नगरसेविका दिपाली उमेश भगत यांचा वचनपूर्ती दौरा
नगरसेविका दिपाली उमेश भगत यांचा वचनपूर्ती दौरा नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य दिवा, दि. १६ फेब्रुवारी : ‘काम करत आलोय… काम करत राहू’ या शिवसेनेच्या ब्रीदवाक्याची प्रचिती देत दिवा पूर्वेतील बी.आर. नगर…
Thane news
नगरसेविका दिपाली उमेश भगत यांचा वचनपूर्ती दौरा नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य दिवा, दि. १६ फेब्रुवारी : ‘काम करत आलोय… काम करत राहू’ या शिवसेनेच्या ब्रीदवाक्याची प्रचिती देत दिवा पूर्वेतील बी.आर. नगर…
संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त दिव्यात गोरबंजारा समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती दिवा- संत सेवालाल गोर बंजारा समिती (दिवा) यांच्या वतीने संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि…
ओम म्हातार्डेश्वर मंदिरात दोन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन दिवा, ता. 16 फेब्रुवारी (आरती परब) – दिव्यातील म्हातार्डी गावात असलेल्या ऊॅ म्हातार्डेश्वर शिव मंदिरात दोन दिवसीय महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले…
ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धा ए टी स्पोर्ट्स दुसऱ्या फेरीत ठाणे : ए टी स्पोर्ट्सने डब्ल्यू एन एस ग्लोबल सर्व्हिसेस संघाचा एक गडी राखून पराभव करत सुवर्णमहोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन…
ठाणे जिल्हा ओपन सब-ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा गार्गी मोहितेला दुहेरी मुकुट ठाणे बॅडमिंटन अकॅडमीची अभूतपूर्व ‘क्लीन स्वीप’ कल्याण – कल्याण येथील गौतम सिंघानिया ग्लोबल स्कूल येथे ७ व ८ फेब्रुवारीला पार…
महाराष्ट्र चाईल्ड डेव्हल्पमेन्ट लेबर वेल्फेअरच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त वंचित, गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ठाणे – महाराष्ट्र चाईल्ड डेव्हल्पमेन्ट लेबर वेल्फेअरच्या वतीने २५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वंचित,…
कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रातील सीआरझेड, आरआरझेड क्षेत्राच्या ऱ्हासाला पायबंद कधी बसणार? कांदळवनांचा वाढता ऱ्हास कधी थांबणार ? कल्याण : कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात सीआरझेड आरआरझेड क्षेत्राचा वाढता ऱ्हास पाहता यावर प्रशासनाने कठोर पायबंद घालत हे क्षेत्र संरक्षित करणे गरजेचे आहे. गेली आठ वर्षात प्रशासकीय राजवटीत सीआरझेड, आरआरझेड क्षेत्रात झालेले अनाधिकृत भराव आणि कांदळवनाच्या ऱ्हासाचा फटका पाहता प्रशासनाने सीआरझेड, आरआरझेड क्षेत्राची कठोर अमंलबजावणी केली पाहिजे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रफळ ६७.६५ चौ.कि.मी. अंदाजे, भौगोलिक परिस्थिती समुद्र सपाटीपासून ० ते २० मीटर उंच तीन बाजूंनी खाडी यामध्ये बारावे जंक्शन जवळील कल्याण खाडी, ते मोठागाव खाडी परिसर असा मोठा परिसर उल्हास खाडी सीआरझेड अंतर्गत समावेश आहे. तर कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात उल्हास नदी, काळूनदी, वालधूनी नदी यादेखील बारावे जक्शंन जवळ कल्याण खाडीला येऊन मिळतात. कल्याण-डोंबिवली मनपा परिसरातील सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) आणि आरआरझेड (रिव्हर रेग्युलेशन झोन) संबधित नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र दिसत असून कल्याण-डोंबिवली हा भाग खाडीच्या जवळ असल्याने येथे सीआरझेड नियम लागू होतात. डोंबिवलीतील कोपर, आयरे आणि मोठागाव या खाडी नजीकच्या भागांत सीआरझेड, उल्लंघन करून चाळी बांधल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. भूमाफियांनी खाडीकिनारच्या भागात भराव टाकून अतिक्रमण केले असून, त्यावर कारवाईसाठी पर्यावरण प्रेमी सातत्याने मागणी करत आहेत. शहारातील जमिनी संपल्याने अनधिकृत बांधकामदारांनी आता आपला मोर्चा खाडीकिनारी वळवला आहे. या अनधिकृत बांधकामासाठी खाडी किनारच्या खारफुटीच्या झाडांची तोड सुरु असून ‘पर्यावरणाला यातून धोका निर्माण होत आहे. खारफुट अर्थात खाडीकिनारच्या जमीनीवर असणाऱ्या वृक्षांना पर्यावरणाच्या दृष्टीने भरपूर महत्व आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या वृक्षांची आवश्यकता असते. या सीआरझेड क्षेत्रातील कांदळवन दलदलीच्या भागावर भूमाफिया यांची वक्र दृष्टीमुळे अनाधिकृत भराव करीत बांधकामाची जागा निर्माण करायला या ठिकाणी असणाऱ्या खाडी किनारच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे. तर काही ठिकाणी विकासकामांच्या कॉंक्रीटीकरणामुळे कांदळवनांना फटका बसल्याने खारे पाणी येत नसल्याने कांदळवने बाधित होत आहेत. या वृक्ष तोडीकडे प्रशासनाने योग्य लक्षपुरवून कारवाई करत नसल्याने या वृक्षतोडीला आळा बसत नाही. ग्रामीण भागत नव्हे तर शहरी विभागातील अशा खारफुटीच्या झाडांची मोठया प्रमाणात तोड झाल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या या खारफुटीच्या तोडीने विविध आपत्तींना तोंड देण्याची वेळ यायची संभवाना असून प्रशासन येथे जातीने दुर्लक्ष करत आहे. वास्तविक पाहता कोणताही वृक्ष तोडण्यास रितसर परवानगी घेणे गरजेचे असते. परंतु खाडी किनारी भागात या वृक्षांची खुलेआम कत्तल करुन चाळी वा तत्सम अनधिकृत बांधकामे उभारली जात आहेत. खाडी किनारी संरक्षित करुन हरित पट्ट्याचे जतन करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु आर्थिक गणितातून या खाडी किनारी असणाऱ्या खारफुटीची कत्तल होत असल्याची चर्चा आहे. तसेच अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती, हाय टाईड यावेळेस कांदळवन क्षेत्रातील खारफुटी ही पाण्याचा वाहता प्रवाह इतरत्र पसरण्यापासून रोखण्यासाठी नैसर्गिक स्त्रोत्र असल्याचे जाणकार सांगतात त्यामुळे खारफुटीचे संवर्धन काळाची गरज आहे. आता तरी प्रशासनाने डोळसपणे कारवाईचा बडगा उगरित खारफुटीची झाडे वाचवून खाडी किनारी संवर्धन केले पाहिजे व पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे अशी मागणी जोर धरु पाहत आहे. “खारफुटीच्या वृक्षतोडीच्या तक्रारी आम्ही मुंबई कांदळवन कक्षकडे वर्ग करतो असे वृक्ष प्राधिकरणाचे क.डों.म.पा अधिकारी संजय जाधव यांनी सांगितले.” तर नदी किनारी भागात देखील किनाऱ्यालगत भराव, नदी किनाराचा नैसर्गिक समतोलला बाधा आणित खोदकाम करीत मातीच्या नैसर्गिक उंचवटे यांचे सपाटीकरण याबाबत प्रशासनाने दक्ष राहिले पाहिजे, तसेच नदी किनारा जवळील बांधकामा बाबत नियमावलीचे काटेकोर पालन याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. “याबाबत पर्यावरण दक्षता मंडळ व्यवस्थापक रूपाली शाईवाले यांच्याशी संपर्क साधला असता कांदळवन वाढता ऱ्हास संदर्भात सांगितले की, सातपूल जेटी कुभंरखाण पाडा, खाडी परिसर, जुनी डोंबिवली, खाडीपरिसर कोपर खाडीपरिसर, भोपर खाडी परिसर या परिसरात कांदळवन अजूनही अस्तित्वात असून या संदर्भीत परिसरात विकास कामे करताना कांदळवनाचा ऱ्हास होणार नाही याकडे लक्ष देत खारफुटी चे संवर्धन करीत या परिसरात पाणथळ, दलदलीच्या ठिकाणी आढळणाऱ्या पक्षांचा अधिवास टिकून राहण्यासाठी, तसेच नैसर्गिक समतोल साधण्यासाठी खारफुटीचे संवर्धन करणे गरजेचे आहे.”
कोपरखैरणे विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई; २० हजारांचा दंड वसूल नवी मुंबई महानगरपालिकाच्या अतिक्रमण विभागामार्फत कोपरखैरणे विभागात अनधिकृत बांधकामांवर धडक निष्कासन कारवाई करण्यात आली. ही कारवाई आयुक्त डॉ. कैलास शिंदे…
शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मोहन्यात पार पडला रोजगार मेळावा तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी नगरसेवक राहुल कोट यांचा पुढाकार कल्याण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिका व लाईटहाउस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या सहकार्याने आम्ही सेवेकरी सामाजिक संस्था, मोहोने अध्यक्ष नगरसेवक राहुल कोट यांच्या वतीने आंबिवली पूर्वेतील मोहने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नालंदा बौद्ध विहार याठिकाणी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन आज मंगळवारी करण्यात आले होते. नगरसेवक राहुल कोट यांच्या पुढाकाराने हा रोजगार मेळावा पार पडला. सद्ध्याच्या तरुणाईला रोजगाराचा प्रश्न भेडसावत असून तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचे आश्वासन नवनिर्वाचित नगरसेवक राहुल कोट यांनी निवडणुकीत दिले होते. नागरिकांना दिलेले वचन पूर्ण करत या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात १०वी, १२वी, पदवीधर, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग आदी शैक्षणिक पात्रता असलेल्या फ्रेशर व अनुभवी उमेदवारांनी सहभाग घेतला. या उमेदवारांना मॅन्युफॅक्चरिंग, कंपनी वर्कर, ऑफिस, बॅक ऑफिस, डेटा एंट्री, बीपीओ, कॉल सेंटर, सेल्स, मार्केटिंग, हॉस्पिटल, हेल्थकेअर, सिक्युरिटी सर्व्हिसेस, ड्रायव्हर, हेल्पर, फील्ड जॉब, आयटी, कॉम्प्युटर, आयटीआय, सोशल मार्केटिंग आदी संबंधित नोकऱ्या उपलब्ध होत्या. यावेळी माजी आमदार प्रकाश भोईर, नगरसेविका स्वप्नाली केणे, तेजश्री गायकवाड, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कल्याण शहर अध्यक्ष विनोद केणे, माजी नगरसेवक दया शेट्टी, माजी नगरसेविका सुनंदा कोट, माजी नगरसेवक मुकुंद कोट, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना विभाग अध्यक्षा अनिता कोट आदी मान्यवर उपस्थित होते. लाईटहाउस कम्युनिटीज फाउंडेशनचे क्लस्टर हेड निकेश पाटील, सेंटर हेड एकता कदम, प्लेसमेंट मॅनेजर देवा रिकामे, धनंजय काकडे आदींनी या रोजगार मेळाव्याचे नियोजन केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी हेमंत गायकवाड, लक्ष्मण जाधव, रोहित सोनावणे, अमित कोट, संदेश कोट, हरीश जावळे, रिंकू पाटील, जय पाटील, जावेद सय्यद, अरुण कांबळे आदींनी परिश्रम घेतले. या मेळाव्यात २६ कंपन्यांनी सहभाग घेतला. तर २१५ तरुणांनी रोजगार मेळाव्यात मुलाखत दिली. यापैकी मुलाखतींच्या दुसऱ्या फेरीसाठी १०२ उमेदवारांची निवड करण्यात आली. एका विद्यार्थ्याला स्पॉट ऑफर मिळाली. कोटक महिंद्रा बँक, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, सारशी अभियांत्रिकी प्रायव्हेट लिमिटेड, रेड रोझ गारमेंट्स, पटेल रिटेल मार्ट्झ युनिकेअर हेल्थ केअर इत्यादी कंपन्या उपस्थित होत्या.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी न्याय मिळेल या प्रतीक्षेत प्रामाणिक कार्यकर्ता भाजपाचे शहर सरचिटणीस प्रशांत माळी यांचे पक्ष श्रेष्ठींना साकडे कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत 122 नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष स्थायी समिती सदस्य निवड आणि स्वीकृत नगरसेवक निवडीकडे लागले आहे. केडीएमसीमध्ये 10 स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार असून यामध्ये 5 शिवसेना शिंदे गट, 4 भाजपा आणि एक शिवसेना ठाकरे गटाला जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावण्यासाठी प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते आपली ताकद पणाला लावत आहेत. अशातच भारतीय जनता पार्टीतील जुने कल्याण शहर सरचिटणीस प्रशांत माळी यांनी देखील पक्षाकडे स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लावण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब, निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, जुने कल्याण शहर अध्यक्ष अमित धाक्रस यांना पत्र दिले आहे. प्रशांत माळी हे जोशीबाग सारख्या विभागातून जनसंघाचे नेते मुरलीधर पवार यांच्या नेतृत्वाखाली १९९६ शालेय जीवनापासून विद्यार्थी आघाडी, युवा मोर्चा शहर जिल्हा, सचिव, वॉर्ड अध्यक्ष तसेच सध्या भाजपा सरचिटणीस जुने कल्याण शहर या पदावर कार्यरत आहेत. लहानपणापासून भाजीपाला व्यवसाय करीत शालेय जीवन व त्यानंतर पूर्ण वेळ भाजपचे प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत. मधल्या काळात कल्याण (प.) मधील मोठ्या गटबाजीमुळे १ वर्ष पक्षाच्या बाहेर होते. एकदा महापालिकेची उमदेवारी हक्क असतांना ऐनवेळी पक्षात आलेल्या सदस्याला देण्यात आली. मागील वेळेस परिवहन सदस्यच्या वेळी जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या मुलासाठी माघार घ्यावी लागली. या वेळीस ही ओबीसीसाठी प्रभाग क्र. ८ मध्ये उमेदवारी मागितली होती पण बजरंग दलाचे जुने कार्यकर्ता या विभागात इच्छूक असल्यामुळे पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय मान्य करून त्या प्रभागात प्रामाणिकपणे कार्य केले. केडीएमसी सार्वत्रिक निवडणूकीच्या माध्यमातून केलेले प्रामाणिक कार्य व पक्षवाढीसाठी असलेली ओढ व पक्षाच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचा मानस या सर्व बाबीकडे विचार करून तसेच सामाजिक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून केलेले महापालिका क्षेत्रातील लोकहिताच्या कार्याचा सन्मान करून स्वीकृत सदस्यासाठी इच्छूक असलेल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची मागणी प्रशांत माळी यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीलं पक्ष किती दाद देतो हे पहावे लागेल.