मुंबई : महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन चे वतीने परळ येथे नुकतयाच आयोजित करण्यात आलेलया राज्य सब ज्युनिअर ज्युनिअर क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धत रायगडने  उपविजेतेपद मिळविले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून जवळ जवळ २२५ खेळाडूंनी (मुले व मुली)भाग घेतला होता. रायगडचे सब ज्युनिअर,ज्युनिअर मुला मुलींनी चांगली कामगिरी केली. या स्पर्धेत 06 रौप्य आणि 05 कांस्य पदक एकुण  11 पदके रायगडने पटकावली.

त्याचबरोबर सब ज्युनिअर मुलींच्या गटाचे सांघिक उपविजेतेपद रायगड जिल्ह्याला मिळाले आहे. उपविजेतेपदाचा चषक कार्यकारणी सदस्य संदीप कृष्णा पाटकर” यांनी  स्वीकारला. विजेतेपदाचा मान पुणे जिल्ह्याला मिळाला. रायगडच्या या यशाबाबत पॉवर लिफ्टिंग असोसिएशन रायगड”ने खेळाडुंचे खास अभिनंदन केले आहे. रायगडच्या संघाचे व्यवस्थापक म्हणून यशवंत मोकल, सहाय्यक म्हणून संदीप पाटकर, सुभाष टेंबे आणि विक्रांत गायकवाड यांनी जबाबदारी पार पडली. पदक विजेते खेळाडू..

सब ज्युनिअर मुली–

*१)आर्या भारती. (४३ किलो वजनी गट-रौप्य , आयर्न मेट जिम खोपोली.)*२)गार्गी मसुरकर (५२ किलो वजनी गट-रौप्य  आयर्न मेट जिम खोपोली.) ३) आर्या शिंदे (५७ किलो वजनी गट-रौप्य  जीव्हीआर जिम कर्जत)

ज्युनिअर मुली–

१) दिव्या महाडिक (४३ किलो वजनी गट-

कांस्य, आयर्न मेट जिम खोपोली)

२) अमृता भगत (४७किलो वजनी गट-रौप्य  पॉवर हाऊस क्लब खोपोली)

३) दिव्या शिंदे (७६ किलो वजनी गट-रौप्य , आयर्न मेट जिम खोपोली)

सब ज्युनिअर मुले-

१) विष्णू कल्ला(५९ किलो वजनी गट-कांस्य, संसारे फिटनेस पेण)

२) संस्कार सरदार (६६ किलो वजनी गट-कांस्य, स्पार्टन जिम खालापूर)

ज्युनिअर मुले–

१) विनय पाटील (६६ किलो वजनी गट-कांस्य संसारे फिटनेस पेण)

२) अथर्व लोधी (८३ किलो वजनी गट- रौप्य , संसारे फिटनेस पेण)

३) तन्मय पाटील (९३किलो वजनी गट-पदक, संसारे फिटनेस पेण)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *