने सन्मान

ठाणे : जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष निलेश सांबरे यांना न्यू हिंदुस्थान कामगार सेनेने समाज रत्न पुरस्कार २०२३-२४ ने सन्मानित केले. कल्याण पश्चिम येथील मराठा मंदिर सभागृहात न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्यावतीने…

सर्वजण महायुतीचा धर्म पाळतील

नरेश म्हस्के यांचा विश्वास ठाणे : कार्यकर्ते हे साहजिकच संजीव नाईक यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. आपल्या नेत्याला उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे त्यांना वाईट वाटणारच. परंतु ही महायुती असल्याने ही परिस्थिती निवळेल आणि सर्वजण एकत्र कामाला लागतील आणि महायुतीचा धर्म पाळला जाईल असा विश्वास ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. गुरुवारी नवी मुंबईत नाईक यांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असतांना त्याचे पडसाद उमटत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. परंतु सर्वच जण महायुतीचा धर्म पाळतील असा विश्वास म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. म्हस्के हे गुरुवारी सकाळी गणेश नाईक यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या समवेत आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले आदी नेते मंडळी उपस्थित होते. आपण नाईक यांचा आर्शिवाद घेण्यासाठी गेलो होतो, त्यांच्यासह संदीप नाईक, सागर यांनाही भेटलो असल्याचे म्हस्के म्हणाले. मात्र कार्यकर्त्यांशी कुठल्याही भेटागाठी झालेल्या नाहीत. कार्यकर्त्यांची कुठे बैठक झाली याची माहिती नसल्याचेही ते म्हणाले. मी लहाणपणापासून नाईक यांना भेटत होतो. त्यावेळी देखील ते कौतुक करीत होते. आजही गणेश नाईक यांनी मला आर्शिवाद दिला आहे. काही चिंता करायची गरज नाही, नवी मुंबईतून लीड मिळेल, सर्व काही मी पाहीन काही अडचण असेल तर मला सांग अशा पध्दतीने त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली असल्याचेही त्यांनी सांगितले. मी साधारण, रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे. लोकांमधला कार्यकर्ता आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी दिलेली आहे. त्या संधीचे मी सोने करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांना शक्ती प्रदर्शनाच्या मुद्यावर छेडले असता, आम्हाला शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही, जी आमची शक्ती आहे, ती या ठिकाणी दिसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

डॉ. श्रीकांत शिंदे म्हणजे ‘खाण तशी माती’

मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांच्याकडून गौरवोद्गार डोंबिवली – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेत डोंगराएवढी कामे केली असून शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच गुण तुमच्यात आले असून ‘खाण तशी माती’ याचे हे उदाहरण असल्याचे गौरवोद्गार मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी काढले. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बाळा नांदगावकर बोलत होते. तर शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांचा डीएनए एकच असून मनसेने दिलेल्या पाठींब्यामुळे महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले. डॉ. श्रीकांत शिंदे हे मनसेचेच उमेदवार असल्याचे समजून काम करा, असे आवाहन यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. आपली महायुती लोकसभेप्रमाणेच विधानसभा आणि महापालिका यातही कायम राहिल्यास महाराष्ट्राला अपेक्षित असलेले चित्र नक्कीच दिसू शकेल, असा विश्वासही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. धर्मवीर आनंद दिघे आणि राजसाहेब ठाकरे यांचे वेगळे नाते होते. तसेच नाते आज राजसाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे असून ही निवडणूक देशाची आहे. त्यामुळे देशाच्या विकासासाठी मोदींजींचे हात बळकट करणे, हे आपले कर्तव्य असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले. तसेच ४ जून रोजी ज्यावेळेस कल्याण लोकसभेचा निकाल लागेल, त्यावेळेस मनसेच्या कार्यकर्त्यांचाही त्यात तितकाच वाटा असेल, असे शिंदे यांनी ठामपणे सांगितले. ‘एक ठाकरे धनुष्यबाणाला, तर दुसरे ठाकरे पंजाला मत देणार!’ यावेळी बोलताना ज्या विचारांमुळे शिवसेना वाढली, ते विचार सत्ता आणि खुर्चीसाठी विकण्याचे काम शिल्लक सेनेच्या नेत्यांनी केल्याची टीका श्रीकांत शिंदे यांनी केली. जे लोक सावरकरांना शिव्या देतात, त्यांचे शिवतीर्थावर स्वागत करण्याची नामुष्की यांच्यावर आल्याचे सांगत आज एक ठाकरे धनुष्यबाणाला, तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला मत देणार असल्याची घणाघाती टीकाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. कोरोनामध्ये राज्याला नेत्याची गरज होती, तेव्हा हे घरात बसून घोटाळे करत असल्याचे सांगत यांच्याकडे ‘सिम्पथी’ नव्हे, तर फक्त संपत्ती असल्याचा टोला खासदार शिंदे यांनी लगावला. या मेळाव्याला मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, माजी आमदार प्रकाश भोईर, डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहाराध्यक्ष राहुल कामत, ग्रामीण अध्यक्ष मनोज घरत यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण आशान, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, तसेच मनसेचे कल्याण लोकसभेतील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ‘एकीकडे हिऱ्यापोटी गारगोटी.. दुसरीकडे खाण तशी माती!’ या मेळाव्यात बोलताना मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली. आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुण दिसत असून हे गुण सगळ्याच मुख्यमंत्र्यांच्या मुलांमध्ये दिसत नाहीत, असे म्हणत आदित्य ठाकरेंना त्यांनी टोला लगावला. हाच धागा पकडून एकीकडे हिऱ्यापोटी गारगोटी, दुसरीकडे खाण तशी माती, असा टोला उद्धव ठाकरेंनाही त्यांनी नाव न घेता लगावला. ‘डॉ. श्रीकांत शिंदे हे मनसेचे उमेदवार आहेत, असे समजून काम करा!’ दरम्यान, डॉ. श्रीकांत शिंदे हे मनसेचेच उमेदवार आहेत, असे समजून काम करा, असे आवाहन यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी केले. आपण सर्वांनी जोमाने काम करायचे असून आपले काम ४ जून रोजी मतपेटीतून दिसले पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले.

रिपब्लिकन बहुजन सेनाचे उमेदवार विजय घाटे ठाणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

नितीन दूधसागर ठाणे : कुठे पोकळ आश्वासनांची खैरात , तर कुठे जातीय वादाची किनार घेऊन लोकसभा निवडणुकीत प्रचार करणाऱ्या लोकप्रतिनिधींना घरी बसविण्यासाठी “रिपब्लिकन बहुजन सेना” ने आपला उमेदवार श्री विजय ज्ञानोबा घाटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. २५  ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये मॅडम यांच्याकडे श्री. विजय घाटे यांनी उमेदवारी अर्ज सुपूर्त  केला आहे. महा युती आणि महा आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर ‘रिपब्लिकन बहुजन सेना’ ने २५ ठाणे लोकसभा मतदार संघात श्री विजय ज्ञानोबा घाटे यांना पक्षाचे तिकीट दिले आहे.  गुरुवारी ०२/०५/२०२४ रोजी , विजय घाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  ठाणे मतदार संघात जनतेला बदल हवा आहे , सामाजिक आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव विजय घाटे यांना असून , ते या निवडणुकीत नक्कीच करिष्मा करतील , असा विश्वास ‘रिपब्लिकन बहुजन सेना’ च्या कार्यकर्त्यांना आहे.  निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी  ‘रिपब्लिकन बहुजन सेना’चे राष्ट्रीय महासचिव श्री. मुश्ताकजी मलिक , केंद्रीय सल्लागार श्री . नरेशजी भोईर, राष्ट्रीय कोषाध्यक्षा सौ. संजीवनी लोखंडे , राष्ट्रीय प्रवक्ता  श्री जगदीशजी सोनटक्के, राष्ट्रीय किसान अध्यक्ष श्री. राज आर्याजी, महाराष्ट्र प्रवक्ते श्री . प्रा. व्यंकटेशजी कांबळे ,  ठाणे शहर प्रमुख श्री. शिवराज कोटे, माथाडी कामगार अध्यक्ष श्री. शौकत शेख, मजदूर युनियन आघाडी अध्यक्ष श्री. सुनील जैस्वार, महाराष्ट्र संघटक श्री. किशोर लासुरे, महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सौ. शोभा आर्याजी , बिल्डर असो.अध्यक्ष  श्री. हिम्मत विसरिया , मीरा-भायंदर अध्यक्ष श्री. अनिश कांबळे, नेहा जाधव, फरीद सय्यद, सज्जादभाई सय्यद, कामगार आघाडी नेते श्री. विनय डोळस ,इत्यादी मान्यवर रॅलीत उपस्थित होते.

आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मेपर्यंत मुदतवाढ

ठाणे : आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत दि. १६.०४.२०२४ ते ३०.०४.२०२४ या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. परंतु या प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी दि. १०.०५.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यासाठी दि. ०२/०५/२०२४ पर्यंत एकूण ४ हजार ४५० अर्जांची नोंदणी पूर्ण (CONFIRM) झालेली आहे व १४ हजार ९६५ अर्जांची नोंदणी अपूर्ण (NOT CONFIRM) असल्याचे दिसून येत आहे. तरी नोंदणी अपूर्ण असलेले बालकांचे अर्ज (NOT CONFIRM) दि. १०/०५/२०२४ पूर्वी पूर्ण (CONFIRM) करून घ्यावेत. तसेच या प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या (वंचित गट– SC/ST/NT/VJ/OBC/SBC , दुर्बल गट–१ लाखापेक्षा कमी उत्पन्न, दिव्यांग– बालकांचे ४०% अपंगत्व) जास्तीत जास्त पालकांनी प्रवेश प्रक्रियेत आपल्या बालकांची अर्ज नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता सर्व पंचायत समिती व महानगर पालिका मध्ये एकूण २ हजार ६२० पात्र शाळा असून एकूण ३६ हजार ८६८ रिक्त जागा उपलब्ध आहेत. आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून  https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new  या वेबसाईटवर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्व पंचायत समिती व महानगर पालिका स्तरावर मदतकेंद्र सुरू करण्यात आल्या आहेत. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी (Help Centre), ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual), आवश्यक कागदपत्र इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या वरील वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

मतदान टक्केवारीत घोटाळा;आव्हाडांचा आयोगावर आरोप

ठाणे : आतापर्यंत लोकसभेसाठी देशात झालेल्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदान टक्केवरीत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शरद पवार राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगावर केला आहे. निवडणूक आयोग मतदानाचे प्रत्यक्ष आकडे देण्याऐवजी…

शिंदेसेनेचे अबतक १४ !

ठाण्यात म्हस्के, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे, नाशिकमध्ये हेमंत गोडसे लढणार अनिल ठाणेकर ठाणे : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या ठाण्याच्या जागेवर अखेर शिंदेंच्या शिवसेनेने आपला हक्क कायम राखला आहे. शिंदेकडूंन नरेश म्हस्क यांना उमेदवारी…

गुजरातच्या भरभराटासाठी महाराष्ट्राचा गळा घोटला जातोय

जितेंद्र आव्हाड यांचा आरोप ठाणे : महाराष्ट्र कोणी हातात आणून दिलेला नाही, अनेक हुतात्मे यासाठी झाले. महाराष्ट्र हा पोवाड्यांनी गाजला, डफावार मुंबई पेटवली. महाराष्ट्र कधी दिल्लीसमोर झुकला नाही पण आज…

समुद्रालगतच्या १०० फूट उंच सुया सुळक्यावरून राज्याला मानवंदना

ठाणे : कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडवेंचर या गिर्यारोहन संस्थेने रत्नागिरी येथील समुद्रालगत असलेल्या सुमारे १०० फूट उंच सुया सुळक्यावरून महाराष्ट्र दिनानिमित्ताने राज्याला वंदन करत अनोखा विक्रम केला. मुख्य बाब म्हणजे…

मतदान जागृतीसाठी ठाणे महापालिकेने तयार केला मॅस्कॉट

नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन ठाणे : येत्या २० मे रोजी होणाऱ्या मतदानास जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिसाद द्यावा साठी स्विपअंतर्गत जनजागृती करण्यात येत आहे. ठाणे…