अपना, रत्नागिरी, महानगर बँक उपांत्य फेरीत
को-ऑपरेटिव्ह बँक युनियन क्रिकेट स्पर्धा अपना, रत्नागिरी, महानगर बँक उपांत्य फेरीत मुंबई: माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखालील को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, मुंबई आयोजित आंतर को-ऑपरेटिव्ह बँक राज्य…
पश्चिम रेल्वे, बृहन्मुंबई महानगरपालिका व बँक ऑफ इंडियाची विजयी घोडदौड!
कै. उमेश शेणॉय स्मृती चषक स्पर्धा पश्चिम रेल्वे, बृहन्मुंबई महानगरपालिका व बँक ऑफ इंडियाची विजयी घोडदौड! अजितदादा पवार क्रीडा नगरीत ‘डायनॅमिक’ खो-खोचा धडाका मुंबई: मुंबईतील खो-खो प्रेमींसाठी सध्या दादरमधील कै.…
राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत ‘एमआयटी एडीटी’च्या भाग्यश्री घुलेची सुवर्ण कमाई
राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत ‘एमआयटी एडीटी’च्या भाग्यश्री घुलेची सुवर्ण कमाई आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या राष्ट्रीय सराव शिबिरासाठी निवड पुणे : आर्मी रोइंग नोड येथे नुकत्याच झालेल्या ४३व्या वरिष्ठ राष्ट्रीय रोईंग अजिंक्यपद स्पर्धेत…
ॲड. रमाकांत ओवळेकर चषक श्री माँ विद्यालयाने पटकावला
ॲड. रमाकांत ओवळेकर चषक श्री माँ विद्यालयाने पटकावला ठाणे: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने युनायटेड क्रिकेटर्स व सूर सुदान शौर्या स्वर संस्था आयोजित १४ वर्षाखालील मुलांसाठी ठाणे जिल्हा आंतरशालेय क्रिकेट सामना…
एसएसटी महाविद्यालयात ‘पेरेंटाईन डे’चा भावनिक सोहळा
एसएसटी महाविद्यालयात ‘पेरेंटाईन डे’चा भावनिक सोहळा भारतीय संस्कृतीचा सन्मान आणि पालकांप्रती कृतज्ञतेची अभिव्यक्ती कल्याण : भारतीय संस्कृतीतील मातृ-पितृ पूजेची परंपरा जपत एस.एस.टी. कला व वाणिज्य महाविद्यालयात ‘पेरेंटाईन डे’ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मनावर भारतीय संस्कृतीची मूल्ये रुजवण्यासाठी विविध अभिनव उपक्रम राबविणाऱ्या महाविद्यालयाने गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा यंदाही कायम ठेवत पालकांविषयी आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची अनोखी अभिव्यक्ती घडवून आणली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांची मनोभावे पूजा-अर्चा करून आरती केली, साष्टांग दंडवत घालत आशीर्वाद घेतला. आपल्या मनातील प्रेम आणि कृतज्ञतेच्या भावना विद्यार्थ्यांनी सर्वांसमक्ष व्यक्त केल्या. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य आणि पथनाट्याद्वारे पालकांप्रती असलेल्या विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यासोबतच विद्यार्थ्यांना पालकांची काळजी घेण्याचे आवाहनही केले. भावनांनी ओतप्रोत भरलेल्या या वातावरणात अनेक पालक साश्रूनयनांनी भारावून गेले. “असा अनोखा सोहळा प्रथमच पाहिला; आपल्या पाल्याने सर्वांसमक्ष व्यक्त केलेले प्रेम आणि आदर मनाला स्पर्शून गेले,” अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेची कौशल्ये विकसित व्हावीत या उद्देशाने महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थीनीने स्वतः बनवलेल्या पौष्टिक लाडूंचा स्टॉल लावण्यात आला. योग्य आहाराचे महत्त्व पटवून देत आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आड प्रमोद ढोकळे, विशेष अतिथी मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सचे वाणिज्य विभाग प्रमुख व एनएसएसचे मुंबई उपनगर जिल्हा समन्वयक डॉ. निखिल कारखानिस, लोकल बंधन मीडिया हाऊसच्या शार्मिन मिरजकर आणि मृणाली ओरसकर,महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य डॉ.पुरस्वानी, आयक्यूएसी समन्वयक डॉ.खुशबू पुरस्वानी, ट्रस्टी डॉ.हिना मुलपानी, तसेच अनेक पालक आणि विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, डीएलएलई, सांस्कृतिक समिती, स्टुडंट्स कौंसिल, सीबीक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक, विद्यार्थी व स्वयंसेवकांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. भारतीय संस्कृतीतील ‘मातृ देवो भव, पितृ देवो भव’ या मूल्यांचा जागर करत एस.एस.टी. महाविद्यालयाने ‘पेरेंटाईन डे’च्या माध्यमातून प्रेम, आदर आणि संस्कारांची सुंदर परंपरा अधिक दृढ केली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी लोकल ट्रेनमध्ये तातडीने अतिरिक्त डबे सुरू करा
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी लोकल ट्रेनमध्ये तातडीने अतिरिक्त डबे सुरू करा वल्ली राजन यांची मागणी कल्याण: १२वीच्या परीक्षेसाठी जात असताना गर्दीच्या लोकल ट्रेनमधून पडून १८ वर्षीय विद्यार्थी सचिन कठरे याचा झालेला दुर्दैवी मृत्यू ही केवळ अपघाती घटना नसून, उपनगरीय रेल्वे व्यवस्थेतील गंभीर दुर्लक्ष आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेप्रती असलेल्या बेफिकिरीचे द्योतक आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया वल्ली राजन, राज्य सचिव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर त्यांनी कल्याण रेल्वे स्टेशन व्यवस्थापकांना निवेदन देऊन परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त लोकल डबे व स्वतंत्र सुरक्षित व्यवस्था तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – विमुक्त भटक्या जमाती सेलचे कल्याण जिल्हाध्यक्ष दिनेश परदेशी तसेच समाजसेवक तोषेश शुक्ला उपस्थित होते. दरवर्षी परीक्षा काळात हजारो विद्यार्थी प्रचंड गर्दीत, जीव मुठीत धरून लोकलने प्रवास करतात. ही परिस्थिती प्रशासनाला ज्ञात असतानाही ठोस उपाययोजना न होणे अत्यंत दुर्दैवी आहे. वरिष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी जशा विशेष सुविधा आहेत, त्याच धर्तीवर किमान १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व सुरक्षित स्वतंत्र डब्बा सुरू करणे अत्यावश्यक आहे. परीक्षा कालावधीत अतिरिक्त लोकल गाड्या किंवा डबे तातडीने सुरू करावेत. १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र, सुरक्षित डबे लागू करावेत. पीक अवर्समध्ये गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करावी या मागण्या रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आल्या असून “मानवी जीवन हे कोणत्याही व्यवस्थेपेक्षा मौल्यवान आहे. आणखी कोणत्याही विद्यार्थ्याचा बळी जाण्याआधी प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावेत, असा इशारा वल्ली राजन यांनी रेल्वेला दिला आहे.
संत सेवालाल महाराजांना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
संत सेवालाल महाराजांना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन ठाणे : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सचिन चौधर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सहायक महसूल अधिकारी सुमेध राऊत व जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.
गेटवे ऑफ इंडिया येथे नृत्येश्वर संस्थेच्या वतीने सादरीकरण
गेटवे ऑफ इंडिया येथे नृत्येश्वर संस्थेच्या वतीने सादरीकरण कल्याण : सीआयएसएफ संरक्षण आणि सुरक्षा मंत्रालय आयोजित व महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात श्रीराम पांडे यांच्या सहकार्याने नृत्येश्वर संस्थेच्या वतीने सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमात ६० कलाकारां सोबत महाराष्ट्राच्या लोकनृत्यांच्या कार्यक्रम सादर करण्यात आला. हा कार्यक्रम मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम शशिन मेस्त्री व सिद्देश मेस्त्री यांनी दिग्दर्शित केला होता. सहाय्यक म्हणून आशिष सोराप, अरविंद, सुधांशु, देवांग यांनी काम पाहिले. तसेच एसवीपी व लीलावती लालजी दयाल कॉलेज यांनी हि सहभाग घेतला.
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरास “रेड लाईट एरिया” घोषित करण्याची मनसेची मागणी
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरास “रेड लाईट एरिया” घोषित करण्याची मनसेची मागणी कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वारांगनांचा वाढता वावर लक्षात घेता कल्याण स्टेशन परिसर रेड लाईट एरिया घोषित करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यत आली आहे. याबाबत मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार आणि शाखा अध्यक्षा सोनल पवार यांनी केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी यांची भेट घेत निवेदन दिले आहे. निवडणूकी दरम्यान पॅनल क्रं ९ मध्ये प्रचारासाठी फिरताना महिलांचे विषेश प्रश्न म्हणजे रेल्वे स्टेशन परिसरात महिलाचा दिवसांदिवस बिकट होणारे प्रश्न त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महापौर हर्षाली थवील चौधरी यांची मनसेच्या वतीने भेट घेण्यात आली. कल्याण डोंबिवली महानगरपालिक क्षेत्रातील महिला रेल्वे स्टेशन परिसरात उभ्या राहण्यास सुरक्षित नाही. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानक परिसरात दिवसाढवळ्या व रात्री महिला वारांगना व्यवसाय करणाऱ्या महिलांनी व्यापलेला असतो. सर्वसाधारण नागरिक महिला येथे उभे राहणे सुद्धा शक्य नसल्याने हा स्टेशन परिसर “रेड लाईट एरिया” घोषित करण्याची मनसेची मागणी आहे जेणे करून सर्वसामान्य महिला येथे उभे राहणार नाहीत. येत्या महिन्याभरात हे दृश्य असेच राहिले तर तेथे रेड लाईट एरियाचे फलक लावावे लागतील असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला. महापौरांनी देखील या विषयाचे गांभीर्य समजून घेत लवकरात लवकर रेल्वे स्टेशन परिसराची पाहणी करून विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
