Category: ठाणे

Thane news

कपिल पाटील यांच्या उपस्थितीत मनसे व ठाकरे गटाचे कार्यकर्ते भाजपात

 भिवंडीत भाजपाला वाढता प्रतिसाद भिवंडी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाला वाढता प्रतिसाद मिळत असून, केंद्रीय राज्यमंत्री व भाजपासह महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा उबाठा गट व मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या कार्यकर्त्यांचे भाजपात स्वागत करीत कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात ५१ टक्के मते मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला. भिवंडी तालुक्यातील कोपर ग्रामपंचायतीतील उबाठा गटातील ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र दिपचंद्र घरत, कोमल राकेश पाटील, भाग्यश्री भारत पाटील, माजी उपसरपंच भालचंद्र शांताराम घरत, संगीता दिपचंद्र घरत, भारत गुरुनाथ पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सर्वांचे भाजपामध्ये स्वागत करून आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा निर्धार केला. या वेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष छत्रपती पाटील, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीधर पाटील आदींची उपस्थिती होती. मनसेच्या भिवंडी तालुक्यातील खारबाव गाव व परिसरातील कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. खारबावच्या उपसरपंच जयमाला पाटील, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दर्पण पाटील, घनश्याम कारभारी, अजय जाधव, मिलिंद खंडागळे यांच्यासह शेकडी कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशासाठी तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे यांच्यासह भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते योगेश पाटील, विजय मुकादम, देवा पाटील, प्रफुल्ल तांगडे यांनी पुढाकार घेतला. या वेळी भाजपाचे पदाधिकारी श्रीकांत गायकर यांचीही उपस्थिती होती.

अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ईव्हीएम यंत्र हाताळणी प्रशिक्षण संपन्न

146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघातील ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्यानुषंगाने 25 ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत, 146 ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीच्या कामकाजासंदर्भात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, महामानव शिव…

पाणी देयकाची ६५३ कोटींची थकबाकी माफ

कल्याण डोंबिवली पालिकेची एमआयडीसीकडील कल्याण : २७ गावांसह कल्याण डोंबिवली पालिकेची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला देय असलेली पाणी पुरवठा देयकाची ६५३ कोटी ५६ लाखाची थकबाकी शासनाने माफ केली आहे. नियमितची…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी कल्याणची गुढी

कल्याण : कल्याण शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घराण्यातील एका महिलेने आपल्या गुढी तयार करण्याच्या व्यवसायातील एक पर्यावरणपूरक देखणी गुढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवी दिल्ली येथील त्यांच्या घरी चैत्र पाडव्याच्या…

अधिकारी व बिल्डर संगनमताने मुंब्रा-कौसामध्ये अनधिकृत बांथकामे जोरात सुरु- जितेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर ठाणे : मुंब्रा-कौसामध्ये अधिकारी आणि बिल्डर यांच्या संगनमताने अनधिकृत बांधकामे जोरात सुरु असल्याचा आरोप ट्विटरवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व स्थानिक आमदार जितेंद्र यांनी केला आहे.…

 नववर्ष स्वागतयात्रेच्या मार्गावर सर्वंकष स्वच्छता मोहिम

आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे महानगरपालिका आणि श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे दरवर्षी शहरातून भारतीय नववर्ष स्वागतयात्रा काढली जाते. या स्वागतयात्रेच्या मार्गावर आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली…

 पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप

आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी कल्याण :कल्याण मधील पत्रीपूल ते कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती दरम्यानच्या रहेजा गृहसंकुला समोरील काँक्रीट रस्त्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने गेल्या आठवड्यापासून सुरू केले आहे. या रस्ते कामामुळे एका मार्गिकेतून पत्रीपूल भागात वाहतूक होत असल्याने या भागात अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे. तीन वर्षापूर्वी पत्रीपुलाच्या नवीन उभारणीचे काम सुरू असताना नागरिक दीड वर्ष या भागात वाहतूक कोंडीत अडकत होते. हा त्रास पूल उभारणीनंतर संपला. गेल्या आठवड्यापासून पत्रीपूल ते रहेजा संकुलालगतचा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणारा रस्ता सिमेंट काँक्रीटच्या कामासाठी खोदण्यात आला आहे. त्यामुळे पत्रीपुलावरून वाहतूक एका मार्गिकेतून होत आहे. वाहनांचा चारही बाजुने भडीमार आणि एक मार्गिका यामुळे पत्रीपूल भागात दररोज एक ते दीड तास वाहतूक कोंडी होत आहे. दिवस, रात्र हा भाग कोंडीत अडकत असल्याने नागरिकांनी शिळफाटा, कल्याण पूर्व भागातून इच्छित स्थळी जाणे पसंत केले आहे. डोंबिवलीतून कल्याणला जाणारे प्रवासी लोकलने प्रवास करत आहेत. शिळफाटा रस्ता काँक्रीटीकरणाचे काम एमएसआरडीसीकडे आहे. या यंत्रणेने भिवंंडी वळण रस्ता, कोन ते दुर्गाडी ते शिळफाटा रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण केले आहे. पत्रीपुलाजवळील काँक्रीटीकरणाचे काम करण्यासाठी एक मार्गिका बंद ठेवून काम करावे लागणार असल्याने या कामाला वाहतूक विभागाकडून सण, उत्सव, परीक्षांचा हंगाम विचारात घेऊन लवकर परवानगी दिली जात नव्हती. गेल्या वर्षापासून हे काम रखडलेले आहे. येत्या पावसाळ्यात हा रस्ता आणखी खराब होण्याची शक्यता असल्याने एमएसआरडीसीने घाईने हे काम हाती घेतले आहे. शिळफाटा रस्त्याने, डोंबिवलीतून, कल्याण पूर्वेतून येणारी वाहने पत्रीपुलावरून कल्याणमध्ये प्रवेश करताना रहेजा संकुला लगतची रस्त्याची उजवी बाजू खोदण्यात आली आहे. ही वाहने एका मार्गिकेतून कल्याणमध्ये किंवा गोविंदवाडी दिशेने निघून जातात. वाहतूक सुरू असताना पोलीस दुर्गाडी किल्ला दिशेने पत्रीपूलमार्गे शिळफाटा, डोंबिवलीत जाणारी वाहने रोखून धरतात. ही वाहने सुमारे अर्धा ते पाऊण तास अनेक वेळा रोखल्याने दुर्गाडी किल्ला दिशेने वाहनांच्या रांगा लागतात. गोविंदवाडी वळण रस्त्याची पत्रीपुलकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी सुरू केली की शिळफाटा रस्त्याने कल्याणकडे येणारी वाहतूक रोखून धरली जाते. शिळफाटा रस्त्यावरील वाहनांची संख्या अधिक असल्याने या रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी दररोज होत आहे. ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक होत आहे. १५ ते २० वाहतूक पोलीस, सेवकांचा ताफा याठिकाणी तैनात असतो. रुग्णवाहिका, शालेय बस यांना कोंडीचा सर्वाधिक फटका बसला आहे. कल्याण पूर्व, पश्चिम भागातील अनेक विदयार्थी खासगी वाहने, शालेय बस मधून पूर्व, पश्चिमेतील शाळांमध्ये जातात. त्यांची या कोंडीने सर्वाधिक कोंडी केली आहे. आता परीक्षांचा हंगाम सुरू आहे. त्यात ही कोंडी सुरू झाल्याने पालक वर्ग अस्वस्थ आहे.

रंगीबेरंगी गुढ्यांनी बाजारपेठा सजल्या

डोंबिवली : हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपदेला साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याला नवउपक्रम, संकल्पांनी सुरुवात केली जाते. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस विविध पद्धतीने साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवशी मराठी नववर्षाचे स्वागत केले जाते. डोंबिवलीतील बाजार गुढीपाडव्याचे साहित्य आणि वस्तूंनी भरून गेला आहे. गुढीसाठी लागणाऱ्या नव्या काठीसह रेशमी-तलम, लहान तांब्या, कृत्रिम फुलांचा हार, पाने, माळा आणि साखरगाठीची खरेदी सुरू झाली आहे. पारंपरिक सजावट केलेल्या नावीन्यपूर्ण रंगीबेरंगी रेडिमेड गुढी विक्रीसाठी उपलब्ध असून साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी दिसून येत आहे. तसेच रेडिमेड गुढीला ग्राहकांची जास्त पसंती आहे. लाल, पिवळा, नारंगी आणि पांढऱ्या रंगांच्या तसेच ड्रायफ्रुट असलेल्या साखरगाठींनी दुकाने सजली आहेत. गुढीपाडव्याला अवघे काही दिवस उरल्याने साखरगाठींच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शोभायात्रांचीही जल्लोषात तयारी सुरू झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा काढण्याची परंपरा असल्याने शहरातील अनेक मंडळे तयारीत व्यस्त आहेत. डोंबिवलीतील दुकाने साहित्यांनी सजली असून नऊ इंचाची रेडिमेड गुढी १०० ते १२० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. एक फुटाची रेडिमेड गुढी १५० रुपयांपासून मिळत आहे. दीड फुटाच्या गुढीची किंमत २०० ते २५० रुपये आहे. सजवलेल्या गुढी दर्जा व आकारानुसार ९०० ते १,२०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तर लाल, गुलाबी, पिवळा, नारंगी, गुलाबी रंगाच्या साखरगाठी २० रुपये ते १०० रुपयांपर्यंत मिळत आहे. गुढीपाडव्यानिमित्त वाहन, घर, दागिने, मोबाईल इत्यादी महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी केली जाते. त्यामुळे नागरिक आकर्षित करण्यासाठी शोरूम व ऑनलाईन खरेदीवर मोठ्या प्रमाणात ऑफर ठेवल्या आहेत. पूजेसाठी अन् लहान आकारातील तयार गुढ्या, पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांचा बॉक्स, गुढी उभारणीसाठी लागणारे विविध रंगांतील वस्त्र, अशा विविध प्रकाराच्या साहित्यांची खरेदी होत आहे. यंदा लहान आकारातील तयार गुढ्यांना सर्वाधिक मागणी आहे, आप्तेष्टांना भेट देण्यासाठी तयार गुढ्यांची खरेदी होत आहे. मोठ्या आकारातील तयार गुढ्याही बाजारात उपलब्ध आहेत. त्याचीही खरेदी होत असून, अगरबत्तीपासून ते हळदी-कुंकू, असे गुढी पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या बॉक्सलाही पसंती आहे. गृहखरेदीसाठी सवलती साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला नवीन वस्तू खरेदी करण्याचा अनेकांचा कल असतो. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांसाठी बांधकाम व्यावसायिकांकडूनदेखील आकर्षक जाहिराती केल्या आहेत. रेडिमेड साडीला पसंती गुढपाडव्यासाठी रेडिमेड गुढीचे वस्त्र बाजारात उपलब्ध झाले आहेत. रेडिमेड गुढीच्या वस्त्रांना महिलांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पैठणी, जरीकाठ, रेशन काठ, खाण-काठाची रेडिमेड साडी बाजारामध्ये उपलब्ध आहेत. १०० ते ८०० रुपयांपर्यंतच्या गुढी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रेडिमेड गुढी विदेशात विक्रीसाठी पाठवल्या आहेत. – रोहित प्रसाद, डोंबिवली गुढ्या तयार करण्यासाठी एक महिना लागतो. यंदा गुढीच्या किमतीत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. – सुमित कदम, डोंबिवली

ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान

ठाणे : विद्या प्रसारक मंडळाचे के.ग.जोशी कला आणि ना.गो.बेडेकर वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रा.रुपेश यशवंत महाडीक यांना कोकण ग्राम विकास संस्थेतर्फे “आदर्श अध्यापक पुरस्काराने ” सन्मानित करण्यात आले. मराठी ग्रंथ संग्रहालय,ठाणे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात गप्पागोष्टीकार जयंत ओक यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर आणि डॉ.महेश बेडेकर विश्वासाने तसेच प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक यांनी अभिनंदन केले. प्राध्यापक रुपेश महाडीक यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण,सोबतच सेट, नेट आणि एलएलबीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. विद्यार्थीप्रिय पण त्याचसोबत शिस्तप्रिय असणारे प्रा.रुपेश महाडीक हे मागील १४ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच अनेक स्पर्धा उपक्रमांमध्ये आपल्या यशाचा ठसा उमटवला आहे. रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, नृत्य,नाटक,पथनाट्य,वक्तृत्व अशा विविध स्पर्धांमधून त्यांनी उत्तम यश प्राप्त केले.मुंबई विद्यापीठाच्या ‘उडान’ या कार्यक्रमात महाडीक सरांनी लेखन ,दिग्दर्शिन आणि अभिनय केलेल्या स्किटला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले होते.अनेक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत त्याचसोबत नावाजलेल्या विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये त्यांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांचे उत्तम मार्गदर्शक विद्यार्थ्यांचे आणि त्यांचे नाते नेहमीच जिव्हाळ्याचे राहिले आहेत. विद्यार्थ्यांची कोणतीही अडचण,संकट असो,त्यांना हमखास मार्गदर्शन मिळेल या विश्वासाने अनेक विद्यार्थ्यांनी सरांकडे धाव घ्यावी आणि अगदी गोवर्धन करंगळीवर लीलया उचलावा तसे विद्यार्थ्यांना संकटातून,समस्येतून मार्ग सहज दाखवावा अशा प्रकारचे भावबंध त्यांचे राहिले आहेत. विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचार करावा,कुटुंब-समाज यांचा समतोल राखत उत्तुंग यश प्राप्त करावे,आत्मविश्वासाने,संयमाने परिस्थितीवर मात करत माणूस म्हणून चांगले आयुष्य जगावे,त्याचसोबत मैत्रीचे जीवनातील महत्त्व, अशा अनेक गोष्टींचे सिंचन विद्यार्थ्यानमध्ये करत आदर्श संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य सर अव्याहतपणे गेली अनेक वर्ष करत आहेत.

४८ वी ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धा

ठाणे महापालिकेने विजेतेपद राखले ठाणे : ठाणे महापालीकेने डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस संघाचा आठ गडी राखून दणदणीत पराभव करत ४८ व्या ठाणेवैभव आंतरकार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेत ब गटाचे सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद कायम राखले. प्रतिस्पर्धी संघाला ८० धावांत गुंडाळल्यावर ठाणे महापालिकेने दोन गड्यांच्या मोबदल्यात ८१ धावांसह विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात झालेल्या निर्णायक लढतीत ठाणे महापालिकेच्या चतुरस्त्र माऱ्यासमोर डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेसचे फलंदाज  खेळपट्टीवर तग धरू शकले नाहीत. अतिश गावंडने १२ धावांत तीन,शशिकांत कदम, नंदन कामत आणि सौद मंसूरीने प्रत्येकी दोन गडी बाद करत प्रतिस्पर्ध्यांना शतकी धावसंख्येच्या आत रोखले. अनुराग यादवने २६, केतन खरातने नाबाद १६ आणि प्रदीप शर्माने १५ धावांचे योगदान दिले.  विजयाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ठाणे महापालिकेची खराब सुरुवात झाली. संघाचे धावांचे खाते उघडलेले नसताना आशुतोष घांग्रेने अनुभवी  जयदीप परदेशीच्या दांड्या गुल करत गतविजेत्याना धक्का दिला. पण या धक्क्यातून लगेचच सावरून घेत विकी पाटीलने सौरभ आंब्रेने दुसऱ्या गड्यासाठी ६८धावांची भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.  विकी पाटीलने नाबाद ३७ आणि सौरभ आंब्रेने ३६ धावांची खेळी केली. या डावात आशुतोष घांग्रे आणि चिन्मय कदमने प्रत्येकी एक गाडी बाद केला. संक्षिप्त धावफलक : डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस : २८.५ षटकात सर्वबाद ८० (अनुराग यादव २६, केतन खरात नाबाद १६ , प्रदीप शर्मा १५, अतिश गावंड ४- १ – १२ -३, नंदन कामत ६-२-१२-२,  शशिकांत कामत ७-२-१३-२, सौद मंसूरी २.५ – ०-१५-२) पराभूत विरुद्ध ठाणे महापालिका : १६;४ षटकात २ बाद ८१ ( विकी पाटील नाबाद ३७, सौरभ आंब्रे ३६, आशुतोष घांग्रे २-२५-१, चिन्मय कदम १.४ -१०-१ ).