– सहा लाखांचे नुकसान; रात्री दोन वाजेची घटना
सोयगाव-सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव चौफुली वर असलेल्या स्वामी समर्थ ऑटो गॅरेजला शनिवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागून गॅरेजच्या दुकानाचा अक्षरशः कोळसा झाला आहे दरम्यान घटनास्थळी तातडीने पाचोरा येथील अग्निशमन दलाला पाचारण केल्यामुळे आग आटोक्यात आली त्यामुळे शेजारची दुकाने आगीच्या विळख्यातुन वाचली आहे
गोंदेगांव येथील बनोटी चौफुलीवर असलेले मंगलसिंग त्रंबक पवार यांचे श्री स्वामी समर्थ ऑटो गॅरेजला काल सायंकाळी दुकान मालक मंगल सिंग पवार हे नियमित पणे दुकान बंद करून घरी गेले मात्र रात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या दुकानात आग लागल्याचा त्यांना फोन आल्या ने त्यांनी तातडीने दुकानाकडे धाव घेतली परंतु तोपर्यंत आगीत दुकान कोळसा झाला होता या घटनेत एक मोटारसायकल सह दुकानातील दुचाकीचे स्पेअर पार्ट,बॅटऱ्या, हायड्रॉइक पंप, व फर्निचर जळून खाक झाले त्यात त्यांचे सुमारे सहा ते सात लाखाचे नुकसान झाले आहे रविवारी सकाळी मंगलसिंग पवार यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात अर्ज दिला असून महसूल कडून अद्याप घटनेचा पंचनामा करण्यात आलेला नव्हता दरम्यान आगीचे लोळ उंचचा उंच दिसुन येत होते त्यामुळे आग नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी कोणत्याही सुविधा नव्हत्या त्यामुळे पाचोरा जि जळगाव येथील अग्निशमन दलाच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले रात्री तीन वाजता अग्निशमन दल घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली परंतु आगीत सर्वच साहीत्य जळून खाक झाले आहे…
चौकट- शेतकऱ्याचा ७५ क्विंटल कापूस बचावला
दरम्यान गॅरेजच्या शेजारीच एका शेड मध्ये एका शेतकऱ्याचा ७५ क्विंटल कापूस होता आग नियंत्रणात आल्या मुळे या शेतकऱ्याचे सुदैवाने नुकसान टळले आहे.