ठाणे : भविष्यात नाविक कामगारांच्या हितासाठी  अनेक कामगार कल्याणकारी योजना राबविल्या जातील. आपल्या भाषणात  ते पुढे म्हणाले की, आम्ही आमच्या नाविकांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यासाठी वचनबद्ध आहोत असे नुसिचे सरचिटणीस  मिलिंद कांदळगावकर यांनी सांगितले.
नुसी मेरिटाईम अकॅडेमी मध्ये  नॅशनल युनियन ऑफ सीफेरर्स ऑफ इंडिया (NUSI) च्या वतीने नुकताच नाविक आणि त्यांच्या कुटुंबियांचा कौटुंबिक मेळावा तसेच गोव्यातील नाविकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी फ्लिट शिप मॅनॅजमेण्ट कंपनी च्या माध्यमातून रोजगार मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमास मडगांव, गोवा येथील शेकडो नाविक आणि त्यांचे कुटुंब  सहभागी झाले होते. नाविक  कामगारांच्या या कौटुंबिक सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नुसीचे अध्यक्ष कायदेविशारद प्रेमानंद साळगांवकर,  नुसीचे सरचिटणीस मिलिंद कांदळगांवकर, गोव्याचे आमदार कॅप्टन व्हेंझी वेगास,आमदार क्रूझ सिल्वा , गोवा सीमेन असोसिएशनचे अध्यक्ष श्री फ्रॅंकवेगास, फ्लिट मॅनॅजमेण्ट शिपिंग कंपनीचे प्रमुख व्यवस्थापक श्री जनार्दन बहिरत व त्यांची टीम उपस्थित होती नुसी युथ कमिटी तसेच नुसी वूमन कमिटी सादर केलेल्या नुसीच्या कार्यकारी योजनांचे उपस्थित सर्व मान्यवरांनी  कौतुक  केले आणि संघटनेच्या कामगार कल्याणकारी  विविध उपक्रमांना मनापासून पाठिंबा दिला. या कार्यक्रमाला गोव्यातील नाविक आणि त्यांच्या कुटुंबियांचा चांगला सहभाग  मिळाला. गोव्यात न्यूसीचा हा एक ऐतिहासिक कौटुंबिक मेळावा यशस्वीपणे संपन्न झाला.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *