ठाणे : श्री मावळी मंडळ ठाणे संस्थेने शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 35 वी जिल्हास्तरीय व अंतर्गत शरीरसौष्ठव श्री मावळी मंडळ श्री स्पर्धा शनिवार दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी संस्थेच्या क्रीडांगणात मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये अंतर्गत व जिल्हास्तरीय मिळून एकूण 14 व 49 अशा 63 स्पर्धकांनी भाग घेतला होता. ह्या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे यांनी केले. अंतर्गत व जिल्हास्तरीय किताब विजेत्यांना बक्षिस देण्यासाठी प्रमुख पाहुणे अशोक उतेकर (कळवा पोलीस स्टेशन प्रमुख), विशेष अतिथी कमलाकर पाटील (अध्यक्ष अखिल भारतीय शरीरसौष्ठव संघटना), अमित नांदगावगकर (अध्यक्ष – ठाणे जिल्हा शरीर सौष्ठव संघटना) व कौस्तुभ कुलकर्णी (न्यू इंडिया इन्शुरन्स ठाणे विभाग जिल्हा प्रमुख) हे उपस्थित होते. त्यांच्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, उपाध्यक्ष सुनील करंजकर, खजिनदार रिक्सन फर्नांडिस, चिटणीस रमण गोरे, उप चिटणीस संतोष सुर्वे, सहचिटणीस चिंतामणी पाटील, विश्वस्त कृष्णा डोंगरे, विश्वस्त प्रभाकर सुर्वे, विश्वस्त पॅट्रिक फर्नांडीस व विश्वस्त केशव मुकणे हे उपस्थित होते.
सदर स्पर्धेत अंतर्गत श्री मावळी मंडळ श्री किताब किशोर सीताराम जाधव यांने पटकविला. तर, जिल्हास्तरीय श्री मावळी मंडळ श्री किताब ए बी एस स्टुडिओ जिम ठाणे या व्यायाम शाळेच्या करण श्रवण ठाकूर याने पटकविला. ह्या स्पर्धेतील सांघिक विजेतेपद श्री मावळी मंडळ ठाणे (14 गुण), तर सांघिक उपविजेतेपद ए बी एस स्टुडिओ जिम ठाणे (12 गुण) यांना मिळाले. ह्या स्पर्धेदरम्यान सहभागी व्यायामशाळेना शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
