ठाणे : कळवा विभागातील दरवर्षीप्रमाणे यंदाही मुकुंद केणी प्रतिष्ठान आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन कळवा विभागात करण्यात आले होते. माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला मुकुंद केणी व मंदार मुकुंद केणी यांच्या मार्गदर्शनाखाली २५ डिसेंबर रोजी नाताळच्या निमित्ताने ही चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.
चित्रकला स्पर्धेचे यंदाचे १५ वे वर्ष असून या स्पर्धेमध्ये लहान शिशु ते १० वीसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल कळवा येथे घेण्यात आले कळवा विटावा खारीगाव परिसरातील ८५० हुन अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी विविध विषय देण्यात आले होते या चित्रकला स्पर्धेसाठी मान्यवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई ठाणे शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी उपस्थिती लावली.
00000
