Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

श्रीगणेशदर्शन स्पर्धा व दुर्गबांधणी स्पर्धेचे २६ फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरण

  नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धा २०२५–२६’ तसेच दिपावली उत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाने जाहिर केलेल्या ‘दुर्गोत्सव’ उपक्रमांतर्गत आयोजित ‘दुर्गबांधणी स्पर्धा’ यांचा पारितोषिक वितरण समारंभ…

निशांत मार्कंडेय दिल्लीमध्ये सन्मानित

निशांत मार्कंडेय दिल्लीमध्ये सन्मानित कल्याण : निशांत मार्कंडेय यांना दिल्ली येथे हनी बी नेटवर्क आणि सृष्टि यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात गांधी अन यंग टेक्नोलॉजिकल इनोव्हेशन (जीवायटीआय) प्रशंसा पुरस्कार प्रदान…

शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊ नये – सुधीर घागस

शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्याच्या विरोधात शिक्षण क्रांती संघटनेचे आक्रमक पाऊल कल्याण : महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्याच्या सरकारी निर्णयाविरोधात तीव्र आवाज उठवण्यात आला आहे. संघटनेचे…

  केडीएमसी नगररचना विभागातील बांधकाम फाईलच गायब

केडीएमसी नगररचना विभागातील बांधकाम फाईलच गायब केडीएमसीची पोलीस ठाण्यात तक्रार; फोरेन्सिक टीम केडीएमसीमध्ये दाखल कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगररचना विभागातून वादग्रस्त युसुफ हाईट्स इमारतीची संपूर्ण फाईलच गहाळ झाल्याने मोठी…

कल्याण पूर्वेत बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

कल्याण पूर्वेत बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. ही तरुणी ‘बारावी कॉमर्स’मध्ये शिक्षण घेत होती.…

जिल्हास्तरीय मास्टर्स कप क्रिकेट स्पर्धा संपन्न

जिल्हास्तरीय मास्टर्स कप क्रिकेट स्पर्धा संपन्न कल्याण: पोलीस हवालदार स्वर्गीय यशवंतराव ओंबासे यांच्या स्मरणार्थ आयोजित मास्टर्स कप चॅम्प्स टी-२० स्मृती चषक राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत पनवेलच्या करण क्रिकेट अकॅडमी या संघाने…

‘हिंद दि चादर’चा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे आवश्यक

‘हिंद दि चादर’चा संदेश विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणे आवश्यक जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांचे प्रतिपादन अशोक गायकवाड पालघर : वाडा तालुक्यातील अंबिस्ते येथील शासकीय आश्रमशाळेत आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ.…

राज्य अजिंक्यपद पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुष्मिता देशमुख, तन्विर कोतवाल ठरले “सर्वोत्तम लिफ्टर”

राज्य अजिंक्यपद पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सुष्मिता देशमुख, तन्विर कोतवाल ठरले “सर्वोत्तम लिफ्टर” मुंबई : महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व नागरिक सहाय्य केंद्र, वडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयात आयोजित…

 कुंभारखाण पाडा स्मशानभूमीतील समस्या युद्धपातळीवर सोडवा अन्यथा आंदोलन छेडणार

कुंभारखाण पाडा स्मशानभूमीतील समस्या युद्धपातळीवर सोडवा अन्यथा आंदोलन छेडणार भाजप पदाधिकाऱ्यांचा सहाय्यक आयुक्तांना इशारा कल्याण :  डोंबिवली पूर्वकडील शिवमंदिर येथील स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आवाहनानुसार डोंबिवली पश्चिम येथील कुंभारखाणपाडा येथील स्मशानभूमीत पार्थिवावरती अंत्यसंस्कार करावेत असे सांगण्यात आले. मात्र या स्मशानभूमीवर अंतविधीसाठी लागण्याऱ्या सुविधांचा अभाव असून सदर ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात नाही आहे. कुंभारखाणपाडा मोक्षधाम स्मशानभूमीत अनागोंदी कारभाराबाबत मंगळवारी प्रभागक्षेत कार्यालयात माजी नगरसेवक प्रकाश भोईर, संदीप म्हात्रे, प्रशांत पाटेकर, मनोज वैद्य, विशाल पारखे, जयप्रकाश सावंत,पवन मोरे आणि इतर भाजप पदाधिकारी प्रभागक्षेत्र अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना रीतसर पत्र दिले. कुंभारखाणपाडा मोक्षधाम स्मशानभूमीत २४ तास कर्मचारी आणि  सुरक्षा रक्षक नियुक्त करून अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांना मूलभूत सोयीसुविधा द्यायलाच पाहिजेत अशी मागणी भाजप पदाधिकारी यांनी पालिकेकडे दिली आहे. जर याकडे पालिकेने लक्ष दिले नाहीतर आंदोलन केले जाईल इशारा देण्यात आला आहे. या स्मशानभूमीत २४ तास उपलब्ध राहतील असे कर्मचारी नाहीत. अलीकडेच येथे दोन पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आणले असता स्मशानभूमीला कुलूप होते. ज्यामुळे एका कुटुंबाला दुसऱ्या स्मशानभूमीत जावे लागले. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी दिली आहे. स्मशानभूमीत पूर्णवेळ सुरक्षा रक्षक नसल्यामुळे स्मशानभूमीच्या मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती आहे, तसेच रात्रीच्या वेळी येथे असुरक्षित वातावरण असते. स्मशानभूमीत पाण्याची तीव्र टंचाई आहे. स्वच्छतागृहे अत्यंत अस्वच्छ असून त्यांची नियमित सफाई केली जात नाही, असे भोईर यांनी सांगितले..

 एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा – प्रताप सरनाईक

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा – प्रताप सरनाईक २१० कोटी रुपयांपैकी १०० कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध ! अनिल ठाणेकर ठाणे : राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर अखेर समाधानाची झळाळी उमटली आहे. वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होताच, दिलेला शब्द पाळणाऱ्या परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वासाची मोहर उमटली. मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने चर्चा करत २१० कोटी रुपयांची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आणि त्यापैकी १०० कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध झाला. एसटी महामंडळाकडे निधीअभावी थकीत वेतन देणे कठीण झाले असताना शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली. परिणामी, फेब्रुवारी महिन्याच्या  थकीत वेतन वाढीचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला. हा केवळ आर्थिक दिलासा नसून, तो शासनाच्या संवेदनशीलतेचा आणि बांधिलकीचा प्रत्यय आहे. असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने कामगार संघटनांच्या बैठकीत दरमहा सुमारे ६५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार डिसेंबरपासून थकीत हप्त्यांची प्रक्रिया सुरू झाली. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारीत निधीअभावी हप्ता देणे अशक्य झाले आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची लाट उसळली.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने चर्चा करत २१० कोटी रुपयांची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आणि त्यापैकी १०० कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध झाला. उर्वरित रक्कमही लवकरच प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.२४ फेब्रुवारी रोजी सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतनवाढीचा हप्ता जमा होताच, नाराजीचे ढग दूर झाले आणि विश्वासाचा सूर्य पुन्हा तेजाने उगवला. “दिलेला शब्द पाळला,” अशी भावना व्यक्त करत कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांचे मनापासून आभार मानले.