Category: ठाणे

Thane news

गद्दारांना गाढण्यासाठी सांगवीमध्ये धडाडणार महाविकास आघाडीच्या तोफा

८ मे रोजी महाविकास आघाडीची महासभा ठाकरे आणि शरदचंद्र पवार अशा दोन दिगजांच्या होणाऱ्या घणाघातामुळे महायुतीमध्ये अस्वस्थता राज भंडारी पनवेल : एका जगविख्यात विचारवंताने एक अजरामर वाक्य लिहून ठेवले आहे.”तुम्ही एखाद्याची मालमत्ता चोरू शकता पण त्याचे मालमत्ता कमावण्याचे हुनर तुम्हाला कदापिही चोरता येत नाही”. हे वाक्य महायुतीमधील महाचोरांना चपखल बसते. असाच घणाघात ८ मे रोजी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर ऐकायला मिळणार आहे. ३३ मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची महासभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष चोरून,बाळासाहेब ठाकरेंचे नाव चोरून आणि पारंपारिक निशाणीवर दावा सांगून गद्दारी केलेल्यांना त्यांची योग्य जागा दाखविण्यासाठी महाविकास आघाडीने संजोग वाघेरे पाटील यांच्या स्वरूपामध्ये एक प्रामाणिक, सजग आणि जनमानसातील प्रश्नांची जाण असणारे उमदे उमेदवार दिले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ बुधवार दिनांक ८ मे रोजी सायंकाळी सहा वाजता महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, सी पी आय (एम),आर पी आय (ए), स्वाभिमानी रिपब्लिकन युथ पार्टी, स्वराज इंडिया असे महाविकास आघाडी मधील घटक पक्षांचे नेते या महासभेमध्ये आपले विचार मांडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा विधान परिषद सदस्य आमदार जयंत भाई पाटील, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह, आर पी आय ( ए) चे दीपक भाऊ निकाळजे या वक्त्यांचे  विचारवैभव उपस्थित श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांना जनमानसातून मिळणारा पाठिंबा राज्यभरात चर्चेचा विषय ठरतो आहे. वयाची ८० उलटून देखील असाध्य व्याधींना नामोहरम करत संघर्ष योद्धा आधारवड शरद पवार साहेब अक्षरशः पायाला भिंगरी लावून महाविकास आघाडीचा प्रचार करत आहेत. भाई जयंत पाटील यांचे आक्रमक भाषण नेहमीच विरोधकांच्या उरात धडकी भरवत असते. पृथ्वीराज चव्हाण यांचे अनुभवी प्रगल्भ आणि मुद्देसूद भाषणाला विरोधकांच्या कडून एक टक्का देखील प्रत्युत्तर होत नाही. संजय सिंह आणि दीपक भाऊ निकाळजे यांची सडेतोड भाषणे महायुतीच्या पायाखालची वाळू सरकवत आहे. त्यामुळे नागरिकांना देखील आठ मे रोजी महाविकास आघाडीच्या धडाडणाऱ्या तोफांचे आवाज ऐकण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने तमाम नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

माकपचे जे पी गावित यांची उमेदवारी मागे,

राष्ट्रवादीचे भास्कर भगरे यांना पाठिंबा – डॉ. उदय नारकर अनिल ठाणेकर ठाणे : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव सुनिश्चित करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कॉ. जे. पी. गावीत यांची उमेदवारी मागे घेऊन महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा दिल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डाॅ उदय नारकर यांनी दिली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज, वाढता जनाधार, सर्व जनविभागांच्या उपजीविकेसाठी केलेले जोमदार सातत्यपूर्ण लढे आणि प्रभावी उमेदवार या जोरावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कॉ. जे. पी. गावीत यांना दिंडोरी (अज) लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने आमच्या पक्षाच्या उमेदवारास अधिकृतपणे पुरस्कृत करावे, अशी माकपची रास्त अपेक्षा आणि मागणी होती. त्यासाठी  राज्य आणि केंद्रीय स्तरापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले होते. महाराष्ट्रातील ४८ पैकी केवळ ही एकच जागा पक्षास मिळावी, अशी माकपची मागणी होती. तथापि, पक्षाच्या या प्रयत्नांना यश आले नाही. महाविकास आघाडीने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरच्चंद्र पवार) पक्षास दिली. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांतील मैत्रीपूर्ण लढत माकपने स्वीकारलेल्या उद्दिष्टास घातक ठरू शकते. वस्तुतः सर्वत्र सत्ताधारी भाजप आणि दिंडोरी मतदारसंघातील त्याच्या उमेदवाराविरुद्ध मतदारांत कमालीचा असंतोष आहे. त्याचे रूपांतर त्या पक्षाच्या आणि दिंडोरीतील उमेदवाराच्या पराभवात होणे अटळ आहे. पण महाविकास आघाडीचे दोन उमेदवार असल्यास जनतेच्या इच्छेचा अनादर होईल. जनतेच्या संभाव्य कौलाचा असा अवमान होऊ नये, भाजप उमेदवाराचा पराभव आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय यावर शिक्कामोर्तब करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. हे ध्यानात घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरी (अज) लोकसभा मतदारसंघातील कॉ. जे. पी. गावीत यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव करण्यासाठी मविआचे अधिकृत उमेदवार  भास्कर भगरे यांना मतदारांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटी करत आहे असे डॉ. उदय नारकर यांनी म्हटले आहे.

लोकसभा, विधानसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी योजना – अशोक शिनगारे

अनिल ठाणेकर ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्यानुषंगाने राजकीय पक्ष, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांना प्रचारविषयक विविध परवानग्या प्राप्त करणे सोयीचे व्हावे, याकरिता एक खिडकी योजना कक्ष स्थापन करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकार  व जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. लोकसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर एक खिडकी कक्ष तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. हेलिकॉप्टर लँडिंग व टेक ऑफ परवानगी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत देण्यात येईल. हा कक्ष कार्यालयीन वेळेत कार्यरत राहील. तरी निवडणूक आयोगाकडून सूचित करण्यात आल्याप्रमाणे सर्व संबंधितांनी नमूद केलेल्या आवश्यक कार्यपध्दतीचा अवलंब करुन सर्व परवानग्या बिनचूक व विहित कालावधीमध्ये घेण्याची-देण्याची कार्यवाही करावी, असे ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कळविले आहे. कार्यक्षेत्र- ठाणे जिल्हा, वाहन परवाना- १.नोंदणीकृत राजकीय पक्ष, २.नोंदणीकृत पक्षाचे जिल्हास्तरीय पदाधिकारी. परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी (लोकसभा मतदारसंघनिहाय एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग- परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे – १.आर.सी. बुक, २.वाहनाचा इन्शुरन्स, ३.वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, ४.टॅक्स भरल्याची पावती, ५.व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, ६.चालकाचा परवाना, ७.पी.यू.सी., ८.वाहनाच्या चारही बाजूचा फोटो. कार्यक्षेत्र- लोकसभा मतदारसंघ, वाहन परवाना : उमेदवार/उमेदवार प्रतिनिधी- परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी (एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग- परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे – १.आर.सी. बुक, २.वाहनाचा इन्शुरन्स, ३.वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, ४.टॅक्स भरल्याची पावती, ५. व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, ६. चालकाचा परवाना, ७.पी.यू.सी., ८. वाहनाच्या चारही बाजूचा.कार्यक्षेत्र- विधानसभा मतदारसंघ, वाहन परवाना- उमेदवार/उमेदवार प्रतिनिधी- परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी (एक खिडकी कक्ष). ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग- परिवहन विभाग, आवश्यक कागदपत्रे – १.आर.सी. बुक, २.वाहनाचा इन्शुरन्स, ३.वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, ४.टॅक्स भरल्याची पावती, ५.व्यावसायिक वाहन असल्यास वैध परवाना, ६.चालकाचा परवाना, ७.पी.यू.सी., ८.वाहनाच्या चारही बाजूचा फोटो. कार्यक्षेत्र- विधानसभा मतदारसंघ, तात्पुरते पक्ष कार्यालय उभारणे, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी (एक खिडकी कक्ष), ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १.संबंधित जागा मालक यांची संमती, २.स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३.पोलीस विभाग. कार्यक्षेत्र- लोकसभा मतदारसंघ, कोपरा सभा / प्रचारसभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. कार्यक्षेत्र- विधानसभा मतदारसंघ- कोपरा सभा / प्रचारसभेसाठी मैदान परवाना, लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. कार्यक्षेत्र- लोकसभा मतदारसंघ- रॅली / मिरवणूक / रोड शो / पदयात्रा/ पथनाटय / लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. पोलीस विभाग, २.वाहतूक नियंत्रण विभाग. कार्यक्षेत्र-विधानसभा मतदारसंघ- रॅली / मिरवणूक / रोड शो / पदयात्रा/ पथनाटय / लाऊडस्पीकर, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – 1. पोलीस विभाग, २.वाहतूक नियंत्रण विभाग. एकापेक्षा जास्त लोकसभा मतदारसंघातील मिरवणूक/रॅलीच्या परवानगीसाठी लोकसभा मतदारसंघनिहाय स्वतंत्र अर्ज करण्यात यावा, अशी सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. कार्यक्षेत्र-लोकसभा मतदारसंघ- स्टेज/बॅरोगेट/रोस्ट्रम, परवानगी देणारे अधिकारी – निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी योजना कक्षातील पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. ४. सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत) ना-हरकत प्रमाणपत्र, 5. अग्निशमन विभागाचे ना-हरकत†कार्यक्षेत्र-विधानसभा मतदारसंघ – स्टेज/बॅरोगेट/रोस्ट्रम, परवानगी देणारे अधिकारी – सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या एक खिडकी कक्षातील सक्षम पोलीस अधिकारी. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. ४. सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत) ना-हरकत प्रमाणपत्र, 5. अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र. कार्यक्षेत्र-ठाणे जिल्हा- हेलिकॉप्टर लँडिंग व टेक ऑफ परवाना, परवानगी देणारे अधिकारी – अतिरिक्त  जिल्हादंडाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे. ना-हरकत प्रमाणपत्र देणारा विभाग – १. संबंधित जागा मालक यांची संमती, २. स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३. पोलीस विभाग. ४. सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य व विद्युत) ना-हरकत प्रमाणपत्र, 5. अग्निशमन विभागाचे ना-हरकत. निवडणूक आयोगाकडून सूचित करण्यात आल्याप्रमाणे सर्व संबंधितांनी नमूद केलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन सर्व परवानग्या बिनचूक व विहित कालावधीमध्ये घेण्याची-देण्याची कार्यवाही करावी, असे ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कळविले आहे.

ठाणे प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा

अंबरनाथ रायझिंग ठरले सरस ठाणे : नियमित डावानंतर सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाल्याने सर्वाधिक चौकरांमुळे अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबने फटीएल एकादश संघावर सरशी मिळवत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित ठाणे प्रीमियर लीग टी २० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. नियमित डावात उभय संघ १५१ धावांवर बरोबरीत राहिले. त्यानंतर ही बरोबरी सुपर ओव्हरमध्ये १० धावांवर कायम राहिल्याने दोन्ही डावात मिळून एकूण २२ चौकार मारणाऱ्या अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबला विजयी घोषित करण्यात आले. कमनशिबी ठरलेल्या एफटीएल एकादश नावावर १८ चौकार जमा होते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या एफटीएल एकादश संघाला सुर्यांश शेडगे(७७), यतीन मढवी(३२) आणि अर्जुन थापाने २० धावा करत एफटीएल एकादश संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. या डावात सौद अंसारीने सहा, परिक्षित वळसंगकरने दोन आणि प्रथमेश महालेने एक बळी मिळवला. त्यानंतर अनिल रोनंकी ने ३३ आणि परिक्षित वळसंगकरने ६१ धावांच्या धडाकेबाज खेळीने अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लबला बरोबरी साधून दिली. या डावात सुर्यांश शेडगेने दोन बळी मिळवले. सुपर ओव्हरमध्ये अर्जुन थापाच्या सात धावांमुळे एफटीएल एकादश संघाला १० धावा जमवता आल्या. परिक्षितने ९ धावा करत संघाला विजयाच्या समीप नेले.शेवटच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची आवशयकता असताना फलंदाज धावचित झाल्याने सामन्यात पुन्हा बरोबरी झाली. संक्षिप्त धावफलक : एटीपीएल एकादश : २० षटकात सर्वबाद १५१ ( सुर्यांश शेडगे ७७, यतीन मढवी ३२, अर्जुन थापा २०, सौद मंसूरी ४-२६-६, परिक्षित वळसंगकर ४-२४-२, प्रथमेश महाले ३-२७-१) बरोबरीत अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब :  २० षटकात ८ बाद १५१ ( परिक्षित वळसंगकर ६१, अनिल रोनंकी ३३, सुर्यांश शेडगे ४-३७-२, नविन शर्मा ४-३०-१, अजय पाटील ४-३७-१, विकास पाटील ४-२५-१, अक्ष शर्मा ४-२०-१), सुपर ओव्हर : अंबरनाथ रायझिंग क्रिकेट क्लब : एक षटकात २ बाद १० ( परिक्षित वळसंगकर ९, विकास पांडे १-१०-१) बरोबरीत एफटीएल एकादश : एका षटकात २ बाद १० ( अर्जुन थापा  ७, परिक्षित वळसंगकर १-१०-१).

‘आंबेघोसाळे तलाव परिसरातील कामे जलद पूर्ण होतील’

महापालिका आयुक्त सौरभ राव यांची ग्वाही उथळसर प्रभागात सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन ठाणे : आंबे घोसाळे तलाव परिसरातील सर्व कामे जलद गतीने पूर्ण होतील. तसेच, ज्येष्ठ नागरिकांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करुन प्रशासन आवश्यक कार्यवाही करेल, अशी ग्वाही ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. शनिवारी सकाळी ७.०० वाजता उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात सर्वंकष स्वच्छता मोहिमेस आरंभ झाला. आंबेघोसाळे तलाव, मीनाताई ठाकरे चौक परिसर, के व्हीला, राबोडी, ऋतू पार्क आदी भागात या मोहिमेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यात, रोटरी क्लब, शिवशांती प्रतिष्ठान, स्थानिक नागरिक, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. या मोहिमे दरम्यान आयुक्त राव यांनी आंबे घोसाळे तलाव परिसराची पाहणी केली. त्यावेळी, स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी यांच्याशी आयुक्तांनी संवाद साधला. शौचालयातील पाण्याची समस्या, स्वच्छता, परिसरात टाकला जाणारा कचरा याविषयी नागरिकांनी माहिती दिली. तसेच, सौंदर्यीकरण कामाबाबत सूचनाही केल्या. या तळ्याला लागून असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याच्या परिसर, मीनाताई ठाकरे चौक परिसर यांचीही आयुक्तांनी पाहणी केली. ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या सूचनांचा पूर्ण विचार करून त्यानुसार कार्यवाही केली जाईल. या परिसरात नागरिकांना अधिकाधिक स्वच्छ आणि सुंदर वातावरण कसे मिळेल या दृष्टीने महापालिका प्रयत्न करेल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. या वेळी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, मनीष जोशी, जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, अनघा कदम, सचिन पवार, सहायक आयुक्त महेश आहेर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उप नगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, गुणवंत झांब्रे, कार्यकारी अभियंता संजय कदम, मोहन कलाल, वृक्ष अधिकारी केदार पाटील आदी उपस्थित होते. नालेसफाईचा आढावा उथळसर मधील मुख्य नाल्याच्या सफाईचा आढावा यावेळी आयुक्त राव यांनी घेतला. नाले सफाई वेळेत पूर्ण करण्यावर विभागाने लक्ष ठेवावे, असे निर्देश आयुक्तांनी पाहणी नंतर दिले.

नागरिकांनी मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन ठाणे : लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी नागरिकांनीही सक्रिय पुढाकार घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांनी यात मोलाची भूमिका बजावावी असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे. उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात शनिवारी राबविलेल्या सर्वंकष स्वच्छता अभियानात, आंबेघोसाळे तलाव येथे मतदानाची जनजागृती करणारे फलक लावून नागरिकांना मतदानाचे आवाहन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, मनीष जोशी, जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, अनघा कदम, सचिन पवार, सहायक आयुक्त महेश आहेर आदी उपस्थित होते. रोटरी क्लब, शिवशांती प्रतिष्ठान, ज्येष्ठ नागरिक संघ यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून येत्या २० मे २०२४ ही तारीख लक्षात ठेवून सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा. जोडून आलेल्या सुटीच्या मोहात न पडता मतदानाच्या कर्तव्याला प्राथमिकता द्यावी, असेही आवाहन आयुक्त राव यांनी केले. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभागी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मिडिया, आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमातंर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅस्कॉटही तयार केलेला आहे.

ठाण्यात मुख्यमंत्र्यांचे शक्तीप्रदर्शन

नरेश म्हस्केंनी भरला उमेदवारी अर्ज भरला अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्यासहीत शिवसेना कुणाची याचा फैसला करणाऱ्या ठाणे लोकसभा मतदार संघात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत महायुतीचे शिवसेना पक्षाचे उमेदवार…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मोदी को हराना मुश्कीलही नही…

ठाणे : एकीकडे देशाला वाचवायला, लोकशाहीला पुढे नेण्यासाठी आणि विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. तर, दुसरीकडे देश बुडवायला निघालेली इंडीया आघाडी आहे. देशभक्त त्यांना थारा देणार नाहीत. त्यामुळेच मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केले. तसेच पप्पु आधीच फेल झाला असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा फेल करतील, असे सांगत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमदेवार नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि इंडीया आघाडीवर टीका केली. २०१४ पूर्वी देशात भ्रष्टाचार, दंगली आणि बाॅम्बस्फोट घडत होते. पण, त्यानंतर एकदाही बाॅम्बस्फोट करण्याची कुणाची हिमंत झाली नाही. कारण, भारताकडे डोळे वटारून पाहिले तर घरात घुसून मारु असा इशारा मोदींनी दिला. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी पंतप्रधान होणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. घरात बसून किंवा फेसबुक लाईव्ह करून काम करता येत नाही. त्यासाठी जमिनीवर उतरुन काम करावे लागते. गेल्या दोन वर्षांपासून मी जमिनीवर उतरुन काम करतोय. याआधीही मीच काम करत होतो पण, त्याचे श्रेय दुसरे घेत होते, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली. बाबासाहेबांचे संविधान बदलणार असे विरोधकांकडून बोलले जात असून ते चुकीचे आहे. संविधान बदललेले जाणार नाही. देशात संविधान दिवस साजरा करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तर, बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पाडण्याचे काम काँग्रेसने केले, असेही ते म्हणाले. तुम्ही मागच्या उमेदवाराला मताधिक्य देण्याचे काम काम केले. त्याच्यासाठी मेहनत घेतली. खरे तर त्या उमेदवाराचे काम करायला कार्यकर्ते तयार नव्हते. त्यामुळे मीच उमेदवार असे समजून मतदान करा, असे मला सर्वांना सांगावे लागले, असा टोला लगावत या निवडणुकीत मागचे सर्व विक्रम मोडीत काढण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले. तसेच आपण उमेदवार या भावनेने काम करून विरोधकांच्या चारही मुंड्या चित करा परत, विरोधी पक्षाने ठाण्याचे नाव घेत कामा नये, असेही ते म्हणाले.

ठाण्याचा आर्यन कनोजिया ठरला  विजेता

दुबईतील आंतरराष्ट्रीय बुडोकन कराटे स्पर्धेत ठाणे – ठाण्यातील सेंट जॉन बाप्टीस्ट स्कुलमध्ये शिकत असलेला आर्यन मनोज कनोजिया हा कराटेपटू आंतरराष्ट्रीय बुडोकन कराटे स्पर्धेत देशाचं नेतृत्व करताना सुवर्णपदक विजेता ठरला आहे.…

शिवसेनेच्या फोडणीला बिचुकलेंची तेलाची धार

कल्याण लोकसभेत अभिजीत बिचुकले यांची एंट्री डोंबिवली : कल्याण मध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे व महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात लढत होत आहे. यातच शुक्रवारी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी कल्याण लोकसभा मतदार संघातून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. येथे शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात चुरशीची लढत आहे. त्यांच्या राजकीय फोडणीला तेलाची धार द्यायला मी आलो आहे असे बिचुकले यावेळी म्हटले आहे. यामुळे शिंदे व दरेकर यांच्यातील रंगतदार लढतीत बिचुकले आगीत तेल कसे टाकतात हे पहावे लागेल. कल्याण लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी अभिजीत बिचुकले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. वादग्रस्त विधान करत नेहमीच चर्चेत राहिलेले बिचुकले आता कल्याण लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात कशी रंगत आणतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच त्यांनी येथे चुरशीची लढत अगोदरच आहे. त्यात तेल ओतायला मी आलो आहे असे सांगितले. तसेच सातारा येथील कामगिरी पार पडल्यानंतर पुढील 13 दिवस मी येथेच ठाण मांडून बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसिद्धीसाठी आपण निवडणूक लढता असे म्हटले जाते. यावर बिचुकले म्हणाले, 288 आमदारांपेक्षा मी नक्कीच प्रसिद्ध आहे. मला प्रसिद्धीची गरज नाही मी जन्मापासून प्रसिद्ध आहे. परडे 50 हजार, 1 लाख रुपयाचे काम सोडून जनतेसाठी मी लढतो तर जनतेला माझ्याबरोबर आले पाहिजे. माझ्याकडे काम आहे मी माझ्या स्टाईल मध्ये काम करतो. कल्याणमध्ये विकास झालेला नाही… अभिजीत बिचुकले म्हणाले की कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांनी कितीही ओरडून सांगितले की विकास झाला मात्र या अडीच वर्षांत काहीही विकास झालेला नाही. त्यापू्र्वी त्यांनी विकास केला असेल त्यात दुमत नाही. मागील अडीच वर्षांत श्रीकांत शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे व एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे एवढ्याच लढाया होत आहेत अशी प्रतिक्रिया अभिजीत बिचुकले यांनी दिली आहे. कल्याण लोकसभेतून अर्ज भरला आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना भूलथापा देत आहेत असं मला वाटतं. मी अधिकारवाणीने हे बोलतो आहे. लोकांची कामं होत नाहीयेत. संसदेला बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्या असं पत्र मी नरेंद्र मोदींना लिहिलं होतं. नरेंद्र मोदी छोट्या छोट्या लोकांना भेटतात. मात्र बाबासाहेबांचं नाव संसदेला देण्यास यांचा नकार आहे का? हा माझा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीही उत्तर दिलेलं नाही. अटल सेतू हे नाव देण्याआधीही मी त्या सेतूला माँसाहेब जिजाऊंचं द्या अशी मागणी केली होती मात्र ते नावही देण्यात आलं नाही असंही बिचुकलेंनी म्हटलं आहे. अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं काय झालं? अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभारलं जाणार होतं. त्या समुद्रातल्या स्मारकाचं काय झालं? उदयनराजेंना तुम्ही तिकिट दिलंय. त्यांना छत्रपती असल्याचा अभिमान असल्याचं वाटत नाही. याच सगळ्या कारणांसाठी मी आता कल्याणमधून श्रीकांत शिंदेंविरोधात माझी उमेदवारी घोषित करतो आहे असं अभिजित बिचुकलेंनी म्हटलं आहे.