पूरग्रस्तांना मत्स्यव्यवसाय कर्मचारी संघटनेकडून १ लाख २५ हजार रुपयांची मदत
ठाणे: राज्यामध्ये दिवाळी मोसमात झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसाय कर्मचारी संघटने मार्फत मदत म्हणून मत्स्यव्यवसाय कर्मचारी संघटनेने आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून मदतीचा हात पुढे करत संघटनेने १ लाख २५ हजार रुपयांचा निधी नैसर्गिक आपत्ती करिता (महापूर) निधी म्हणून सरकाकडे जमा केला आहे.सदर निधीचा धनादेश २७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मंत्रालय येथे सहाय्यक संचालक वित्त विभागाचे प्रमुख धनावडे यांच्याकडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सुपूर्द केला आहे.यावेळी मत्स्यव्यवसाय कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सचिव निलेश मोरे,सल्लागार ज्ञानेश्वर सांडभोर सदस्य मुकेश उबाळे,प्रवीण गटकुळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
