Category: ठाणे

Thane news

‘निवृत्तीनंतरच्या समाजकार्यात तुमची साथ महत्वाची’

ठाणे : निवृत्तीनंतर आपल्या अनुभवाचा, ज्ञानाचा फायदा समाजाला व्हावा म्हणून वार्षिक स्नेहसंमेलनच्या माध्यमातून विविध समाजउपयोगी उपक्रम  राबवताना गेली २९ वर्षे तुम्हीं दिलेल्या साथीमुळेच ते शक्य झाले, त्यामुळे तुम्हीं होतात म्हणून मी आहे असे भावपूर्ण मनोगत ७५ वर्षीय अनंत कदम यांनी व्यक्त केले. कुठल्याही कर्मचाऱ्याला निवृत्ती, बदली किंवा स्वेच्छा निवृत्ती हे नवीन नाही. पण वरील गोष्टीमुळे निंर्माण होणार दुरावा  वार्षिक स्नेहसंमेलनतून  निघून जावा म्हणून बँक ऑफ इंडियाच्या काळबा देवी शाखेने १९९६ साली हा उपक्रम सुरु केला. यंदा या मित्र मेळाव्याचे २९ वे वर्ष होते. पहिल्या वर्षांपासून अनंत कदम हे या कार्यक्रमासाठी पुढाकार घेत आले आहेत. सुरुवातीला स्नेहसंमेलनाचे स्वरूप असलेल्या या मित्र मेळाव्याला मागील काही वर्षांपासून सामाजिक उपक्रमांची जोड देण्यात आली. सुरुवातीच्या काळापासून मित्र मेळाव्यात सहभागी होणाऱ्या १०६ अधिकारी,कर्मचाऱ्यांना देवाज्ञा झाली. यावर्षी ५५ महिला आणि पुरुष कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गतवर्षी दिवंगत झालेल्या १० सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर ८० वर्षीय अविनाश दांडेकर, शरद हर्डीकर, प्रल्हाद नाखवा, सहाय्यक व्यवस्थापक सतीश प्रभू यांनी वेगवेगळ्या उपक्रमाचा आढावा घेत आठवणीना उजाळा दिला  नायर सभागृहात झालेल्या या मित्र मेळाव्यात मुंबई मॅरेथॉनमधील  ४.५ किलोमीटर अंतराची वॉकथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या ७५ वर्षीय बलराम मेनन यांना यावेळी गौरवण्यात आले.शंकर नांदोस्कर ( जय गंगे भगिरथी ),  अश्विनी राणे (संय्या मिलके जाना रे), सुलभ अय्यर (एका तळ्यात होती बदके साथ ), यक्षा धुलधोया (जीना इसिका नाम है ) यांनी स्वरमैफलित रंग भरले. सतीश प्रभू यांनी आभार प्रदर्शन करताना पुढील वर्षी ३० वे वर्षे  साजरे करताना वेगळे उपक्रम घेऊन अनंत कदम आणि छायाचित्रकार नरु शहा तयार असतील असे सांगितले.

वींद्र कृष्णाजी तामरस सरांचा अमृत महोत्सव सोहळा संपन्न

मो. ह. विद्यालयातील पदार्थ विज्ञानाचे तज्ञ माजी शिक्षक ठाणे : कर्तृत्वाचा सुवर्ण महोत्सव अन वयाचा अमृत महोत्सव असा अपूर्व योग लाभलेले मो. ह. विद्यालयातील पदार्थ विज्ञानाचे तज्ञ शिक्षक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या रवींद्र कृष्णाजी तामरस सरांचा अमृत महोत्सव शाळेने 18 जानेवारी 2025 रोजी शाळेत आयोजित केला होता. आजी-माजी शिक्षक-शिक्षकेतर व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन, पुढाकार घेऊन हा सोहळा करणे म्हणजे एका कर्मयोगी शिक्षकांच्या जीवन प्रवासातील तो अत्युच्च आनंदाचा क्षण ठरावा. मानपत्र, शाल, श्रीफळ व पुस्तके देऊन सरांचा यथोचित सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर, संस्थेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी, माजी शिक्षक गणेश पेंडसे, सुबोध देशपांडे व मुख्याध्यापक विकास पाटील यांनी केला. याप्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ सदस्य, आजी-माजी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, हितचिंतक, मित्रपरिवार, नातेवाईक सरांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते. या सुवर्णक्षणी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जमा केलेल्या निधीतून शाळेत अधिक दोन सौर ऊर्जा पॅनल चे उद्घाटन रवींद्र कृष्णाजी तामरस सरांच्या हस्ते केले. सरांच्या कार्याची, कर्तृत्वाची, अखंड सेवेची दखल उपस्थित प्रत्येकाने घेतली. अध्यक्ष, कार्याध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक यांनी सरांच्या प्रामाणिकपणाच्या निरलस सेवेचे भरभरून कौतुक केले. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अभय ओक यांनी मी घडलो तामरस सरांमुळे असे गौरवपर पत्र पाठवले. विविध क्षेत्रांतील उच्च पदावर असलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तामरस सरांच्या मनोगतातून बालपणापासून ते वयाच्या 75 पर्यंतचा चढता आलेख ऐकून सरांच्या अचाट आणि अफाट स्मरणशक्तीचे सभागृहाने कौतुक केले. अत्यानंदाची बाब म्हणजे एरवी गौरवमूर्तीला भेटवस्तू म्हणून धनादेश दिला जातो उलट इथे मात्र तामरस सरांनीच मुख्याध्यापकांकडे दीड लाखाचा धनादेश सुपूर्द केला. गुरुवर्य कै. अक्षीकर, एस. व्ही. कुलकर्णी, कै. चितळे सर यांच्या संस्कारांमुळे, प्रेरणेमुळेच घडल्याचे सरांनी सांगितले. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे ही त्यांनी कौतुक केले अशा हृदय सोहळ्याचे सुवर्णक्षण अनेकांनी आपल्या मनात आणि कानात साठवून ठेवले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी व सहकारी शिक्षिका स्नेहा शेडगे यांनी केले.

…तर रिपाइं (आठवले) ठामपाची निवडणूक स्वबळावर लढणार – सुरेश बारशिंगे

ठाणे : विधानसभा निवडणुकीत रिपाईने महायुतीला प्रचंड मदत केली आहे. त्यामुळेच महायुतीला बहुमत मिळाले आहे. मात्र रिपाईवर अन्यायच केला जात आहे. त्यामुळेच आगामी ठामपा निवडणुकीत मानाचे स्थान न दिल्यास एकूण जागांपैकी १०%  जागा स्वबळावर लढणार आणि महायुतीला धडा शिकवणार, असा इशारा रिपाई आठवले गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारसिंगे यांनी दिला. ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात रिपाइंच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर बारसिंगे पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी नवनियुक्त ठाणे प्रदेशाध्यक्ष अण्णा रोकडे,  ठाणे प्रदेश कार्याध्यक्ष महेंद्र गायकवाड,  प्रदेश सरचिटणीस बाळाराम गायकवाड,  ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, सरचिटणीस प्रमोद इंगळे, विनोद भालेराव, साहेबराव सुरवाडे, निरीक्षक प्रल्हाद मगरे आदी उपस्थित होते. बारसिंगे म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात  महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. या यशामागे आमच्या कार्यकर्त्याकडून केलेली मेहनत आहे. मात्र, आम्हाला सत्तेत वाटा मिळालेला नाही. सत्तेत वाटा मिळावा, यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. त्यानंतरही जर आम्हाला सत्तेत वाटा मिळाला नाही तर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. त्यासाठी फक्त आरक्षितच नव्हे तर खुल्या जागांवरही निवडणुका लढवून प्रस्थापित पक्षांना धक्का देऊ. उमेदवार निवडताना बहुजन समाजाला अधिक प्राधान्य दिले जाईल, असेही बारसिंगे यांनी सांगितले. दरम्यान, सोमनाथ सुर्यवंशी संशयास्पद मृत्यूप्रकरणी कारवाई करण्यासाठी लाँग मार्च काढण्यात येत आहे. या मोर्चात रिपाइंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, असेही ते म्हणाले.

साकेत विद्यामंदिर इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

कल्याण : कल्याण पूर्व, साकेत विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार  सुलभा गायकवाड या  उपस्थित होत्या.  या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य, नाटक, गायन अशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी स्नेहसंमेलनात साकेत ज्ञानपीठचे सी.ई.ओ.  शोभा नायर , प्रमोद राम उजागर तिवारी साकेत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे डायरेक्टर डॉ.सनोज कुमार, साकेत महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. वसंत भऱ्हाटे, साकेत कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य  विद्याप्रकाश मोरया, डॉ. सरोज कुमार, साकेत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पिऊली भट्टाचार्य, साकेत विद्यामंदिर इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ममता सिंग या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य .नाटक अशा विविध कार्यक्रमांचा सोहळा यशस्वीरित्या साजरा करण्यात आला.

‘एसटीची भाडेवाढ दरवर्षी होणे गरजेचे’

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती ठाणे : गेल्या अनेक वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती ती भाडेवाढ गुरुवारी प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर करण्यात आली. याबैठकीत लोकप्रतिनिधींचा सहभाग नसल्यामुळे अद्याप माझ्याकडे एसटी भाडेवाढीची अधिकृत फाईल आलेली नाही. परंतू, १४.९७ टक्के भाडेवाढ करण्यात आली अशी माहिती परिवहन खात्याचे प्रधान सचिव यांच्याकडून मिळाली. एसटीची भाडेवाढ ही दरवर्षी होणे गरजेचे आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगतिले. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ऑल इंडिया आर्किटेक्ट असोसिएशन च्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंमेलनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः एसटीच्या जमीन विकासाच्या आराखड्याचे सादरीकरण केले. या कार्यक्रमा दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, एसटी महामंडळाला दररोज तीन कोटी तर, महिन्याला ९० कोटीचा तोटा सहन करावा लागतो आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भाडेवाढ शिवाय पर्याय नाही. मी प्रधान सचिवांना सांगितले आहे की, भाडेवाढ करत असताना वार्षिक गुणवत्तेवर आधारित भाडेवाढ करावी, असेही ते म्हणाले. तसेच येत्या १ फेब्रुवारी पासून टॅक्सी आणि रिक्षाची भाडेवाढ होणार असून टॅक्सी आणि रिक्षाचे प्रति किलो मीटर प्रमाणे तीन रुपयांनी वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील एसटी आगारांचा विकास होणार राज्यातील एसटी आगारांचा विकास होणे गरजेचे आहे. अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी होती की, अत्याधुनिक बस स्थानक मिळावं तेथे विविध सोयी सुविधा असाव्यात यासाठी सरकारने सर्व एसटी आगारांचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू, यासाठी राज्यशासनाकडे तेवढा निधी उपलब्ध नसल्याने हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर किंवा बीओपी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे, असे सरनाईक म्हणाले.

मिलिंदनगर येथे आरोग्य आणि रक्तदान शिबिराचे आयोजन

कल्याण : श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित -गौरीपाडा, कल्याण .प व स्फूर्ती फाउंडेशन संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी रोजी  सकाळी १० ते ५ वा. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, कौस्तुभ बिल्डिंगच्या बाजूला, श्रीराम कॉलनीच्या मागे, मिलिंदनगर येथे भव्य रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य शिबीर मध्ये नेत्र तपासणी, चॅरिटेबल दरात चष्मे, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, हृदय विकार उपचार,मोफत बॉल्स पेसमेकर सर्जरी, कॅन्सर सर्जरी, अॅजोप्लेस्टी, डायलेसिस, हाडांची सर्जरी, बायपास सर्जरी, किडनी स्टोन सर्जरी, मधुमेह, रक्तदाब, ईसीजी तपासणी करण्यात येणार आहे. नागरीकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा तसेच रक्तदान शिबीर मध्ये रक्तदान करून एखादा व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक रक्तदान नक्की करा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व स्फूर्ती फाउंडेशन वतीने करण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिकेत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

ठाणे : पंधराव्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे मतदान शपथ घेण्यात आली. त्याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, विधी अधिकारी मकरंद काळे, महिला व बालविकास अधिकारी दयानंद गुंडप, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाने बजावला पाहिजे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. यावेळी, भारत निवडणूक आयोगाने ‘मतदानासारखे दुसरे काही नाही, मी मतदान करणारच’ अशी संकल्पना निश्चित केली आहे. त्याची माहिती अधिकारी आणि कर्मचारी यांना देण्यात आली. त्यानंतर, सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान करण्याबाबतची शपथ घेतली.

७ कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्याचे केडीएमसी आयुक्तांचे निर्देश

कल्याण  :  मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार १०० दिवसांमध्ये ७ कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी नियोजनबध्द कार्यवाही करून अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व अधिकारी वर्गास दिले…

ठाण्यातील समारोह बॅक्वेट्स येथे दि.25 जानेवारी रोजी

15 व्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमाचे आयोजन ठाणे :25 जानेवारी 2025 रोजी 15 वा राष्ट्रीय मतदार दिवस राज्यस्तर, जिल्हास्तर व मतदान केंद्र स्तरावर साजरा करावयाचा आहे. या 15 व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी “Nothing like voting. I Vote for sure” हा विषय  आयोगाकडून देण्यात आला आहे. मा.भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार दि.25 जानेवारी 2025 हा कामकाजाचा दिवस नसल्याने दि.24 जानेवारी 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व कार्यालयामध्ये मतदान शपथ (मराठी, इंग्रजी व हिंदी मधील शपथेचा नमुना सोबत जोडला आहे) घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने ठाणे जिल्ह्याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम दि.25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता समारोह बॅंक्वेट्स, तिसरा मजला, सी.के.पी. हॉल, एन.के.टी. कॉलेजच्या बाजूला, खारकर आळी, ठाणे पश्चिम येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे हे असतील तर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बित्तंबातमी वृत्तपत्राचे संपादक तथा मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, ठाणे भूषण तथा सरस्वती विद्या प्रसारक ट्रस्ट, ठाणेच्या अध्यक्ष श्रीमती एम.एस. कोरडे, चित्रपट दिग्दर्शक नितीन कांबळे हे तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणेचे सचिव ईश्वर सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमात ठाणे जिल्हा को.ऑप.हौ.सो. फेडरेशनचे सिताराम राणे, अपंग विकास महासंघ, कल्याणचे अध्यक्ष अशोक भोईर, किन्नर अस्मिता नीता केणे व ठाणे सिटिझन्स फाऊंडेशनचे अध्यक्ष कॅस्बर ऑगस्टीन हे निवडणूक दूत म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये नवमतदारांना निवडणूक ओळखपत्राचे वाटप व उत्कृष्ट काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे. तरी या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमास दि.25 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता समारोह बॅंक्वेट्स, तिसरा मजला, सी.के.पी. हॉल, एन.के.टी. कॉलेजच्या बाजूला, खारकर आळी, ठाणे पश्चिम येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी उर्मिला पाटील, 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी इब्राहिम चौधरी, 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी विठ्ठल इनामदार आणि 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी सर्जेराव मस्केपाटील यांनी केले आहे.

‘भारतीय ज्ञान परंपरोत्सव’ संकल्पनेवर ठाणे येथे ‘युवातरंग’ स्पर्धेचे जल्लोषपूर्ण आयोजन

ठाणे : कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या ‘युवातरंग’ आंतर महाविद्यालयीन स्पर्धेने विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला आणि कलागुणांना प्रोत्साहन दिले. या वर्षीच्या स्पर्धेची संकल्पना होती ‘भारतीय ज्ञान परंपरोत्सव,’ ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती, विज्ञान आणि परंपरांचा अभूतपूर्व वेध घेतला. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या विश्वस्त सौ. श्रद्धा मोरे, प्राचार्य संतोष गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना भारतीय परंपरेतील ज्ञानाचा वारसा आणि त्याचे आधुनिक जीवनातील महत्त्व यावर मार्गदर्शन केले. `युवातरंग’ स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. अशा उपक्रमांमुळे नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळते आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडते, असे मत अध्यक्ष सचिन मोरे यांनी  मांडले. ‘युवातरंग’ अंतर्गत विविध सांस्कृतिक आणि बौद्धिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यात नृत्य, गायन, वक्तृत्व, पोस्टर तयार करणे, प्रश्नमंजूषा यांसारख्या एकूण सोळा स्पर्धांचा समावेश होता. यातील सांस्कृतिक नृत्य स्पर्धेत विविध राज्यांच्या पारंपरिक नृत्यप्रकारांद्वारे भारताच्या सांस्कृतिक वैविध्याला विद्यार्थ्यांनी वंदन केले. याशिवाय पोस्टर तयार करण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पर्यावरण, विज्ञान, आणि भारतीय परंपरांवर आधारित उत्तम कलाकृती सादर केल्या. सलग तीन दिवस सुरू असलेल्या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण सोहळा थाटामाटात पार पडला. या वर्षीचा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून डोंबिवलीचे प्रगती महाविद्यालय कर्मवीर चषकाचे मानकरी ठरले. त्यांना कर्मवीर चषक व रोख रक्कम रुपये ११,१११/- देऊन गौरविण्यात आले. स्पर्धांतील इतर विजेत्यांना प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभास पाहुणे म्हणून महादेव जगताप, संस्थेच्या विश्वस्त संगीता बी. मोरे, सौ. अश्विनी सुर्वे, सुधाकर शिंदे, अशोक पालांडे, विकास घांग्रेकर, संस्थेच्या शाळांचे मुख्याध्यापक सौ. शिवांगी भोसले, स्नेहा मेस्त्री, युगंधरा पाटील, व महाविद्यालयाचे शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रशांत काळुंद्रेकर, समीर दळवी, ओमकार चिक्षे,  सचिन गजमल, सतीश आगाशे, धनश्री राक्षे, प्रा. गुलाबराव काटे, प्रा. जयश्री बालुगडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संतोष गावडे यांनी केले तर प्रा. योगिता कुंभार यांनी सूत्रसंचाल व प्रा. हर्षदा राजपुरे यांनी आभार प्रदर्शन केले. भारतीय ज्ञान परंपरांचा गौरव आणि त्यांची आधुनिक जीवनाशी सांगड घालणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते आणि त्यांना त्यांच्या कलेच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करता येते, असे मत प्राचार्य संतोष गावडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केबीपी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केलेल्या कष्टामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला. १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या कोअर टीमने संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. सांस्कृतिक विभागप्रमुख  प्रा. हर्षदा राजपुरे व  प्रा. प्रियांका लाड यांनी संपूर्ण कोअर टीमचे प्रमुख म्हणून काम पहिले. प्रा. मंदार टिल्लू यांनी सांस्कृतिक समितीस मार्गदर्शन केले. प्रा. योगिता कुंभार यांना महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५, प्रा. विजया राणे यांना वसंतस्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच प्रा. हर्षदा राजपुरे व प्रा. काजल डाकरे यांना सी.एस. इन्स्टिट्यूटचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा महाविद्यालयाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रा. काजल डाकरे यांना तसेच भरीव योगदानाबद्दल क्रीडा संचालक डॉ. एकनाथ पवळे व ग्रंथपाल प्रा. अपर्णा साने यांना सन्मानित करण्यात आले. ‘युवातरंग २०२५’ च्या या यशस्वी अध्यायामुळे ठाण्यातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी परंपरा प्रस्थापित झाली आहे. युवातरंग २०२४-२५ विजेते १. मॉडेल मेकिंग – प्रथम क्र. – खुशाल पुरडकर (सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय) २. मेहेंदी – प्रथम क्र. – नंदिता गायकवाड (प्रगती महाविद्यालय) द्वितीय क्र. – भक्ती तळेकर (एनकेटीटी कॉलेज), तृतीय क्र. – निशा विश्वकर्मा (केबीपी महाविद्यालय), उत्तेजनार्थ – प्रिया चौहान (प्रगती महाविद्यालय), समिक्षा साळवी (VSM कॉलेज) ३. डिजिटल पोस्टर बनवणे – प्रथम क्र. – नम्रता पवार (प्रगती महाविद्यालय), द्वितीय क्र. – प्रिया सिंग (के.व्ही. पेंढारकर महाविद्यालय), तृतीय क्र. – शिवम तिवारी (के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय), उत्तेजनार्थ – रेश्मा राठोड (ओ.डी.एम. कॉलेज) ४. श्लोक पठण – प्रथम क्र. – वैभवी पालव (जय हिंद कॉलेज), द्वितीय क्र. – नाझिया शेख (केबीपी महाविद्यालय), तृतीय क्र. – तेजस्विनी गवळी (प्रगती महाविद्यालय) ५. PPT सादरीकरण – प्रथम क्र. – नम्रता पवार (प्रगती महाविद्यालय), द्वितीय क्र. – शिवम तिवारी (के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय), तृतीय क्र. – प्रवेश कुमार (ज्ञानसाधना महाविद्यालय), उत्तेजनार्थ – निशांत यादव (KBP महाविद्यालय), वैभवी पालव (जय हिंद कॉलेज)…