Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

मानवतेच्या पवित्र आध्यात्मिक नवीन युगाचा उत्सव

रमेश औताडे मुंबई: अत्यंत भक्ती, आध्यात्मिक आनंद आणि शांत आदराच्या वातावरणात, मुंबईतील बहाई समुदाय २३ मेला सायंकाळी बहाई केंद्रात बाब यांच्या घोषणेचा पवित्र उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमला होता. हा तो क्षण होता ज्याने मानवतेच्या आध्यात्मिक इतिहासात एका नवीन युगाच्या पहाटेची घोषणा केली. या कार्यक्रमात १८४४ सालच्या त्या ऐतिहासिक रात्रीचे स्मरण करण्यात आले, जेव्हा इराणमधील शिराझ येथील एक तरुण व्यापारी असलेल्या बाब यांनी आपले दिव्य कार्य घोषित केले आणि जगातील धर्मांच्या पवित्र ग्रंथांमध्ये सांगितलेले प्रतिज्ञात पुरुष, बहाउल्लाह यांच्या लवकरच होणाऱ्या आगमनाची घोषणा केली. तीव्र छळ, तुरुंगवास आणि अखेरच्या हौतात्म्यानंतरही, त्यांच्या शिकवणींनी मानवतेला बहाई धर्माचे संस्थापक बहाउल्लाह यांच्या आगमनासाठी तयार केले, ज्यांच्या दूरदृष्टीने मानवजातीच्या एकतेची आणि सार्वत्रिक शांततेच्या स्थापनेची मागणी केली. स्त्री-पुरुषांची समानता, विज्ञान आणि धर्माचा सुसंवाद, पूर्वग्रहांचे निर्मूलन, सार्वत्रिक शिक्षण, न्याय आणि सर्व लोक व राष्ट्रांची मूलभूत एकता. सहभागींनी आशा व्यक्त केली की हे आदर्श आजच्या समाजात अधिक सामंजस्य, करुणा आणि सामूहिक कृतीसाठी प्रेरणा देऊ शकतील. जगभरातील बहाईंसाठी, बाब यांची घोषणा ही बहाई दिनदर्शिकेतील नऊ पवित्र दिवसांपैकी एक आहे आणि मानवजातीच्या आध्यात्मिक व सामाजिक उन्नतीसाठी समर्पित असलेल्या जागतिक चळवळीची सुरुवात म्हणून याला गहन आध्यात्मिक महत्त्व आहे. मुंबई बहाई समुदाय बहाई केंद्र मुंबई यांच्या वतीने सांगण्यात आले.

स्थानिकांना नोकरी, कर्जबुडव्यांची मालमत्ता जप्ती

अर्थनगरीमध्ये सरत्या आठवड्यात इंधन दरवाढीपलिकडेही काही लक्षवेधी बातम्या चर्चेत राहिल्या. पहिली बातमी म्हणजे जिल्हा बँकांमधील नोकरभरतीत यापुढील काळात स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दुसरी बातमी म्हणजे कर्ज न फेडल्यास यापुढे…

खाद्यतेलाची आयात वाढली

‌‘सॉल्व्हन्ट एक्सट्रॅकर्स असोसिएशन ऑफ इंडिया‌’ (एसईए)च्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताची खाद्यतेल आयात तीन टक्क्यांनी वाढून 166.51 लाख टनांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, या वाढीमागे नेपाळकडून होणाऱ्या शुल्कमुक्त आयातीत…

खत अनुदानावर सत्तर हजार कोटी जादा खर्च

पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे भारताच्या खत अनुदानावर मोठा आर्थिक ताण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये देशाच्या खत सबसिडी बिलामध्ये मोठी वाढ होऊ शकते, अशी…

खत अनुदानावर सत्तर हजार कोटी जादा खर्च

पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे भारताच्या खत अनुदानावर मोठा आर्थिक ताण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये देशाच्या खत सबसिडी बिलामध्ये मोठी वाढ होऊ शकते, अशी…

कल्याणमध्ये कर्णिक रोड समितीच्या वतीने हिंदू संमेलन संपन्न

जगण्यातील मूल्य नवीन पिढीमध्येही हे रुजवण्याचा प्रयत्न करा – धर्मगुरू कृष्ण गौर दास कल्याण : हिंदू सकल समाज, कर्णिक रोड समितीच्या वतीने  भव्य ‘हिंदू संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले होते. धर्मगुरू कृष्ण गौर दास यांनी ‘हिंदुत्व व सद्यपरिस्थिती’ या विषयावर भाष्य करताना आपल्या संस्कृतीची जोपासना करताना आपण कोणत्याही प्रांतातले असू पण प्रथम आपण हिंदू आहोत हे विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या आदर्श राजानेही राम आणि कृष्णाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता. त्यामुळे जगण्यातील मूल्य, शरीराची अंतर्बाह्य जोपासना ही आपल्या ग्रंथानीच होते हे विसरू नका आणि नवीन पिढीमध्येही हे रुजवण्याचा प्रयत्न करा असे त्यांनी आपल्या विवेचनात संगितले. डॉ. रुपाली जोशी ‘महिला सशक्तिकरण’  या विषयावर मार्गदर्शन करताना “आजच्या काळात स्त्री एकटी का पडते आणि तिला बाहेर आधार का शोधावा लागतो?” याचे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे सांगितले.  अनिल भालेराव यांनी  संघ शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संघाच्या प्रवासावर आणि भविष्यातील ध्येयांवर प्रकाश टाकला. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, आत्मबोध, पर्यावरण संरक्षण अशा विविध विषयांवर भाष्य करत त्यांनी प्लास्टिकचा वापर कसा कमी करता येईल यावर मार्गदर्शन केले. केवळ व्याख्यानेच नव्हे, तर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध कलाप्रकार या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. कार्यक्रमाच्या सुरवातीला गोमाता, भारतमाता यांचे पूजन करून शंखनाद करण्यात आला. नवीन पिढीतील बाल आणि युवा कलाकारांनी नांदी, पोवाडा, शौर्य गीत, बासरी आणि तबला वादन तसेच गणेश वंदना (नृत्य) सादरीकरण केले. योगाभ्यासावरील प्रात्यक्षिक हिमगौरी प्रमोद शेट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केले. समाजात ऐक्य निर्माण करणे आणि सद्यस्थितीत हिंदू संस्कृतीचे रक्षण करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी  हिंदू सकल समाज, कर्णिक रोड समितीच्या अध्यक्ष डॉ आशिष एकलहरे, उपाध्यक्ष नितीन अहिरराव, रवींद्र वाणी, सचिव प्रमोद शेट्टी, उपसचिव महेश दीक्षित, उपसचिव जयश्री कोलते, कोषध्यक्ष सीए मनोहर नेवे व सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. ००००००००००००००

पहिल्या नवी मुंबई ग्लोबल समिटची शानदार सांगता

यू बिझनेस मिट ने केले होते आयोजन नवी मुंबई : नवीन मुंबई मधील यू बिझनेस मीट यांच्या वतीने आयोजित नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील उद्योजकांनी उपस्थित रहात या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारत आणि थायलंड यांच्या दरम्यान व्यापार उद्योजकता वृद्धिंगत व्हावी या हेतूने या बिझनेस समिटचे आयोजन करण्यात आले होते. भारत आणि थायलंड या दोन देशातील व्यवसाय निष्णात प्रभुतींच्या चर्चांमधून अनेक नवनवीन उद्योजक आणि व्यापार संधी उदयास येण्याचे यामुळे चिन्ह निर्माण झाली आहेत. विविध व्यवसाय आस्थापनांना व्यवसाय सुलभता प्रदान करण्याच्या हेतून यू बिझनेस मिट ही संस्था काम करत असते. फाउंडर वैभव सोनटक्के आणि को फाउंडर रवींद्र प्रताप गुप्ता,मंदार दोंदे, विवेक पाटील, समृद्धी वाणी यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई ग्लोबल समिट चे आयोजन करण्यात आले होते. भारत आणि थायलंड यांच्यामध्ये द्विदेशीय व्यवसाय सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, फार्मसीटीकल्स, लाइफस्टाइल अँड हेल्थकेअर, बँकिंग, इन्शुरन्स, इंटरनॅशनल मीडिया, रिअल इस्टेट,हॉटेल अँड हॉस्पिटॅलिटी, टुरिझम अशा क्षेत्रातील तज्ञ मंडळींच्या पॅनल डिस्कशनचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध पत्रकार महेश म्हात्रे आणि टाइम्स ऑफ इंडियाचे असिस्टंट एडिटर चित्तरंजन टेंभेकर, सिटी बेल समूह संपादक मंदार दोंदे यांनी मॉडरेटर म्हणून या पॅनल डिस्कशन मध्ये उत्तमरित्या सुसंवाद घडवून आणला. यू बिझनेस मिट यांच्या वतीने व्हर्च्युअल स्टुडिओ, मीटिंग रूम आणि एम ओ यू साईन करण्याकरता लीगल टीम देखील तैनात केली होती. अनेक उद्योजकांना या सुविधांचा लाभ झाला. बेलापूर येथील दि पार्क या तारांकित हॉटेलमध्ये सोमवार दिनांक १८ मे रोजी हे समिट संपन्न झाले. आमदार प्रशांत ठाकूर, निलेश म्हात्रे यांनी आवर्जून उपस्थित रहात नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. थायलंड येथून PEITA सदस्य तथा माजी राजदूत थाराडोल थाँगग्रंग आणि पिटा सदस्य नरेन पियासच्चादेश हे उपस्थित होते तर इंजीनियरिंग इन्स्टिट्यूट ऑफ थायलंडचे संचालक तथा PEITA चे सल्लागार प्रो. डॉ. चियांचुंग ओदि कलायांनामित्र, थायलंड पंतप्रधान कार्यालयातील फॉरेन अफेयर्स सचिव प्रसर्त पियासाचादेश, वर्ल्ड पीस फाउंडेशनच्या संस्थापिका पी.ओरावान हे ऑनलाइन माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधत होते. एक्सपोर्ट इम्पोर्ट क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव असणारे ओमकार हरी माळी यांची चित्तरंजन टेंभेकर यांनी घेतलेली मुलाखत या समिटचे विशेष आकर्षण ठरली. तळोजा इंडस्ट्रियल इस्टेट चे अध्यक्ष सतीश शेट्टी यांची रवींद्र प्रताप गुप्ता यांनी घेतलेली मुलाखत देखील लक्षवेधी ठरली. ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स चे संस्थापक डॉक्टर संजय भिडे, ह्यूमन केअर वर्ल्ड वाईड चे डी एस चक्रवर्ती, गोमाता विजन चे विकास कोळी, यू के एस रिसॉर्ट चे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर संतोष पाटील, तेरणा हॉस्पिटलचे हेल्थकेअर ग्रोथ स्ट्रॅटेजिस्ट डॉक्टर मनीष राय, निवृत्त महासंचालक यशवंत ठाकरे, विभव इंटरनॅशनल कल्चरल अँड एज्युकेशनल फोरम चे दिलीप ठाणेकर,टेलेक्स चे जितेश पाटील आणि जयेश पाटील, प्लास्टिक सर्जन तथा कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ शंकर सावंत यांनी ग्लोबल समिट आयोजनामध्ये सक्रिय सहभाग घेतला. यु बिझनेस मीट चे फाउंडर आणि एन्जॉय को वर्किंग स्पेस, वेब प्रिंट सोल्युशन्स या संस्थांचे संचालक असणारे वैभव सोनटक्के यांनी या समिटच्या आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले. तर या ग्लोबल बिझनेस समिट चे आयोजनात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वय साधत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या समृद्धी वाणी यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. ००००००००००००

व्ही.पी.एम.आर.झेड शाह महाविद्यालयात वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न

कल्याण:  विद्या प्रसारक मंडळाचे आर झेड शाह महाविद्यालात मोठ्या दिमाखात वार्षिक दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांची उपस्थिती प्रेरणादायी ठरली. तसेच मुबई विद्यापीठाचे डी.एल.एल.इ…

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांची ठाणे महापालिकेस भेट

ठाणे महापालिका सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबवित असलेल्या योजनांचे अनुकरण इतर महापालिकांनी करावे – मुकेश सारवान ठाणे (२०) : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी ठाणे महापालिकेस भेट देवून महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला. दरम्यान सफाई कर्मचारी हा सर्वात महत्वाचा घटक असून सफाई कर्मचाऱ्यांसाठी ठाणे महानगरपालिका राबवित असलेल्या योजना या अभिमानास्पद असून इतर महापालिकांनी देखील याचे अनुकरण केले तर सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न राहणारच नाहीत असे वक्तव्य त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात त्यांनी पालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी.गोदेपुरे, उपाआयुक्त जितेंद्र निकम, डॉ. मिताली संचेती, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, आरोग्य अधिकारी डॉ राणी शिंदे, आस्थापना अधीक्षक दयानंद गुंडप आदी अधिकाऱ्यांसह सफाई कामगारांच्या युनियनचे पदाधिकारी, कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या वतीने १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १ मे या दिवशी १० कर्मचाऱ्यांचा गुणवंत सफाई कर्मचारी म्हणून सन्मान, सफाई कामगारांसाठी घरे, त्यांच्या वारसांना शैक्षणिक अर्हतेनुसार पदावर सामावून घेणे, आरोग्य विषयक सुविधा, पदोन्नती, आतापर्यत वारसाहक्काने दिलेल्या नियुक्त्या यांची सविस्तर माहिती उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांनी आयोगासमोर मांडली. सफाई कर्मचारी हा महत्वाचा घटक असून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. तसेच महापालिका देखील सफाई कर्मचाऱ्यांना असलेल्या समस्या तातडीने मार्गी लावत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीत ज्या सफाई कर्मचाऱ्यांनी निवेदने सादर केली त्या निवेदनांवर १५ दिवसात अहवाल आयोगासमोर सादर करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनास दिले. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सफाई कर्मचात्यांसाठी उत्कृष्ट सफाई कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे, मासिक वेतन वेळेवर अदा करणे, सफाई कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरचे फायदे हे सेवानिवृत्ती दिवशीच दिले जातात. सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य साधन दिली जातात, कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाते तसेच महिला कर्मचाऱ्यांची मॅमोग्राफी तपासणी  केली जाते या  सुविधांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई  कर्मचारी  आयोगाच्या उपाध्यक्षांनी  समाधान व्यक्त केले.

माथेरानचे स्वच्छतादूत राकेश कोकळे यांचा गोव्यात सत्कार

मुकुंद रांजणे (माथेरान) माथेरानच्या निसर्गावर निस्सीम प्रेम असणारे भूमिपुत्र राकेश कोकळे यांनी मागील काही वर्षांपासून येथील प्लास्टिक कचरा गोळा करून तो नगरपालिका मध्ये जमा करत असतात. पर्यावरण प्रेमी अवलिया अशीच ओळख निर्माण करून आजपर्यंत गावातील बहुतेक ठिकाणी आपल्या मित्र परिवार सोबत जाऊन वेळप्रसंगी कड्याकपारीत स्वतः उतरून प्लास्टिक बाटल्या, रपेर्स, तसेच अन्य प्लास्टिक जन्य कचरा नियमितपणे गोण्यांमध्ये संकलन करून नगरपालिका सफाई कामगार यांच्या मार्फत योग्य स्थळी हलविण्यात येत आहे. त्यांच्या या निस्सीम कार्याची दखल घेऊन गोवा येथील लायन्स इंटरनॅशनल यांच्या वतीने माथेरानचे स्वच्छतादूत तथा धनगर समाजाचे अध्यक्ष  राकेश विलास कोकळे यांचा १९ रोजी गोवा राज्यात स्वच्छतेच्या कार्याबद्दल विशेष सत्कार पद्मश्री पुरस्कार विजेते तसेच एक्स BARC शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉ. शरद काळे तसेच लायन्स क्लबचे  मुर्तुजा ताहेर माथेरानवाला यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. राकेश कोकळे हा एक ध्येयवेडा असून त्याचा स्वच्छता बाबतीत खूपच कटाक्ष आहे. प्रत्येक पॉईंट्स वर जाऊन तेथील जंगल भागातील परिसराची पाहणी करून जेवढ्या प्रमाणात प्लास्टिक जन्य कचरा असेल तो गोळा करण्यासाठी आपल्या मित्र परिवार सोबत नेहमीच तत्पर असतो त्याच्या या निस्वार्थ कृतीचा सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. ००००००००००