मिरा-भाईंदर : मीरा भाईंदरमधील प्रकाश भवन या इमारतीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे सचिव अनंत तिवारी (वय ५५) यांच्यावर पापू ऊर्फ अरविंद कदम या गुंडाने हतोड्याने हल्ला केला आहे. तिवारी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

पापू कदमवर याआधीही तीन गुन्हे नोंदवले गेले आहेत, परंतु पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही. मिरा-भाईंदर महानगरपालिकेनेही त्याने केलेल्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सोसायटीतील रहिवासी करीत आहेत.सोसायटीच्या रस्त्यावर आणखिन एक स्टॉल लावण्यावरून हा वाद झाल. अनंत तिवारींनी त्याची बेकायदेशीर परवानगी नाकारल्याने त्याने हा हल्ला केला. त्याने दोन वेळा त्यांच्या डोक्यावर हल्ला केला. हे सर्व पूर्वनियोजित होते. सोसायटीच्या नागरीकांनी या हल्ल्याची गंभीर दखल पोलिसांनी घ्यावी अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *