मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे बालदिनानिमित्त लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत एलआयसी-आयडियल कप शतक महोत्सवी बुध्दिबळ स्पर्धेमध्ये अपराजित ९ वर्षीय आराध्या पुरो हिने ९ व १० वर्षाखालील दोन्ही वयोगटात सर्वाधिक ४.५ गुण जिंकत विजेतेपदाचा डबल धमाका केला. १० वर्षाखालील गटात निर्णायक पाचव्या साखळी फेरीमध्ये आराध्या पुरोने अर्जुन बॅनर्जीच्या राजाला २८ व्या मिनिटाला शह देत दुसऱ्या विजेतेपदाला गवसणी घातली. मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना, आरएमएमएस व को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई सहकार्याने झालेल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सिंधुदुर्ग सहकारी बँकेचे चेअरमन हरीश परब, मुंबई शहर बुध्दिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळीच्या उपस्थितीत पार पडला.

परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात ८ वर्षाखालील मुलांमध्ये फिडे गुणांकित सबज्युनियर बुध्दिबळपटू डेत्यन लोबोने (४ गुण) प्रथम, अधवान ओसवालने (४ गुण) द्वितीय, यश चुरीने (३.५ गुण) तृतीय, आद्यंत जम्बुसारीयाने (३ गुण) चौथा, तत्त्व शेजवळने (३ गुण) पाचवा तर मुलींमध्ये ईशी सिंगने (३ गुण) प्रथम, निकिता संदीपने (३ गुण) द्वितीय; १० वर्षाखालील मुलांमध्ये नैतिक पालकरने (४ गुण) प्रथम, विआन कनावजेने (४ गुण) द्वितीय, अद्वैत तुळपुळेने (३.५ गुण) तृतीय, कार्तिकेय सावंतने (३ गुण) चौथा, अर्जुन बॅनर्जीने (३ गुण) पाचवा तर मुलींमध्ये आराध्या पुरोने (४.५ गुण) प्रथम, श्रीया चौधरीने (२ गुण) द्वितीय: १२ वर्षाखालील मुलांमध्ये अरेना कॅन्डीडेट मास्टर फेरद्यन लोबोने (४.५ गुण) प्रथम, आर्यन पागडने (४ गुण) द्वितीय, महिमना अग्निहोत्रीने (४ गुण) तृतीय, अमोघ आंब्रेने (३.५ गुण) चौथा, अरहान खानने (३ गुण) पाचवा तर मुलींमध्ये अरेना कॅन्डीडेट मास्टर शहाना कृष्णनने (३ गुण) प्रथम, काव्या शाहने (२.५ गुण) द्वितीय आणि १४ वर्षाखालील मुलांमध्ये मानस हाथीने (५ गुण) प्रथम, वेदांत जम्बुसारीयाने (४ गुण) द्वितीय, स्तेवेन शिंदेने (३ गुण) तृतीय, लव सेतपालने (३ गुण) चौथा, गौरव नलावडेने (२.५ गुण) पाचवा तर मुलींमध्ये आर्या चव्हाणने (३ गुण) प्रथम, आर्या नाईकने (३ गुण) द्वितीय पुरस्कार पटकाविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *