राजेंद्र साळसकर
मुंबई : अनुदानित महाविद्यालय असताना देखील, सर्व सामान्य विद्यार्थी व भूमिपुत्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अनधिकृतपणे अधिकचे शिक्षण शुल्क लुबाडणाऱ्या महाविद्यालयांवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाची धडक….. घाटकोपर येथील सोमया विद्याविहार विद्यापीठाच्या आवारात असलेले मुंबई विद्यापीठ संलग्नित के जे सोमय्या कला व वाणिज्य, एस के सोमया कला, विज्ञान व वाणिज्य, के जे सोमय्या विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्याकडून अनधिकृतपणे वाढीव शिक्षण शुल्क उकळण्यात येत असल्यामुळे आज मनविसेच्या शिष्टमंडळाने तिन्ही महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या दालनात धडक देऊन वाढीव शिक्षक शुल्काबद्दल जाब विचारला.
राज्यशासन व विद्यापीठाच्या कुठल्याच परवानगीशिवाय अतिरिक्त शुल्क घेणे हा भारतीय न्याय संहिता व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत फौजदारी गुन्हा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष सन्माननीय अमित ठाकरे यांच्या आदेशान्वये व महाराष्ट्र राज्य प्रमुख संघटक आयु. संतोष गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनपर वसूल केलेले अधिकचे शिक्षण शुल्क तातडीने रद्द करून विद्यार्थ्यांना परत करावे व महाराष्ट्रातील भूमिपुत्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून मुंबई विद्यापीठाने ठरवून दिलेल्या शिक्षण शुल्क आकारावे असे ठणकावून सांगत निवेदन देण्यात आले.
सदर प्रसंगी घाटकोपर मनविसे विभाग अध्यक्ष रोहन अवघडे, उपविभागाध्यक्ष गोविंद जोईल व स्थानिक महाराष्ट्र सैनिक स्वागत साबळे, योगेश गांगुर्डे, दत्ताराम मालुसरे, आभिराज भवार उपस्थित होते.
00000
