अभिजित – काजलला प्रथम मानांकन

मुंबई : श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हॉटेल मंगलम नरसोबावाडी कोल्हापूर  येथे सुरु होणाऱ्या ८ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष व महिला गटात अनुक्रमे पुण्याच्या अभिजित त्रिपनकर व मुंबईच्या काजल कुमारीला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेतील पुरुष एकेरी गटात २५६ तर महिला एकेरी गटात ४४ खेळाडूंनी भाग घेतला आहे. शनिवार दिनांक ८ जून २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता पुरुष एकेरी गटाने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्या युट्युब चॅनलवरून या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे.

पुरुष एकेरी : १) अभिजित त्रिपनकर ( पुणे ) २) विकास धारिया ( मुंबई ) ३) झैद फारुकी ( ठाणे ) ४) पंकज पवार ( मुंबई ) ५) प्रशांत मोरे ( मुंबई ) ६) रहिम खान ( पुणे  ७) संदीप दिवे ( मुंबई उपनगर ) ८) सागर वाघमारे ( पुणे)

महिला एकेरी : १) काजल कुमारी ( मुंबई ) २) प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ) ३) अंबिका हरिथ ( मुंबई ) ४) आकांक्षा कदम ( रत्नागिरी ) ५) उर्मिला शेंडगे ( मुंबई ) ६) केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ) ७) अंजली सिरीपुरम ( मुंबई ) ८) प्रीती खेडेकर ( मुंबई)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *