मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून विजयी झालेल्या प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी, “वर्षा गायकवाड ही माझी लहान बहिण आहे, तिला लोकसभेत पाठवणार”, हा शब्द दिला होता, तो त्यांनी खरा करून दाखवला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी भाजपा उमेदवारांचा १६ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव करून २००४ च्या विजयाची पुनरावृत्ती केली. याच मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांचे वडील लोकनेते एकनाथराव गायकवाड यांनी विजय संपादन केला होता.

२०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी भाजपा उमेदवाराचा दणदणित पराभव करत विजय खेचून आणला. यावेळी शिवसेना नेते श्री. अनिल परब, माजी मंत्री अस्लम शेख, डॉ. महेश पेडणेकर, संदीप नाईक, वीजू शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *