Category: ठाणे

Thane news

शिवसेना उबाठा गटाच्या रागिणी बैरीशेट्टी यांचे प्रताप सरनाईक यांच्याविरोधात अर्ज बाण !

अनिल ठाणेकर ठाणे : शिवाईनगर परिसरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या स्थानिक माजी नगरसेविका रागिणी भास्कर बैरीशेट्टी यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गटाचे) आमदार प्रताप सरनाईक यांच्या निधीतुन बांधण्यात आलेल्या समाज मंदिर कामांविरोधात ठाणे महापालिका प्रशासनाकडे अर्ज बाण सोडलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्थानिक माजी नगरसेविका रागिणी भास्कर बैरीशेट्टी यांनी ठाणे महापालिका स्थावर मालमत्ता विभागाच्या उपायुक्तांना दिलेल्या अर्जात, शिवाईनगर प्रभाग क्रमांक ५ मधील गणेश नगर येथील म्हाडाच्या लेआऊट मधील मोकळ्या जागेवर शिवसेना (शिंदे गटाचे) स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या निधीतुन बांधण्यात आलेल्या समाज मंदिर हाॅलचा वापर गत चार वर्षांपासून सुरु असून सदर मिळकत ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थावर मालमत्ता विभागाकडे हस्तांतरीत केल्याबद्दलची सर्व कागदपत्रे स्थानिक रहिवाशांच्या माहितीसाठी उपलब्ध करुन देण्यात यावीत. ठाणे महापालिका सचिव यांना दिलेल्या अर्जात, शिवाईनगर येथील महापालिका शाळा क्रमांक ४७ येथील खेळाच्या मैदानावर बांधण्यात आलेल्या समाज मंदिर हाॅलच्या नामांकरण ठरावाची प्रत मिळावी तसेच वर्तकनगर प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या अर्जात, शिवाईनगर परिसरातील सेप्टीक टाकीच्या जागेवर उभारण्यात आलेल्या समाज मंदिराच्या कामाची माहिती देण्यात यावी, अशा मागणीचे लेखी अर्ज महापालिका प्रशासनाकडे करुन शिवसेना (शिंदे गटाचे) स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरोधात अर्ज बाण सोडला आहे.

शहापूर तालुक्यातील एक ही ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यावाचून राहू नये- अशोक शिनगारे

ठाणे : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई बाबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे छायादेवी शिसोदे यांच्या उपस्थितीत शहापूर पंचायत समिती सभागृहात पाणीटंचाई बाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी यांनी 31 मार्च 2024 पर्यंत टँकर ग्रस्त असलेल्या एकूण ९१ गाव पाड्याची माहिती घेतली. पुढील महिन्यात पाणी संबंधित येणाऱ्या समस्या त्यावर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सुचना दिल्या. तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे त्यामुळे कोणताही ग्रामस्थ पाण्यावाचून राहता नये. ज्या गावात पाणी पातळी कमी होऊन पाणी टंचाई आढळून येण्याची शक्यता आहे त्या गाव पाड्यासाठी पंधरा दिवस आधी प्रस्ताव सादर करून एक दिवस आधीच टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात यावा असे सांगितले. गावातील लोकसंख्या, गावातील हातपंप संख्या, विहीरीची संख्या आणि पाण्याच्या इतर पर्याय तपासून पुढील पंधरा दिवसांत शहापूर तालुक्यातील पाणी पुरवठा संदर्भात नियोजन करण्यात यावे अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी उपस्थित सर्व ग्रामसेवकांना सांगितले. शहापूर तालुक्यात स्वच्छता प्रश्न महत्त्वाचा आहे.‌ कचऱ्याची विल्हेवाट वेळोवेळी लावणे गरजेचे आहे. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच कचरा उचलला गेल्यानंतर व आधी असे फोटो काढून फोटो संकलन करण्यात आले पाहिजे. तसेच ग्रामसेवकांनी ज्या ठिकाणी ग्रामस्थ किंवा इतर कोणी कचरा टाकत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असे यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी भिवंडी अमित सानप, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ ठाणे तन्मय कांबळे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग प्रदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी पंचायत समिती शहापूर भास्कर रेंगडे, उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग पंचायत समिती शहापूर विकास जाधव, स्वच्छ भारत मिशन पंडित राठोड, तसेच पाणीपुरवठा व जलसंपदा विभागातील सर्व अभियंता शहापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, शहापूर पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बारामती लोकसभा मतदारसंघातून सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची घोषणा

अखेर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली घोषणा मुंबई :बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. महायुतीच्या माध्यमातून या अगोदरच रायगड मतदारसंघातून सुनिल तटकरे तर शिरुर मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील या दोन उमेदवारांची अजितदादा पवार यांनी घोषणा केली होती. आणि आज प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातील परभणी मतदारसंघात रासपचे महादेव जानकर यांची उमेदवारी तर त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणी लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला (रासप) देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याची माहितीसुद्धा सुनिल तटकरे यांनी दिली. राष्ट्रीय समाज पक्षाला जागा देताना महायुतीचे उमेदवार म्हणून महादेव जानकर हे निवडणूक लढवणार असून त्यांनी महाराष्ट्रात धनगर समाजाची एक चळवळ, आरक्षणाचा लढा उभा केला आहे. त्यांचे योगदान समाजासाठी मोठया प्रमाणात असल्यानेच परभणीची उमेदवारी घोषित करत असून अतिशय चांगल्या फरकाने ते विजयी होतील असा विश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला. हा निर्णय घेताना परभणी जिल्हयातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. राजेश विटेकर, बाबाजानी दुर्रानी, प्रतापराव देशमुख यांच्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांची प्रदीर्घ चर्चा केली आहे. त्या चर्चेनंतर आज महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणाही सुनिल तटकरे यांनी केली. राजेश विटेकर हे अतिशय चांगले पदाधिकारी आहेत. मागील निवडणुकीत त्यांचा थोडाशा फरकाने पराभव झाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यामार्फत एका तरुण कार्यकर्त्याला सन्मानपूर्वक योग्य ती संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्लमेंटरी बोर्ड नक्की घेणार आहे अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. या पत्रकार परिषदेला रासपचे नेते महादेव जानकर, क्रीडामंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते.

पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात जेष्ठ पत्रकार एस. रामकृष्णन यांना जीवन गौरव

ठाणे : ठाणे जिह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या जेष्ठ- श्रेष्ठ पत्रकारांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा भव्य पत्रकार मेळावा मोठ्या दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. या मेळाव्यात ६० वर्षांपासून आजतागायत पत्रकारिता करणारे…

बित्तंबातमीच्या राजकीय संपादक स्वाती घोसाळकर यांना प्रदान

भारत गौरव राष्ट्रप्रेरणा पुरस्कार २०२४ मुंबई : लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य आयोजित भारत गौरव राष्ट्र प्रेरणा पुरस्कार 2024 वितरण सोहळा मोठ्या जल्लोषात मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात पार पडला. यावेळी…

महापारेषणच्या बिघाडामुळे बदलापूर, अंबरनाथ परिसरात वीजपुरवठा बाधित

कल्याण : महापारेषणच्या पडघा ते अंबरनाथ दरम्यानच्या १०० केव्ही वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर चारच्या काही भागांमधील महावितरणच्या ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला. रविवारी सकाळी सातच्या सुमारास झालेला बिघाड महापारेषणकडून दुरूस्त होईपर्यंत संबंधित भागात भार व्यवस्थापन करून वीजपुरवठा करण्यात आला. महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातून अंबरनाथकडे येणाऱ्या १०० केव्ही उच्चदाब वाहिनीत रविवारी सकाळी बिघाड झाला. परिणामी या वाहिनीवरून वीजुपरवठा होणाऱ्या महावितरणच्या बदलापूर पूर्व आणि पश्चिम, अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम तसेच उल्हासनगर चार उपविभागातील कांही भागांचा वीजपुरवठा बाधित झाला. महापारेषणकडून बिघाड शोधण्यासाठी युद्धपातळीवर काम सूरू होते. मात्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत बिघाड दुरूस्त होऊ शकला नव्हता. त्यामुळे पडघा ते मोहने या उच्चदाब वाहीनीद्वारे उपलब्ध स्त्रोताच्या आधारे भार व्यवस्थापन करून बदलापूर, अंबरनाथ व उल्हासनगर चार उपविभागात चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा सुरू होता. दरम्यान सायंकाळी साडेचारच्या दरम्यान मुख्य बिघाड निदर्शनास आला असून महापारेषणकडून सायंकाळी साडेपाचपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन वीजपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान गुरुवारी (२९ मार्च) रात्रीही महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील सीटीमध्ये बिघाड झाल्याने बदलापूर आणि परिसरातील महाविरतणच्या ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता.

उल्हासनगरमध्ये तंत्रज्ञान आणि सुविधांनी परिपूर्ण गोशाळा

उल्हासनगर : उल्हासनगर येथील स्वामी शांतीप्रकाश आश्रमात गोशाळा हे भाविकांसाठी अनेक वर्षांपासून श्रद्धेची ठिकाण असून आता ही गोशाळा तंत्रज्ञान आणि सुविधांनी परिपूर्ण बनविली जात आहे. अशा प्रकारच्या सुविधा देणारी ही ठाणे जिल्ह्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण गोशाळा असल्याची माहिती स्वामी देवप्रकाश महाराज यांनी दिली. स्वामी शांतीप्रकाश आश्रमातील राधेश्याम गोशाळेत स्वामी देवप्रकाश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर- 5 येथील स्वामी शांतीप्रकाश मंदिरात बांधलेल्या गोशाळेत अनेक वर्षांपासून 1700 गायींची सेवा केली जात असून गायी सोबतच कबुतर, पक्षी देखील आहेत. तेथे सेवा दिली जाते. सामान्य दिवशी कोणीही व्यक्ती पवित्र वातावरणात असलेल्या गोठ्यात जाऊन गाईंना गवत, केळी इत्यादी खायला घालू शकते. तेथे गवत, केळी, भाज्या इत्यादींची विशेष स्वच्छता केली जाते आणि विशेष पौष्टिक आहारही दिला जातो. गाई नेहमीच्या नित्यक्रमानुसार, गायींसाठी येथे आयोडीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिले जाते. गेल्या काही दिवसांपासून ही गोशाळा अत्याधुनिक पद्धतीने बनविली जात असून गाईच्या सेवेसाठी लागणारे गवत किंवा खाद्यपदार्थ सहज पोहोचवण्यासाठी ट्रॉली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.गोरक्षण आणि उपचारासाठी दोन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. या उपक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी 23 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

दोन तारखेपर्यंत भाजपविरोधात  मजबूत आघाडी उभी करणार !

ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषदेत माहिती मुंबई : या लोकसभेमध्ये आमचा प्रयत्न होता की, भाजपच्या विरोधात मजबूत आघाडी व्हावी. पण दुर्दैवाने आम्हाला जशी आघाडी पाहिजे तशी होत नाही. विविध…

काँग्रेसची माघार नाहीच! मैत्रीपुर्ण लढतीची ऑफर

मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र काही जागांवरील तिढा अद्याप सुटलेला नाही. यामध्ये सांगली, भिंवडी, दक्षिण मध्य मुंबई अशा काही जागांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत अनेक बैठका…

विजय शिवतारे आज तलवार म्यान करणार !

पुणे : अजित पवारांशी थेट पंगा घेऊन बारामतीत सुनेत्रा पवार यांच्याविरोधात अपक्ष लढण्याची घोषणा करणारे विजय शिवतारे आज शनिवारी दुपारी आपली तलवार म्यान करतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत रात्री उशीरापर्यंत चाललेल्या बैठकीनंतर…