रोटरी क्लब ऑफ ठाणे
ठाणे : जेष्ठ रोटरीयन मेधा जोशी यांची रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षपदी तर रोटरीयन अमोल नाले यांची सचिवपदी निवड झाली आहे. बॉलीवूड गाण्यांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पदग्रहण सोहळ्यात रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर टी. एन. सुब्रमण्यम आणि सहाय्यक प्रांतपाल सुधा शंकर नारायणन यांनी जोशी आणि नाले यांना त्यांच्या पदांची जबाबदारी सोपवली. आगामी वर्षभराच्या कार्यकाळात गरजूंना अन्नदान, लहान मुलांवर करण्यात येणाऱ्या हृदयाच्या शस्त्रक्रिया, दुर्गम ग्रामीण भागातील शाळांच्या दुरुस्ती, दिव्यांगासाठी आरोग्य शिबिरं, मुलांना मोबाईलपासून लांब ठेवण्यासाठी विविध उपक्रम, ठाणे महापालिकेच्या जोडीने युवकांकरता स्किल डेव्हलपमेंट उपक्रम राबवणार असल्याचे अमोल नाले यांनी यावेळी सांगितले.
