ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आवाहन

महापालिकेने तयार केलेल्या मॅस्कॉटने दिला मतदानाचा संदेश

ठाणे : येत्या २० मे रोजी आपल्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदानाची टक्केवारी वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण मतदानासाठी एकमेकांना प्रोत्साहन देऊया आणि मतदानाची टक्केवारी वाढवूया, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमो ग्रँड सेंट्रल पार्क येथे नागरिकांना केले.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शनिवारी सकाळी, पर्यटक आणि ठाणेकर यांच्यात सध्या चर्चेत असलेल्या, नमो ग्रँड सेंट्रल पार्कला भेट दिली. कोलशेत येथे सुमारे २० एकरच्या सुविधा भूखंडावर ठाणे महापालिकेसाठी हे पार्क कल्पतरू डेव्हलपर्स यांनी विकसित केले आहे. या पार्कची पाहणी आयुक्त राव यांनी केली.

त्यावेळी, तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांशी आयुक्त राव यांनी संवाद साधला. सोबत, मतदानाचा संदेश देणारा ईव्हीएमच्या रूपातील मॅस्कॉट (शुभंकर) ही होता. मतदान हे नागरिकांचे कर्तव्य आहे त्यामुळे आपण ते पार पाडले पाहिजे. त्यात हयगय नको, असे यावेळी आयुक्त राव यांनी सांगितले.

याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, मनीष जोशी, जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, अनघा कदम, सचिन पवार, सहायक आयुक्त महेश आहेर, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, गुणवंत झांबरे, वृक्ष अधिकारी केदार पाटील कार्यकारी अभियंता मोहन कलाल, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे आदी उपस्थित होते.

नागरिकांनीही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच, आपापल्या गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान जागृती विषयी सुरू असलेल्या उपक्रमांची माहितीही नागरिकांनी दिली.

जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभागी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मिडिया, आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमातंर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅस्कॉटही तयार केलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *