रमेश औताडे
मुंबई : वाचन प्रेरणा दिन एका दिवसापुरता मर्यादित नसावा वर्षभर त्याची जनजागृती मोहीम सुरू रहावी. त्यासाठी अमेरिका व पॅरिस येथील वाचनालयाचा आदर्श घ्यावा व विद्यार्थी घटकाला समोर ठेऊन वाचन जनजागृती विविध उपक्रम राबवावेत. तरच ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने होत असलेल्या या कार्यक्रमाचे सार्थक होईल असे मत प्रमुख वक्ते साहित्यिक प्रज्ञा जांभेकर यांनी व्यक्त केले.
१५ ऑक्टोबर या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, राज्य मध्यवर्ती ग्रंथालय मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना प्रज्ञा जांभेकर यांनी सांगितले की, अमेरिका व पॅरिस येथील सरकार ३८२४ प्रती व्यक्ती वाचनालय बजेट ठेवते तर आपल्याकडे प्रती व्यक्ती ७ पैसे बजेट आहे. अनेक वाचनालयात पुस्तकांना वाळवी लागली आहे.
महाराष्ट्र ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी संचालक अशोक गाडेकर व प्रमुख वक्त्या साहित्यिक प्रज्ञा जांभेकर यांच्या हस्ते यावेळी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या ग्रंथपाल शालिनी इंगोले यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने माहिती दिली तर अशोक गाडेकर यांनी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन चांगले केल्याबद्दल अभिनंदन केले.
अशोक गाडेकर यांनी ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पूर्ण नावाची पूर्ण नावाची माहिती सांगितली. अबुल पाकिर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे त्यांचे नाव सांगितले. यावेळी महसूल सहायक नागनाथ लोलेवर , ग्रंथालय अधिकारी योगेश बिर्जे, तांत्रिक सहायक सुवर्णा यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *