आजकाल ऑनलाईन खरेदीचा जमाना आहे. आपल्यापैकी अनेक जण बरेच सामान ऑनलाइन ऑर्डर करत असतात. बंगळुरूमधील एक जोडप्यानेही ऑनलाइन सामान मागवले. पण डिलिव्हरी झाल्यावर त्यांनी सामानाचा बॉक्स उघडला, तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांची दातखिळीच बसली. बॉक्स उघडताच त्यांच्यासमोर एक कोब्रा फुत्कार टाकताना दिसला. ते पाहून जोडप्याची भीतीने गाळण उडाली.
ॲमेझॉनवरून आलेल्या सामानात साप असल्याचा दावा त्या जोडप्याने केला असून त्याबद्दल त्यांनी ‌‘सोशल मीडिया‌’वर पोस्टही शेअर केली. नशीबाने तो साप त्या बॉक्सच्या चिकटपट्टीला चिकटला होता. त्यामुळे त्यांना इजा झाली नाही. तो मोकळा असता तर कोणाला चावूही शकला असता. या घटनेमुळे ई-कॉमर्स कंपन्यांचे पॅकेजिंक आणि डिलीव्हरी प्रक्रियेवरून नवा वाद सुरू झाला आहे.
त्यांच्या सांगण्यानुसार, दोन दिवसांपूर्वी ॲमेझॉनवरून एक्सबॉक्स कंट्रोलर मागवला होता. परंतु त्यांनी पॅकेट उघडल्यानंतर आतमध्ये जिवंत साप पाहून त्यांना धक्काच बसला. सुदैवाने साप पॅकेजिंग टेपमध्ये अडकला. अन्यथा आमच्या घरातील किंवा अपार्टमेंटमधील इतर लोकांना त्रास होऊ शकला असता. एवढ्या निष्काळजीपणानंतरही ॲमेझॉन त्यांचे ऐकत नसल्याचा आरोप केला. कस्टमर केअरच्या कर्मचाऱ्यांनीही त्यांना दोन तास फोनवर अडकवून ठेवले. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना नाहक त्रासाचा सामना करावा लागला. ई-कॉमर्स कंपन्यांनी त्यांचे पॅकेजिंग आणि वितरण प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणी या घटनेनंतर केली गेली.
आकाशगंगा पाहायची? येथे जा!
मुंबई, दिल्ली किंवा चेन्नईसारख्या महानगरातील वाढत्या प्रदुषणामुळे आकाशातील तारे दिसतच नाहीत. आता मॉन्सून सुरू झाल्याने ढगांमुळे आकाश दिसत नाही; परंतु देशातील एक गाव असे आहे जेथे आपल्याला आकाशगंगा दिसते.
आकाशगंगा पाहण्यासाठी येथे पर्यटक जमतात. वाढत्या प्रदूषणाने तारे दिसत नाहीत. या गावाला जगातील सर्वात उंच गाव म्हटले जाते. आपला भारत इतका विशाल आहे, की येथे एकाच देशात अनेक प्रकारचे हवामान आणि भौगोलिक रचना पाहायला मिळत असते. हिमाचल प्रदेशातील स्पिती जिल्ह्यामध्ये हे गाव आहे. या गावाला जगातील सर्वात उंच गाव म्हटले जाते. या गावाचे नाव कौमिक गाव. येथे आपल्या उघड्या डोळ्यांनी आकाशगंगा पाहायला मिळते. ते पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते. रात्रीच्या अंधारात तारे असे चमकतात की आपण विश्वास ठेवू शकणार नाही. याचा अनुभव घेण्यासाठी या गावात जायलाच हवे.
कौमिक गाव समुद्रसपाटीपासून सुमारे 15 हजार 27 फूट उंचीवर वसलेले आहे. तिथे मोटर बाइकने सहज जाता येते. यामुळेच या गावात पर्यटकांचा राबता असतो. या गावात जून महिन्यातील तापमान सात ते नऊ अंश सेल्सियसपर्यंत खाली उतरलेले असते. थंडीत इथली घरेदेखील रिकामी असतात. कारण एवढ्या थंडीत गावात राहाणे शक्य नसते. दरम्यान, गावकरी पायथ्याशी असलेल्या घरांमध्ये राहतात. थंडी गेली की पुन्हा ते आपल्या गावातील मूळ घरात येतात. कौमिक गावाची आशियातील नव्हे, तर जगातील सर्वात उंच गावात गणना होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *