अशोक गायकवाड
अलिबाग : बँक ऑफ इंडियाच्या ६६६ दिवसांच्या उच्च परतावा मुदत ठेव योजनेसाठी संपर्क करावा, असे आवाहन विभागीय कार्यालय प्रमुख अलिबाग रायगड मुकेश कुमार यांनी केले आहे.
बँक ऑफ इंडियाने ‘६६६ दिवसांची मुदत ठेव’ लाँच केली जी सुपर ज्येष्ठ नागरिकांना रु. २.०० कोटींपेक्षा कमी ठेवींवर वार्षिक ७.९५% पर्यंत उच्च परतावा देते. ग्राहक आणि सामान्य लोक ‘६६६ दिवसांची मुदत ठेव’ उघडून गुंतवणुकीच्या या अनोख्या संधीचा लाभ घेऊ शकतात. जे मुदत ठेवींवर शंभरहून अधिक परतावा देते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण बँक ऑफ इंडिया मध्ये कोणत्याही शाखेत जाऊन शाखाधिकारी यांच्याशी त्वरित सम्पर्क करावा.किंवा बँक ऑफ इंडिया विभागीय कार्यालयं अलिबाग रायगड येथे ०२१४१- २२३८९५, २२२२६९ सम्पर्क करावा असे आवाहन मुकेश कुमार, विभागीय कार्यालय प्रमुख अलिबाग रायगड यांनी केले आहे.
