Month: November 2024

35 वी जिल्हास्तरीय व अंतर्गत शरीरसौष्ठव ‘श्री मावळीमंडळ श्री’ स्पर्धा उत्साहात साजरी

ठाणे : श्री मावळी मंडळ ठाणे संस्थेने शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 35 वी जिल्हास्तरीय व अंतर्गत शरीरसौष्ठव श्री मावळी मंडळ श्री स्पर्धा शनिवार दिनांक  9 नोव्हेंबर 2024 रोजी संस्थेच्या क्रीडांगणात…

टक्केवारीची टोरन्ट पाॅवर बंद करण्यासाठी मला निवडून द्या – नजीब मुल्ला

अनिल ठाणेकर ठाणे : मुंब्रा कळव्यातील लोकांना टोरन्ट पाॅवर चे ३५० युनिट चे विजेचे बिल महिन्याला ४ ते ५ हजार रुपये येते, या प्रत्येक वीजधारकाच्या बिलातुन ३६० रुपये टक्केवारी येथील…

एलआयसी-आयडियल बुध्दिबळ: आराध्या पुरोचा डबल धमाका   

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे बालदिनानिमित्त लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत एलआयसी-आयडियल कप शतक महोत्सवी बुध्दिबळ स्पर्धेमध्ये अपराजित ९ वर्षीय आराध्या पुरो हिने ९ व १० वर्षाखालील दोन्ही वयोगटात…

ठाण्यात बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाईचा बडगा

१० कोटी ९६ लाख १९ हजार ५७४ रूपयांचा दंड वसूल होणार ठाणे : ठाणे महापालिकेने शहरातील बेकायदेशीर होर्डिंग्जवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या आणि महापालिकेची फसवणूक…

नाशिक, मालेगावातील १६७६ मतदान केंद्रांवरील घडामोडींचे थेट प्रक्षेपण

हरिभाऊ लाखे नाशिक : नाशिक आणि मालेगाव महापालिका हद्दीतील सर्व १६७६ मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करून घडामोडींचे थेट प्रक्षेपण (वेबकास्ट) करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सहा संवेदनशील तसेच पोलीस आणि प्रत्येक विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी जी केंद्रे संवेदनशील म्हणून निश्चित करतील, तिथेही व्यवस्था केली जाणार आहे. ग्रामीण भागातील निम्म्या मतदारसंघात सीसी टीव्ही यंत्रणा असणार आहे. १५ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला जिल्ह्यातील ४९२६ केंद्रांवर मतदान होणार आहे. निवडणूक यंत्रणेने तयारीला वेग दिला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, शौचालय, वाहनतळ, खुर्ची आदींची व्यवस्था करण्याची सूचना जिल्हा परिषद व महापालिकेला करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून मतदान केंद्रांवर लक्ष ठेवले जाणार आहे. नाशिक शहरात ११७९ मतदान केंद्रे असून मालेगाव शहरात ही संख्या ४९७ इतकी आहे. शहरी भागातील सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविली जाईल. येथील घडामोडींचे थेट प्रक्षेपण होणार असल्याने प्रत्येक मतदारसंघातील मध्यवर्ती नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जाईल. ग्रामीण भागातील ५० टक्के मतदान केंद्रात ही व्यवस्था कार्यान्वित केली जाईल, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांंनी नमूद केले. ग्रामीण भागात १६२६ केंद्रांवर सीसी टीव्ही बसवून थेट. प्रक्षेपणाचे नियोजन करण्यात येणार आहे. मतदारसंघनिहाय केंद्र नांदगाव (१७२), मालेगाव मध्य (३४४), मालेगाव बाह्य (२५३), बागलाण (१४४), कळवण (१७४), चांदवड (१५३), येवला (१६४), सिन्नर (१६९), निफाड (१३९), दिंडोरी (१८७), नाशिक पूर्व (३३१), नाशिक मध्य (३०३), नाशिक पश्चिम (४१३), देवळाली (२०६), इगतपुरी (१५०) या केंदांवरील घडामोडींचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

दोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंददोन स्थानकांमध्ये भुयारात मेट्रो बंद

एमएमआरसीकडून प्रवाशांची सुखरूप सुटका मुंबई : कुलाबा-वांद्रे सिप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्पा सुरू होऊन एक महिना होत नाही तोच या मार्गिकेवरील मेट्रो गाडी भुयारातच बंद पडण्याची घटना घडली आहे. बीकेसीच्या…

ठाणे जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचा प्रचार दौराच नाही

ठाणे : शिवसेनेतील मोठया फुटीनंतर ठाण्यात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देणारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्याकडे पुर्णपणे पाठ फिरविल्याने ठाकरे समर्थक शिवसैनिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘मुख्यमंत्र्यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात निवडणूक लढवेन’ अशी घोषणा करत ठाण्यातील आपल्या समर्थकांमध्ये आदित्य यांनी उर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न फुटीनंतर केला होता. ही निवडणुक लढविणे दूर त्यांच्या प्रचार दौरा कार्यक्रमात ठाण्यातील एकही सभा अथवा रॅलीचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रभावक्षेत्र मानले जाते. येथील १८ विधानसभा मतदारसंघात शिंदे आणि भाजपचा वरचष्मा असून यंदाच्या निवडणुकीतही येथील कामगिरी उत्तम राखण्याची आशा महायुतीला वाटत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील वेगवेगळ्या भागात महायुतीचा पराभवाचे धक्के बसत असताना ठाणे, कल्याण, पालघरची जागा शिंदे आणि भाजपने जिंकली. भिवंडीत समोर दिसत असलेला पराभव कपील पाटील यांच्या अतिआत्मविश्वासामुळे दुर गेल्याची भावना भाजपमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर यंदाही ठाणे जिल्ह्यातील शिंदे-भाजपचा बालेकिल्ला भेदणे महाविकास आघाडीसाठी आव्हानात्मक आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांकडे लक्ष लागून राहीलेल्या उद्धव सेनेच्या नेते, पदाधिकारी आणि उमेदवारांच्या पदरी निराशा येते की काय अशी सध्याची परिस्थिती आहे. उद्धव यांच्या तीन सभा, आदित्य यांचा दौरा अनिश्चितच लोकसभा निवडणुकीत ठाणे आणि कल्याण लोकसभेत ठाकरे गटाचा पराभव झाला. शिवसेनेतील फुटीनंतर जिल्ह्यातील खासदार, आमदार, माजी नगरसेवकांनी शिंदे यांची साथ दिली. शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे…

दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेचा प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा

पनवेल : भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना दिवसेंदिवस विविध संस्था संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत असून या विधानसभा निवडणुकीसाठी दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे पाठिंबा पत्र सुपूर्द करण्यात आले असून पाठिंबा पत्रात म्हंटले आहे कि, आमच्या संघटनेची झालेल्या सर्वसाधारण बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाने सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी पनवेल विधानसभा मतदार संघाचे भाजप महायुतीचे आमदार कार्यक्षम तसेच कार्यसम्राट उमेदवार म्हणून बिनशर्त व सक्रीय पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळे दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेचा प्रत्येक दिव्यांग सदस्य, त्यांचे कुटुंबीय, निराधार तसेच इतर सर्व सदस्य, पदाधिकारी वर्ग आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे. आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर हे अत्यंत दानशूर व उदार तसेच समाजातील गोरगरीब व दिव्यांग तसेच विद्यार्थी व गुणवंत, गरजवंत अशा सर्वांना मदतीचा हात नेहमीच पुढे करणारे लोकनेते आहेत. आणि त्यांचा सामाजिक बांधिलकीचा वारसा त्यांचे चिरंजीव आमदार प्रशांत ठाकूर चालवत आहेत.  सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रदिर्घ अशी यशस्वी व जनहिताची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राजकारण व समाजकारण यांचा अनुभव घेत व अभ्यास करीत विधानसभा निवडणुकीत आमदार पदावर यशस्वी गरूड झेप घेवून पनवेल मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे एक कर्तव्य दक्ष व जनहिताची कामे करण्यात मग्न राहणारा आमदार आम्हाला लाभला हे या मतदारसंघाचे सुदैव आहे. अत्यंत दांडगा जनसंपर्क व सर्वसामान्य जनतेविषयीची सहानुभूती यामुळे आता सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सुध्दा आपण फार मोठ्या मताधिक्याने विजयी होणारच याविषयी आम्हा सर्वांना खात्री आहे. नेतृत्व गुण व समाजसेवी व्यक्ती म्हणून या मतदारसंघातील सुजाण जनता आपणास बहूसंखेने विजयी करणार हे निश्चित असून आमच्या दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेतर्फे पाठिंबा देत आहोत, असेही या पाठिंबा पत्रात म्हंटले आहे.

लोकशाही मजबुतीसाठी धर्मनिरपेक्षता हे संवैधानिक मूल्य जपणे आवश्यक – डॉ. संजय मंगला गोपाळ

ठाणे : समाजात धर्मा धर्मात, जाती जातीत दुही माजवणाऱ्या वृत्तींना नाकारून, सर्वधर्म समभाव आणि धर्मनिरपेक्षता या संविधानाने दिलेल्या मूल्यांचे रक्षण करणे ही नागरिकांची जबाबदारी आहे आणि ती निभावण्याची संधी या महिन्यात निवडणुकीने आपल्याला मिळाली आहे. तिचा पुरेपूर उपयोग करणे आपले कर्तव्य आहे, असे आग्रही प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी आज ठाण्यात केले. समता विचार प्रसारक संस्थेच्या सर्वधर्म समभाव सांस्कृतिक संमेलनात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, विविध धर्म, जाती, भाषा, पोशाख, रितीरिवाज यानी नटलेल्या आपल्या देशात एकमेकांचा आदर करुन प्रेममय राहावं या साने गुरुजी आणि संत, विचारवंत यांच्या विचारांवर चाललो तरच देशांत शांतता नांदेल आणि प्रगती होईल. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्व धर्मीय सामील होते. हा देश सर्व धर्मीय भारतीयांचा आहे, हे स्वातंत्र्य लढ्यातील मूल्य नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात उतरले आहे. त्याच्या विरोधात काम करणार्‍या सांप्रदायिक प्रयत्नांना विरोध करत समतेचे मूल्य आपण जपणे आवश्यक आहे. हे मूल्य रुजवण्यासाठी संस्थेतर्फे ईद, दिवाळी, गुरु नानक जयंती आणि नाताळच्या सणात सर्वधर्मीय संमेलने, गुरुद्वारा, चर्च व मशीद भेट आदी कार्यक्रम संस्था आयोजित करत असते, याचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी साने गुरुजींच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त, साने गुरुजी १२५ अभियानांतर्गत ‘प्रेममय साने गुरुजी’ हा कार्यक्रम सादर झाला. साने गुरुजींच्या प्रेमळ, करुणामयी पण तितक्याच कणखर व्यक्तीमत्वाचा वेध त्यांच्या कथा, लेख, गाणी आणि साने गुरुजींवर मान्यवरांनी लिहिलेले लेख यांच्या कथनाने आणि अभिवाचनाने घेणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम, ठाण्यातील कलाकार व कार्यकर्त्यांनी सादर केला. यात, लतिका सु. मो. यांनी गुरुजींच्या जीवनावरील पत्रावळ आणि घाण या कथा सादर केल्या. नीलिमा सबनीस यांनी दलितांना पंढरपूर मंदिर प्रवेशाच्या वेळचे गुरुजींचे विचार सादर केले. अलका जोशी यांनी एस एम जोशी यांची गुरुजींचा त्यांच्यावरील प्रभाव व्यक्त करणारी नास्तिक कथा सादर केली. राजश्री भिसे यांनी गुरुजींना आलेला कडू-वाईट अनुभव आणि त्याचा त्यांच्या लेखनात उमटलेला सकारात्मक हुंकार सांगणार्‍या कथा सादर केल्या. मीनल उत्तुरकर यांनी गुरुजींचे आंतरभारतीचे विचार मांडले. विशाखा देशपांडे यांनी निवेदन करताना स्वातंत्र्य लढ्यात गुरुजी तुरुंगवासात अनन्वित अत्याचार सहन करत असतांना गुरुजींनी केलेल्या विपुल लेखनाचा वेध घेतला. संजय मंगला गोपाळ यांनी गुरुजींचे आता उठवू सारे रान हे गाणे सध्यस्थितीचा संदरर्भ देत सादर केले. खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे या सामूहिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि बलसागर भारत होवो या समूहगीताने समारोप कारण्यात आला. समता विचार प्रसारक संस्थेच्या आणि वी नीड यू सोसायटीच्या एकलव्य विद्यार्थी, कार्यकर्ते यांनी नृत्य, गाणी असा रंगारंग कार्यक्रम सादर करुन मजा आणली. यात नियती कदम, पूजा गावडे, तेजश्री मगर, रूपाली तांगडे, भारती कांबळे, शिवशंकर गवळी यानी नृत्य पेश केली. विमल वर्मा हिने आत्मविश्वासाचे महत्व यावर आपले मनोगत व्यक्त केले. समता विचार प्रसारक संस्थेतर्फे दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा स्मृतिशेष हिरजी गोहिल क्रीडा जल्लोष संपन्न झाला. क्रिकेट, कबड्डी, कॅरम, बुद्धीबळ हे खेळ तसेच चित्रकला, रांगोळी, मेहंदी, हस्तकला या कलांमध्ये एकलव्य  मुलांनी सहभाग घेतला. या सर्व सहभागी मुली मुलांना अध्यक्ष हर्षलता कदम, विश्वस्त मनीषा जोशी, हितचिंतक रवींद्र नी. ता. आदींच्या हस्ते बक्षिसे देण्याचा समारंभही यावेळी पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारी सचिव अजय भोसले, येनोक कोलियार, पल्लवी लंके, रीतुराज परह्याड आदींनी विशेष मेहनत घेतली.

पंतप्रधानांच्या विकासाच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्र महायुतीसोबत-रविंद्र चव्हाण

अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे विकसित राज्य बनविण्याचा भारतीय जनता पार्टीचा संकल्प असून राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलीयन डॉलर्सपर्यंत पोहोचविण्यासाठी गतिमान विकास हे भाजपाचे ध्येय आहे, असे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सोमवारी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीनिमित्त भाजपाच्या संकल्पपत्राचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याच्या हस्ते रविवारी मुंबईत प्रकाशन झाले. पक्षाच्या संकल्प पत्राची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत रविंद्र चव्हाण बोलत होते.भारतीय जनता पार्टीने दिलेली  अनेक आश्वासने पूर्ण केली असल्याने देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीत भाजपाला पुन्हा सत्तेचा कौल दिला आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या संकल्पपूर्तीसाठी महायुतीने महाराष्ट्रातही ठोस विश्वासाने वाटचाल सुरु केली महाराष्ट्र हे मजबूत, समृद्ध, सुरक्षित राज्य बनवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, प्रवक्ते सागर भदे, सुजय पत्की, मृणाल पेंडसे, ठाणे विधानसभा अध्यक्ष ॲड सुभाष काळे उपस्थित होते. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी कॉंग्रेस आघाडीतील पक्षांनी कंबर कसली आहे, आणि तेच पक्ष आता महाराष्ट्रात संविधानाच्या नावाने कोरे कागद दाखवून  डॉ . बाबासाहेब आंबेडकर आणि…