Category: ठाणे

Thane news

मावळी मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धा

पुरुष गटात विहंग क्रीडा केंद्र तर महिला गटात ज्ञानविकास फॉउंडेशनला विजेतेपद ठाणे : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व द अमॅच्युअर खो-खो असोसिएशन ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली  मावळी मंडळाने शतक महोत्सवी वर्षानिमित्त…

अखेरीस एक दिवस भारताचा “श्रीलंका” होईल – आमदार डाॅ..जीतेंद्र आव्हाड

अनिल ठाणेकर ठाणे : जर असाच रूपया पडायला लागला तर भारत कर्जबाजारी होईल. वरून दिसायला कितीही सुंदर असले तरी अर्थव्यवस्था आतून पोखरली जाईल अन् अखेरीस एक दिवस भारताचा “श्रीलंका” होईल,…

लोकसेवा समितीच्या 27 व्या वर्धापन दिन निमित्त आयोजित भव्य कोकण मेळाव्यात यंदाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून स्वीकारताना भास्कर दिलीप नलावडे आणि सौ. मीनाक्षी मालवणकर. उजवीकडे लोकसेवा समितीचे…

अंनिसतर्फे डिजिटल स्वरुपात ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ’ सुरू होणार !

ठाणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे डिजिटल स्वरुपात ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ’ सुरू करण्यात येणार आहे. रत्नागिरी येथे अंनिसच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार समाजात रुजवण्यासाठी…

ठामपाच्या नवीन वादग्रस्त मुख्यालय उभारणीच्या चौकशीची धर्मराज्य पक्षाची नगरविकास विभागाकडे मागणी

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील वर्तकनगर प्रभाग समितीच्या क्षेत्रात असलेल्या रेमण्ड परिसरात, ठाणे महापालिका मुख्यालयाच्या ३२ मजली, भव्यदिव्य अशा नवीन इमारतीची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी तब्बल ६३१ वृक्ष तोडण्याचा…

एसटी भाडेवाढीविरुद्ध ठाण्यात महाविकास आघाडीचा एल्गार

अनिल ठाणेकर ठाणे: खोपट, एसटी डेपो समोर आज ठाणे शहर महाविकास आघाडीतर्फे एसटी महामंडळाच्याच्या मनमानी भाडे वाढीविरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले.  सदर आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे केंद्रीय…

महापालिका, मेट्रो प्राधिकरण व वाहतूक पोलीसांच्या बैठकीत मान्सूनपूर्व कामांचा आढावा

ठाणे : मान्सूनपूर्व कामे वेळेत व्हावी व सर्व यंत्रणांचा परस्पर संबंध असावा, यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विभागांची बैठक आयुक्त दालनात आयोजित केली होती. महापालिका कार्यक्षेत्रात पावसाळ्यात खड्डयामुळे…

ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने कुष्ठरोग शोध मोहीम सुरू

ठाणे : केंद्र शासनाने २०२७ पर्यंत कुष्ठरोग रुग्णांची संख्या शुन्य करण्याचे धोरण आखले आहे त्याअनुषंगाने आरोग्य विभागाच्यावतीने ३१ जानेवारी ते १४ फेब्रुवरी या कालावधीत ठाणे जिल्हा ग्रामीण व शहरी विभागामध्ये…

दहावी-बारावी परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक, पर्यवेक्षक यांच्या अदलाबदली आदेश रद्द

 शिक्षक, मुख्याध्यापकांना मोठा दिलासा कल्याण :  फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये होत असलेल्या दहावी बारावी परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक, पर्यवेक्षक यांच्या अदलाबदली आदेश रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शिक्षण बोर्डाने घेतला…

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे विचार आजच्या स्त्रियांनी अंगीकारणे ही काळाची गरज

ठाणे : जगाच्या इतिहासाची पाने चाळत असताना अनेक राजे महाराजे यांचे विविध चरित्र आपणास इतिहासात दिसून येतात यात अनेक स्त्रियांचे योगदानही मोलाचे दिसून येते. काही स्त्रियांनी इतिहास निर्माण करणारे योद्धे घडवली तर काही स्त्रियांनी स्वकर्तृत्वानेच इतिहास घडविलेला दिसतो. याचेच जगाच्या पाठीवरचे ज्वलंत, दैदिप्यमान, नेत्रदीपक उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. यांचं अहिल्यादेवी होळकर यांचे विचार महिलांनी अंगीकारणे हीच काळाची  गरज असल्याचे प्रतिपादन डॉ प्रतीक्षा बोर्डे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक,मासुंदा तलाव ठाणे येथे धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने रविवारी संध्याकाळी पाच ते सात या वेळामध्ये हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यंदाचे वर्ष हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्ष असल्याने हळदी कुंकू समारंभात उपस्थित महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पराक्रमाची माहिती देण्यात आली या कार्यक्रमात डॉ प्रतीक्षा बोर्डे बोलत होत्या.या कार्यक्रमाला माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेविका नंदिनी विचारे,रूपाली शिंदे, धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाचा अध्यक्षा माधवी बारगीर,सचिव गायत्री गुंड, संगिता खटावकर,सुषमा बुधे, सीमा कुरकुंडे, मीना कवितके, सुजाता भांड,मनीषा शेळके,स्मिता गावडे,अमृता बुधे,शीतल डफळ आदिसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पुढे बोलताना प्रतीक्षा बोर्डे म्हणाल्या की आजही एकविसाव्या शतकातील स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीनेच नव्हे तर एक पाऊल पुढे टाकून सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत याचा अभिमान वाटतो. राजकारण, समाजकारण, धर्मकारण, खेळ, इत्यादी सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.आजच्या महिलांनी  आपल्या पाल्ल्यांना कार्टून चॅनल दाखवून  भविष्य काळातील जोकर  घडवण्या पेक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा  क्रांतिकारी विचार बालकांच्या मनावर बिंबवले तर पुढील पिढया कडून आपण खूप मोठ्या क्रांतिकारी इतिहासाची अपेक्षा ठेऊ शकतो. माता हीच बालकाची पहिली गुरु असते .ज्याप्रमाणे अहिल्याबाईंनी त्यांच्या समोर  उभ्या असलेल्या असंख्य संकटाचा सामना मोठ्या धैर्याने केला.याकामी त्यांना त्यांनी वाचन केलेले धर्मग्रंथ महापुरुषांचे चरित्र कामी आले . आजच्या स्त्रियांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई चे  विचार आत्मसात करणे,समाज उपयोगी विचारांचा प्रसार,प्रचार करणे, अनावश्यक (घातक)  पाश्चात्य संस्कृती टाळून ,भारतीय संस्कृती अंगीकारणे  हीच काळजी गरज असल्याचे मार्गदर्शन डॉ प्रतीक्षा बोर्डे यांनी उपस्थित महिलांना केले.