Month: September 2024

ठाण्याचा राजा, नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची ४६ वर्षांची अव्याहत परंपरा

Photo-5   अनिल ठाणेकर ठाणे : उदय नगर, पांचपाखाडी येथे २६ जानेवारी १९७९ रोजी काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून गणेशोत्सवाची सुरुवात केली. फक्त गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता या…

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतले गणरायांचे दर्शन

मुंबई : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ येथील श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि पूजन केले. याप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली.…

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाव्दारे 300 हून अधिक देशी झाडांचे वृक्षारोपण*

नवी मुंबई : केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने प्राप्त निर्देशानुसार 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2024 या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा’ साजरा करण्यात येत असून या अंतर्गत…

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे

वसीम अहमद खान यांचे गायन मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने नाना आणि भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि भरत व शैलेश राजाध्यक्ष तसेच शारदा सबनीस यांच्या सहकार्याने वसीम अहमद…

दत्तात्रय चिव्हाणे यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार जाहीर

ठाणे : ठाण्यातील सावरकर नगर येथील कलावंत दत्तात्रय चिव्हाणे यांना कला क्षेत्रातील राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ध्येयवादी कलाकारांना सदर पुरस्कार नवी मुंबई स्थित…

माथेरानच्या कस्तुरबा रोडलगत वनखात्याच्या जागा व्यापल्या हॉटेल धारकांनी

माथेरान : ब्रिटिश राजवटीत १८५० मध्ये स्थापन झालेल्या टुमदार अशा माथेरान पर्यटनस्थळी रस्त्यालगत असणारी मुबलक जागा वनखात्याच्या अखत्यारीत येत आहे.परंतु या जागांवर हॉटेल धारकांनी अतिक्रमणे करून जागा व्यापलेल्या आहेत. त्यामुळे…

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार’ योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

ठाणे : महाराष्ट्र शासनाने राज्यातील अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, अखिल भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, राज्य शासन किंवा तत्सम संस्था इ. मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयामध्ये व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक, पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या व वसतीगृहामध्ये मोफत प्रवेश मिळाला नसल्यास “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” सुरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी शासनाने यापूर्वी असलेली २० ऑगस्टपर्यंतची मुदत वाढविण्यात आली असून नवीन मुदतवाढ ही उच्च शिक्षणाच्या द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज ३० सप्टेंबरपर्यंत तसेच प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली आहे.

श्याम ठाणेदार वादळी सन्मान पुरस्काराने सन्मानित

ठाणे : श्रीगोंदा जिल्हा अहिल्या नगर येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक वादळी स्वातंत्र्याच्या तपपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात स्तंभलेखक श्याम ठाणेदार यांना  वादळी सन्मान पुरस्काराने सुवर्णाताई पाचपुते, दिग्विजय नागवडे, साप्ताहिक वादळी स्वातंत्र्यचे संपादक जितेंद्र पितळे, उपसंपादक बाळाप्रसाद मंत्री, बाळासाहेब नाहटा, आदर्श शिक्षक रामदास ठाकर आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात साप्ताहिक वादळी स्वातंत्र्यचा विशेष अंक प्रसिद्ध करण्यात आला.  श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे झालेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना वादळी सन्मान  पुरस्कार देण्यात आला. श्याम ठाणेदार हे साप्ताहिक वादळी स्वातंत्र्यमध्ये नियमित लेखन करतात. स्तंभलेखन करतात. साप्ताहिक वादळी स्वातंत्र्य मध्ये त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत म्हणूनच त्यांना वादळी पुरस्काराने गौविण्यात आले आहे. श्याम ठाणेदार यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन

अनिल ठाणेकर ठाणे : परिवहन विभागातंर्गत ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची वा शासनाच्या विचाराधीन होती. त्याप्रमाणे शासनाकडून धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात अनेक वर्षापासून ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ परिवहन विभागांतर्गत स्थापन करण्याबाबत मागणी करण्यात येत होती. महाराष्ट्रातील ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी यांची नोंदणी, बॅज वितरण, निरीक्षण, तपासणी व कर भरणा परिवहन खात्यामार्फत करण्यात येतो. त्यामुळे ऑटो-रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालकांची अदयावत संपूर्ण माहिती (डेटा) परिवहन विभागाकडे उपलब्ध असते. त्यामुळे परिवहन विभागातंर्गत ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची वा शासनाच्या विचाराधीन होती. त्याप्रमाणे शासनाकडून महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे.महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाकडून केंद्र शासनामार्फत व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या १. जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, २.आरोग्य विषयक लाभ, ३. कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना (रु.५०,०००/-), ४. पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, ५. कामगार कौशल्य वृध्दी योजना अशा विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालकांना देण्यात येणार आहेत. हा शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या १६ मार्च २०२४ रोजी संपन्न बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आला आहे, असे कल्याण चे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.

युवांनी “माय भारत” पोर्टलवर नोंदणी करा

क्रीडा विभागाकडून आवाहन ठाणे : भारत देश युवांचा देश म्हणून ओळखला जात असून राष्ट्र निर्माणाच्या शाश्वत विकासाच्या मुख्य प्रवाहात युवांचे मोठे योगदान आहे. सामाजिक विकासाच्या प्रभावी माध्यमांची ओळख करून राष्ट्रीय व सामाजिक विकासाच्या प्रवाहात युवा शक्तीचा सहभाग असून तो वाढविणे आवश्यक आहे. यासाठी युवक कल्याण व क्रीडा विभाग यांनी दि.१८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान युवांच्या सहभागाने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी दिली आहे. “माय भारत” पोर्टलवर विविध युवा उपक्रम नोंदणी करणे, सेवाकार्य, स्वच्छता हा नवीन संकल्प-स्वच्छता पंधरवडा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. युवांचा राष्ट्र निर्माण कार्यात सहभाग वाढविणे, विकसित भारत करण्यामध्ये युवांनी योगदान देणे, याबाबत या पोर्टलवर युवांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी या https://mybharat.gov.in  संकेतस्थळावर  जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व महाविद्यालय तसेच राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊट व गाईड इ. विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी यांनी नोंदणी करावयाची आहे. यामध्ये युवांनी केलेल्या विविध कार्याची माहिती संकलित होते. त्यांनी विविध वर्षामध्ये तसेच कार्यक्रमामध्ये घेतलेल्या सहभगाबाबत तपशिल एकत्रित होतो. यामुळे युवांनी केलेल्या कार्याची वैयक्तिक माहिती पोर्टलवर उपलब्ध होते. ठाणे जिल्ह्यातील विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील युवा व राष्ट्रीय सेवा योजनेचे छात्र यांनी नोंदणी “माय भारत” पोर्टल वर करण्यात यावी. १५ ते २९ वयोगटातील युवा विचारात घेता शाळा , कनिष्ठ महाविद्यालय  व महाविद्यालय यांनी नोंदणी करावी. उर्वरित माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोर्ट नाका, ठाणे  दूरध्वनी: ०२२-२५३६८७५५ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी केले आहे.