Category: ठाणे

Thane news

रिपब्लिकन बहुजन सेनेचा शिवसेने(उबाठा)ला जाहीर पाठिंबा – विजय घाटे

रिपब्लिकन बहुजन सेनेचा शिवसेने(उबाठा)ला जाहीर पाठिंबा – विजय घाटे अनिल ठाणेकर ठाणे : ठाणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरांतील हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी रिपब्लिकन बहुजन सेनेने आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे आता ठाण्यात शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांना टक्कर देणार आहे. पाठबळ मिळाल्याने ठाणे महानगरपालिका निवडणुकीत निश्चित यश मिळेल असा विश्वास ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी व्यक्त केला. तर या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी ठाम उभे आहोत, उमेदवारांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन रिपब्लिकन बहुजन सेनेचे अध्यक्ष विजय घाटे यांनी दिले. महाराष्ट्रातील २२ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये आंबेडकरी चळवळीतील बहुजन समाजाला एकत्र घेऊन अविरतपणे कार्यरत असलेल्या रिपब्लिकन बहुजन सेना पक्षाच्या माध्यमातून दलित-बहुजन समाजासाठी सातत्याने समाजकार्य केले जात आहे. आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेला मदत करण्याचा निर्धार रिपब्लिकन बहुजन सेनेने केला आहे. त्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन बहुजन सेना ताकदीने मैदानात उतरली आहे. ही निवडणूक केवळ सत्तेची नसून बहुजन समाजाच्या स्वाभिमानाची व विकासाची लढाई असल्याचे विजय घाटे यांनी आज स्पष्ट केले. त्यांनी केलेल्या विनंतीनुसार दिव्यातील प्रभाग क्रमांक २८ अ च्या त्यांच्या उमेदवारास पाठिंबा देण्याची विनंती केली परंतु त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी दिली असल्याने मदत करू शकत नाही परंतु ही लढत मैत्रीपूर्वक करण्यात येईल असे ठरले असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पत्रही देण्यात आले.

काँग्रेसचा ठाणे महापालिका निवडणुकीसाठी १५ कलमी जाहिरनामा

काँग्रेसचा ठाणे महापालिका निवडणुकीसाठी १५ कलमी जाहिरनामा महायुतीतील तिन्ही पक्षांकडे मोठ्या प्रमाणावर पैसा – हर्षवर्धन सपकाळ अनिल ठाणेकर ठाणे, ठाण्यातुन क्लस्टर हद्दपार करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरांची निर्मिती करण्याचा संकल्प काँग्रेस (आय) ने केला आहे. ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुक – २०२६ साठी ठाणे शहर काँग्रेसने आपला १५ कलमी जाहिरनामा शनिवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते प्रकाशित केला. या जाहिरनाम्या द्वारे काँग्रेसचे एक प्रकारे सर्वसामान्य ठाणेकरांना साद घातली आहे. यावेळी बोलताना सपकाळ यांनी, सत्ताधारी पक्षांवर चौफेर टीका करीत महायुतीच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे वाभाडे काढले.ठाणे व उर्वरित महाराष्ट्रात सद्यस्थितीत जनतेला भेडसावणाऱ्या मुद्द्यांवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सडेतोड भाष्य केले. महायुतीतील तिन्ही पक्षांकडे मोठ्या प्रमाणावर पैसा असुन हा पैसा चार मार्गाने उकळला जात आहे. यात समृद्धी महामार्ग सारख्या शासकीय योजनांच्या भ्रष्टाचारातून पैसा, बदल्यांमध्ये पैसे उकळणारे देवाभाऊ, भूमाफियांमार्फत शासकीय जमिनी विकून पैसे कमावले, एकनाथ शिंदे भावाच्या माध्यमातून अंमलीपदार्थ सारख्या अवैध धंद्यातुन पैसा कमवित असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. ठाणे महापालिका निवडणुक- २०२६ च्या निमित्ताने प्रकाशित केलेल्या जाहिरनाम्यात काँग्रेसने १५ कलमी उपक्रमांची घोषणा केली आहे. यात खड्डे विरहीत रस्त्यांची सुरक्षित सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, दिवाबत्ती, नियोजनपूर्वक पाठीपुरवठा करताना पाण्याच्या बचती बरोबरच वॉटर ऑडीट करणे, सार्वजनिक स्वच्छता, नुक्कड दवाखान्यांच्या माध्यमातुन आरोग्य सेवा, पर्यावरण संवर्धन, ज्येष्ठ नागरिक व महिलावर्गाची सुरक्षा, स्मशानभूमी – दफनभूमीत मोफत अंत्यसंस्कार, खेळासाठी मैदाने व खेळाडूंना प्राधान्य, कला – साहित्य – वाचन संस्कृतीची जपणुक तसेच, व्यवसाय आणि स्थानिक भुमिपुत्रांकरीता रोजगार उपलब्धतेला प्रोत्साहन देण्याच्या योजनांचा समावेश केला आहे.विशेष म्हणजे, ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामे रोखुन आरक्षित भुखंड अतिक्रमण मुक्त करण्याचा निर्धार काँग्रेसने जाहिरनाम्यात व्यक्त केला आहे.तसेच, ठाण्यातुन क्लस्टर हद्दपार करून आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी घरांची निर्मिती करणार असल्याचे म्हटले आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कॉंग्रेसच्या सर्व अधिकृत उमेदवारां समवेत संवाद साधत अत्यंत कठीण, आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीत निवडणूक लढविणाऱ्या या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले. याप्रसंगी व्यासपिठावर ठाण्याचे प्रभारी तसेच प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बर्गे, शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे, राजेश जाधव, प्रदीप राव, महेंद्र म्हात्रे, स्मिता वैती, रवींद्र कोळी आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. चौकट काँग्रेसचे खेड्याकडे चला ठाणे महापालिका निवडणूकीच्या जाहिरनाम्यात काँग्रेसने खेड्याकडे चला… हा महात्मा गांधींचा मार्ग अवलंबला आहे. ग्रामीण धर्तीवर विहिरींचे पुर्नभरण आणि पुर्नजिवीत करून पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा मानस व्यक्त केला आहे. पालिका शाळांमध्ये सुतारकाम, गवंडीकाम अशा बारा बलुतेदारी कार्याच्या प्रशिक्षणासोबत शाळेत चरखा प्रशिक्षणाचा अंतर्भाव करण्याचे जाहिर केले आहे. तसेच बचत गटांच्या माध्यमातुनही ज्येष्ठांना चरखा चालविण्यास शिकवले जाणार आहे. प्राचीन मुलभुत आयुर्वेदाचेही शिक्षण पालिका शाळेतुन दिले जाणार असल्याचे काँग्रेसने नमुद केले आहे.

 प्लॅस्टिक व चिनी मांजाविरोधात ठाणे महापालिकेची कडक कारवाई

प्लॅस्टिक व चिनी मांजाविरोधात ठाणे महापालिकेची कडक कारवाई ६ दिवसांत ५३ हजार रुपयांचा दंड ठाणे: पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा चिनी मांजा, चिनी दोरा तसेच नायलॉन व प्लास्टिकपासून (सिंथेटिक) तयार करण्यात…

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया; २०२६–२७ साठी पहिला टप्पा सुरू

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया; २०२६–२७ साठी पहिला टप्पा सुरू अनिल ठाणेकर ठाणे: शिक्षण हक्क कायदा (Right to Education – RTE) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित…

 मतदानाची शपथ घेत मतदार जनजागृती सायकल रॅली संपन्न                                                     

मतदानाची शपथ घेत मतदार जनजागृती सायकल रॅली संपन्न रॅलीला सायकल प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शहरात मतदार जनजागृतीसाठी व्यापक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा…

ठामपा निवडणुकीत ३२ प्रभागांमध्ये चार तर एका प्रभागात तीन उमेदवारांना मतदान केल्यावरच प्रक्रिया पूर्ण – सौरभ राव

ठामपा निवडणुकीत ३२ प्रभागांमध्ये चार तर एका प्रभागात तीन उमेदवारांना मतदान केल्यावरच प्रक्रिया पूर्ण – सौरभ राव अनिल ठाणेकर ठाणे- ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६साठी ठाणे महापालिका क्षेत्रातील एकूण ३३ प्रभागांमध्ये विभाजन…

कवी नारायण सुर्वेच्या कवितेवर आधारित रिल स्पर्धा

कवी नारायण सुर्वेच्या कवितेवर आधारित रिल स्पर्धा कल्याण:  पु.ल. कट्टा कल्याण ही साहित्य, सांस्कृतिक, कला क्षेत्रात काम करणारी संस्था असून सदर संस्थेच्या वतीने विविध साहित्यिक सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत असतात.…

 दोन हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त, ४४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

किन्हवलीत पोलीसांची यशस्वी कारवाई दोन हातभट्टी दारूचे अड्डे उद्ध्वस्त, ४४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत अविनाश उबाळे ठाणे : शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाणे अंतर्गत असणाऱ्या खरपत गाव हद्दीतील शाही नदी किनारी…

रोजगारासाठी आलात, रोजगार करा, राजकारण करून आमच्या डोक्यावर बसू नका – गोवर्धन देशमुख

रोजगारासाठी आलात, रोजगार करा, राजकारण करून आमच्या डोक्यावर बसू नका – गोवर्धन देशमुख अरविंद जोशी मिरा – भाईंदर: मराठी एकीकरण समितीने आज आपला निवडणुकीसाठीचा वचननामा प्रसिद्ध केला. काही दिवसांवर आलेल्या…

मुरबाड तालुक्यातील तंटामुक्त गाव कमिट्या बाद

मुरबाड तालुक्यातील तंटामुक्त गाव कमिट्या बाद अवैध धंद्यांना गुन्हेगारी घालते साद. राजीव चंदने मुरबाड: गावातील वाद गावातच मिटला जावा आणि गाव शांततेकडुन समृद्धीकडे कसा जाईल यासाठी शासनाने तंटामुक्त गाव मोहीम…