प्रफुल्ल पटेलांना क्लीन चिट
सीबीआयकडून भ्रष्टाचाराचा खटला बंद नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर 2017 मध्ये नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद करीत त्यांना क्लीन चीट…
Thane news
सीबीआयकडून भ्रष्टाचाराचा खटला बंद नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर 2017 मध्ये नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद करीत त्यांना क्लीन चीट…
बनासकांठा (गुजरात) : माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वकिलाला अडकवण्यासाठी ड्रग्ज पेरल्याप्रकरणी गुजरात कोर्टाने ही शिक्षा जाहीर केली. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर शहरातील…
५६ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मुंबई : भारतीय खो-खो महासंघाच्या वतीने दिल्ली येथे होणाऱ्या ५६ व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचा थरारा गुरूवारपासून सुरू झाला आहे. महाराष्ट्राचे दोन्ही संघ अव्वल कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. हि स्पर्धा करमाळी सिंग क्रीडांगण, बसंत लेन, रेल्वे कॉलनी, पहारगंज येथे १ एप्रिलपर्यंत रंगणार आहे. महाराष्ट्राच्या महिला संघाने आसामचा एक डाव २६ गुणांनी (३६-१०) धुवा उडवत विजयी सलामी दिली. महाराष्ट्राकडून अश्विनी शिंदे (३.२० मि. संरक्षण व ८ गुण), अपेक्षा सुतार (२.५० मि. संरक्षण व २ गुण), रेश्मा राठोड (२.४० मि. संरक्षण व ४ गुण), संपदा मोरे (नाबाद २ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी चांगला खेळ केला. आसामकडून प्रिया (१.४०, १.२० मि. संरक्षण), निहारिका (२ गुण) यांनी चांगला खेळ केला. मात्र महाराष्ट्राच्या आक्रमक खेळापूढे आसामचा संघ टिकाव धरू शकला नाही. दरम्यान, पुरूष गटात त्रिपूरा संघ उपस्थित नसल्यामुळे महाराष्ट्र संघाला पुढे चाल देण्यात आली आहे. या स्पर्धेची गटवारी पुढील प्रमाणे पुरूष अ गट: रेल्वे, पाॅडेचेरी, पंजाब, इंडो-तिबेटीअन बाॅर्डर पोलीस, एसएसबी. ब गट: महाराष्ट्रासह तामिळनाडू, त्रिपूरा, मणिपूर, आसाम. क गट: कोल्हापूर, दिल्ली, हरयाणा, दादरा-नगर हवेली, सिक्कीम. ड गट: कर्नाटक, मध्यभारत, झारखंड, उत्तराखंड, महा पोलीस. इ गट: ओडीसा, विदर्भ, हिमाचलप्रदेश, लडाख. फ गट: आंध्रप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, जम्मु-काश्मिर. ग गट: वेस्टबंगाल, गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार. ह गट: केरळ, तेलंगणा, गोवा, चंदिगड यांचा समावेश आहे. महिलांमध्ये अ गट: महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, इंडो-तिबेटीअन बाॅर्डर पोलीस आणि आसाम यांचा समावेश आहे. ब गट : एअरपोर्ट, राजस्थान, तेलंगणा, एसएसबी, सिक्कीम. क गट: दिल्ली, आंध्रप्रदेश, झारखंड, दादरा-नगर हवेली, त्रिपूरा. ड गट: ओडिसा, पंजाब, पाँडेचेरी, जम्मू-काश्मिर, महा पोलीस. इ गट: गुजरात, तामिळनाडू, मध्यप्रदेश, गोवा, लडाख. फ गट: केरळ, विदर्भ, हिमाचल प्रदेश, मणिपूर. ग गट: कर्नाटक, कोल्हापूर, उत्तराखंड, बिहार. ह गट: हरयाणा, वेस्टबंगाल, छत्तीसगड, चंदिगड. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय अनूभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या महाराष्ट्रचे दोन्ही संघ अव्वल कामगिरीसाठी सज्ज आहेत, असा विश्वास भारतीय महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई : ४६ वी सब ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २८ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान जीवन दीप शिक्षण संस्था, वाराणसी, उत्तर प्रदेश येथे संपन्न होत आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे १५ खेळाडू आणि २ व्यवस्थापक असा एकंदर १७ जणांचा चमू वाराणसी येथे रवाना झाला असून संघातील खेळाडूंना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे वातानुकूलित रेल्वे प्रवास व्यवस्था, २ सेट गणवेश व प्रत्येकी रुपये १,०००/= प्रवास भत्ता अशी सुविधा देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे १४ वर्षा खालील ( सब ज्युनिअर गट ) मुले : आयुष गरुड, रुद्र गवारे, वेदांत राणे, द्रोण हजारे, ध्रुव भालेराव, प्रसाद माने १२ वर्षां खालील ( कॅडेट गट ) मुले : नील म्हात्रे, अनंत जैन ( नंदू सोनावणे, संघ व्यवस्थापक ) १४ वर्षा खालील ( सब जुनिअर गट ) मुली : तनया पाटील, स्वरा मोहिरे, पूर्वा केतकर, स्वरा कदम, जिशा आसलडेकर १२ वर्षा खालील ( कॅडेट गट ) मुली : दुर्गेश्वरी धोंगडे, निधी सप्रे ( माधवी आसलडेकर, संघ व्यवस्थापक ) अरुण केदार मानद सचिव महाराष्ट्र कॅरम असोसिएशन
ज्ञानेश्वर पाटील यांना मिळालेली रयत शिक्षण संस्थेचे कुबेर ही उपमा कौतुकास्पद राज भंडारी पनवेल : रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनियर कॉलेज या विद्यालयात वरिष्ठ लेखनिक असलेले ज्ञानेश्वर पाटील यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ दि. २७ मार्च रोजी जासई येथे संपन्न झाला. रयत शिक्षण संस्थेच्या जासई विद्यालयात त्यांना विद्यालयाच्यावतीने सर्व सेवकांकडून सपत्नीक सन्मान करण्यात आला. सायंकाळी त्यांच्या कुटुंबीय, आप्तेष्ट व मित्र मंडळींकडून घरगुती सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. सदर सोहळ्याला ज्येष्ठ शिक्षक नेते दा.चां.कडू गुरुजी सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी याठिकाणी उपस्थित राहून ज्ञानेश्वर पाटील यांचे अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याची सुरुवात ज्ञानेश्वर पाटील यांच्या सेवापूर्तीतील ३६ वर्षे त्यांच्या संघर्षाची कहाणी उपस्थितांसमोर कथित करण्यात आली. शिक्षक नेते दा.चां.कडू यांनी ज्ञानेश्वर पाटील यांची सेवाभावी वृत्ती, प्रामाणिकपणा आदी बाबी निदर्शनास आणताना नात्यापेक्षा आपल्या बरोबर त्यांनी जपलेले स्नेहसंबंध हे रक्ताच्या नात्यापेक्षा निश्चितच श्रेष्ठ असल्याचे गौरवोद्गार काढले. सत्काराला उत्तर देताना ज्ञानेश्वर पाटील व त्यांच्या सौभाग्यवती भावूक झाले होते. आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी आपल्या प्रामाणिक सेवेच्या घडामोडी कथन केला. यावेळी दा.चां.कडू गुरुजी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना ज्ञानेश्वर पाटील यांच्या सेवेतील अनेक ठिकाणांच्या शैक्षणिक सेवांना उजाळा दिला. ज्ञानेश्वर पाटील यांच्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ज्ञानेश्वर पाटील यांच्या आजोबांनी रयत शिक्षण संस्थेला जासई शाळेसाठी एक एकर जागा बक्षीस रूपाने दिली होती. ज्ञानेश्वर पाटील हे बीएससी झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेने एक एकर जागेची जाणीव ठेवत ज्ञानेश्वर पाटील यांच्या शिक्षणाची दखल घेवून त्यांना आपल्या शिक्षण संस्थेत रुजू करून घेतले. सुरुवातीपासूनच अतिशय हुशार आणि प्रामाणिक असलेले ज्ञानेश्वर पाटील यांना संस्थेने सहाय्यक लेखनिक पदाची जबाबदारी सोपविली. सुरुवातीला उरण तालुक्यातील गव्हाण येथील शाळेत सेवा दिल्यानंतर त्यांची पोलादपूर तालुक्यातील तुर्भे आणि नंतर पैठण याठिकाणी बदली झाली. त्यानंतर महाड तालुक्यातील विन्हेरे येथे देखील त्यांनी सेवा केली. नंतर मात्र संस्थेने त्यांना त्यांच्या घराजवळ पनवेल तालुक्यातील रिटघर नंतर दापोली – पारगाव येथे बदली केली. रयत शिक्षण संस्थेतील त्यांच्या प्रामाणिक कामाची पोहोच म्हणून एक अनोखी भेट रयत शिक्षण संस्थेच्यावतीने त्यांना देण्यात आली. आजोबांनी बक्षिसी रूपाने दिलेल्या एक एकर जागेत वसलेल्या शाळेतच त्यांची बदली ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. या सर्वच शाळेतील त्यांच्या कामावर रयत शिक्षण संस्थेचे वरिष्ठ नेहमीच खुश राहत. कारणही तसेच होते, या सर्व प्रवासादरम्यान ते मुख्य लेखनिक या पदावर काम करीत असताना शाळेच्या व्यवहारात कोणताही अपहार ना त्यांनी केला ना त्यांच्यामार्फत कोणाला करू दिला. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे ते कुबेर म्हणून त्यांना शाळेत संबोधले जावू लागले. कुबेर ही उपमा ज्ञानेश्वर पाटील यांना मिळणे ही बाब मुळात कौतुकास्पद असल्याचे दा.चां.कडू गुरुजींनी यावेळी सांगितले. दा.चां.कडू गुरुजींनी यावेळी सांगितले की, मला सेवानिवृत्त होऊन २७ वर्षे झाली. मी आजही निरोगी आहे. सध्या माझे वय ८७ वर्षांचे आहे. आपण दररोज घरातील किरकोळ कामे स्वतः करीत असतो. ज्ञानेश्वर पाटील यांनीही घरातील परिसरातील छोटीमोठी कामे करून आपले शरीर सुदृढ ठेवावे. त्यांच्या अर्धांगिनी वनिता पाटील, बँकेत असिस्टंट मॅनेजर असलेले त्यांचे चिरंजीव आदित्य पाटील, स्नुषा अवंतिका आणि धा.चिरंजीव केतन पाटील यांची भरभक्कम साथ असल्यामुळे ज्ञानेश्वर पाटील यांचे उर्वरित आयुष्यही आनंदात जाईल, असा विश्वास कडू यांनी व्यक्त केला.
तुकाराम बीजनिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल तालुक्यातील कोपर येथील मंदिरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे मनोभावे दर्शन घेतले. या यावेळी ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, कामगार नेते महेंद्र घरत, माजी उपसरपंच विजय घरत, अनंता ठाकूर, सुधीर ठाकूर, जयवंत देशमुख, किशोर पाटील, साईचरण म्हात्रे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश आयुक्तांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा ठाणे : नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण करून १५ एप्रिलपासून महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दिले. त्याचबरोबर, अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे यांनी मान्सूनच्या काळात महापालिकेच्या विविध विभागांवर असलेल्या जबाबदाऱ्या, त्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था याबद्दल सादरीकरण केले. या बैठकीत, नालेसफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्याबद्दल उचित कार्यवाही करून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच, १५ एप्रिलपासून नालेसफाई प्रत्यक्षात सुरू केली जावी, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. त्याचबरोबर, महापालिका क्षेत्रातील ८६ अती धोकादायक इमारतींचा तातडीने आढावा घेण्यात यावा, असेही श्री. राव यांनी स्पष्ट केले. इमारत अतिधोकादायक असल्याबद्दल काही वाद असतील आणि त्यात त्रयस्थ संस्थेकडून लेखापरिक्षण करून घेण्यात येणार असेल तर तेही लगेच केले जावे. त्याच्या अहवालाचा पाठपुरावा करावा. अती धोकादायक इमारतीत रहिवासी रहात असतील तर त्या इमारती रिकाम्या करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावेत. माणुसकीचा दृष्टीकोन ठेवून प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र उपाययोजना करावी, असेही श्री. राव यांनी सांगितले. अती धोकादायक इमारतींबाबत जनजागृती करावी, इमारत जीर्ण होत असेल तर त्यात कोणकोणती लक्षणे दिसतात, याचीही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात यावी, अशी सूचनाही आयुक्त श्री. राव यांनी केली. वंदना एसटी स्टॅण्डसारख्या सखल भागात पाणी साचू नये, त्याचा जलद निचरा व्हावा यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, याची माहितीही या बैठकीत आयुक्तांनी घेतली. मान्सूनच्या काळात सर्व प्रमुख अधिकारी, आप्तकालीन सेवेत ज्यांच्यावर जबाबदारी आहे, असे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोबाईल कायम संपर्क क्षेत्रात राहतील आणि त्यावर तत्काळ प्रतिसाद दिला जाईल, याची दक्षता घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. आपत्कालीन कक्षाला भेट बैठकीनंतर, ठाणे महापालिका मुख्यालयालगत असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला आयुक्त श्री. राव यांनी भेट दिली. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी, माहिती त्यांना दिला जाणारा प्रतिसाद याची माहिती त्यांनी घेतली. तसेच, मान्सूनच्या चार महिन्याच्या काळात महावितरण आणि पोलीस यांचे सक्षम समन्वयक आप्तकालीन कक्षात असावेत, असे आयुक्त श्री. राव म्हणाले. त्यासाठी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिली. उत्तम समन्वयामुळे जलद प्रतिसाद मिळून आपत्तीची तिव्रता कमी होते, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. टीडीआरएफची केली पाहणी हाजूरी येथील टीडीआरएफच्या शिबिरालाही आयुक्त श्री. राव यांनी भेट दिली. या कृती दलाची साधनसामुग्री, गणवेश यांची पाहणी आयुक्तांनी केली. विविध मोहिमांमध्ये या कृती दलाला आलेला अनुभवही त्यांनी जाणून घेतला. आणखी कोणती साधनसामुग्री, प्रशिक्षण आवश्यक असल्यास त्याची मागणी लगेच नोंदवावी, असेही आयुक्तांनी या पथकाला सांगितले. डाटा सेंटरचा वापर वाढवावा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या अदययावत डाटा सेंटरलाही आयुक्तांनी भेट दिली. हे सेंटर अद्ययावत आहे. त्यामुळे त्याचा वापर वाढवून कोणत्याही आप्तकालीन परिस्थितीचा अर्लट त्यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन केंद्राला जलद मिळावा, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. या भेटीदरम्यान, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) जी. जी. गोदेपुरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी उपस्थित होते. 00000
राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार पक्षाने काढले परांजपे-मुल्लांचे वाभाडे अनिल ठाणेकर ठाणे : आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केले आहेत. महायुतीमध्ये या दोघांना अजिबात महत्त्व नाही. त्यामुळे स्वतःचे अस्तित्व दाखविण्याचा परांजपे-मुल्ला यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. हे आरोप करण्यापूर्वी बिल्डर्सचे प्लॅन अडवून ठाणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो? आणि ज्यांनी परांजपेंच्या कुटुंबाचे हाॅस्पीटलचे बिल भरले ते कपटी मित्र कसे? , याचे उत्तर परांजपे-मुल्ला यांनी द्यावे, अशा शब्दात जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर आणि प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी वाभाडे काढले. जो नाही झाला बापाचा; जो नाही झाला ठाकरे-शिंदेंचा; जो नाही झाला आव्हाडांचा , तो काय होणार अजित पवारांचा? , असा सवाल करीत सुहास देसाई म्हणाले की, आनंद परांजपे यांना महायुतीतच काय तर त्यांच्या पक्षातही महत्व नाही. त्यामुळेच ते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर उठसूठ टीका करून महत्व वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. डाॅ.जितेंद्र आव्हाड हे दोन वेळा कॅबिनेट मंत्री होते. पण, त्यांनी कधीच कुणाकडून पैसे उकळले नाहीत. पण, पालिकेतील चौथ्या मजल्यावर बिल्डरचे प्लॅन अडवून किती पैसे उकळले जातात, हे सबंध ठाण्याला माहित आहे. मुंब्र्यातील बिल्डरला कसा त्रास देण्यास सुरूवात केली आहे. परमार बिल्डरला कुणामुळे आत्महत्या करावी लागली होती? कोण दाऊदच्या भावाबरोबर बिर्याणी खात होता? मुल्ला यांचे दाऊदसोबत सबंध आहेत, असे वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबिर सिंह यांनी जाहीरपणे कसेकाय सांगितले होते? शानू पठाण यांना मारण्याची सुपारी जावेद बटला या मुंब्रा येथील इसमाला कोणी दिली होती? कुणाच्या ऑफिसमध्ये इसीसचा सदस्य कामाला होता? एवढेच नाही तर ज्या कोकण मर्क॔टाईल बँकेचा कारभार नजीब मुल्ला पहात आहेत; त्या बँकेत कोट्यवधी रूपयांची अफरातफर झाल्याची तक्रार एका मुस्लीम बांधवाने केली होती. त्याची सुरू झालेली चौकशी कोणी थांबविली? या प्रश्नांची उत्तरे द्यायला आम्हाला लावू नका. आनंद परांजपे यांनी आमच्या नेत्याचा कपटी मित्र असा उल्लेख केला आहे. त्यांना हेच विचारायचे आहे की तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला कोविड झाला तेव्हा तुमचे बिल कोणी भरले होते, याची जरा जाण ठेवा आणि नंतर कपट हा शब्द वापरा ! कार्यालयातील खाणं-पिणं, टिपटाॅपचा नाश्ता याचे पैसे कुठून जायचे. तेव्हा याच डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी तुम्हाला पोटच्या मुलाप्रमाणेच सांभाळले होते, याची तरी जाण परांजपेंनी ठेवायला हवी, असा टोलाही देसाई यांनी लगावला. विक्रम खामकर यांनी, गद्दार गटाचे आनंद परांजपे यांनी राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून गाड्या भरून माणसे अजित पवार यांच्या बंगल्यावर नेली होती. पण, त्यांचे नावही कुणी घेतले नाही. लोकसभेला तर किंचीतसा उल्लेखही झालेला नाही. पक्षात किमंत नसल्याने ते नैराश्यातून अशी बेताल वक्तव्ये करीत आहेत. त्यांनी केलेल्या गद्दारीमुळे दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांच्या पत्नी म्हणजेच आनंद परांजपेंच्या मातोश्रीही त्यांना मत देणार नाहीत, अशी टीका केली. तर , रचना वैद्य यांनी, रिकाम्या भांड्याचा मोठा आवाज येत असतो. आनंद परांजपे हे असेच रिकामे भांडे आहे. ठाण्यातील स्वतःचे नाव उंच करण्यासाठी परांजपे हे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करीत आहेत. पण, त्यांना त्यांचेच लोक गांभीर्यपूर्वक घेत नाहीत, हे सत्य त्यांनी स्वीकारावे, असे सांगितले. या पत्रकार परिषदेस ठाणे शहर महिलाध्यक्षा सुजाताताई घाग, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे आदी उपस्थित होते.
ठाणे : सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे आयोजित तर्फे ‘ठाणे मुक्ती दिन’ मोठ्या उत्साहात ठाणे मध्यवर्ती कारागृहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे यंदाचे वर्ष १० वर्ष होते. या ऐतिहासिक कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर, प्रशांत आलुगडे, संगीता श्री. सीताराम राणे, परिवहन सदस्य श्री. विकास पाटील, निलेश कोळी, विशाल वाघ, सुरेश कांबळे, हरी मेजर, लालजी यादव व सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.पोर्तुगीजांनी अनेक हाल येथील जनतेचे केले. पोर्तुगीजांच्या अत्याचाराला जनता कंटाळाली होती. या जाचातून सोडविण्याकरिता त्यांनी बाजीराव पेशवे यांच्याकडे याचना केली असता 27 मार्च 1737 साली चिमाजी अप्पा यांनी एका रात्रीत स्थानिकांच्या मदतीने ठाणे किल्ला पोरतुगीज्यांच्या जोखडीतून सोडविला आणि ठाणे मुक्त केलं. या लढाईत बलकवडे, ढमढरे, अंजूर चे नाईक यांनी पराक्रम गाजवाला. अशी माहिती संजय केळकर यांनी उपस्थितांना दिली व ठाणे मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा दिला.तर आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे मुक्ती दिनाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या.