मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित कॅरमप्रेमी स्व. प्रल्हाद नलावडे स्मृती चषक शालेय १५ वर्षाखालील कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी ५२ खेळाडूंमध्ये २९ डिसेंबरला चुरशीच्या लढती होतील. आयएनजी स्कूल-वसईचाशान पालवणकर विरुद्ध पार्ले टिळक विद्यालयाचा अथर्व आरकर यामधील उद्घाटनीय लढत कॅरमप्रेमी अविनाश नलावडे व प्रमोद पार्टे, आयडियलचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, पंच चंद्रकांत करंगुटकर, अविनाश महाडिक व सचिन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी १०.०० वा. सुरु होईल. को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई व अविनाश स्पोर्ट्स यांच्या सहकार्याने होणाऱ्या शालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेतील पहिल्या ८ विजेत्या-उपविजेत्यांना स्ट्रायकरसह आकर्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
दादर-पश्चिम येथील को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन-मुंबई सभागृहात पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचे प्रसन्ना गोळे व पुष्कर गोळे, डॉ. अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूल-दादरचा ध्रुव भालेराव, आयएनजी स्कूल-वसईचाशान पालवणकर, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचे प्रसाद माने,  नील म्हात्रे, देविका जोशी व निधी सावंत, नारायण गुरु हायस्कूल-चेंबूरचा उमैर पठाण, एसकेकेई स्कूल-मुलुंडचा केवल कुळकर्णी, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल-कांदिवलीची स्वरी वाडेकर, ओमकार इंटरनॅशनल स्कूल-डोंबिवलीची प्रेक्षा जैन, जे.बी. वाच्छा हायस्कूल-वडाळाची गौरी सावंत, आदर्श विद्यालय-चेंबूरची स्वरा गावडे, सुळे गुरुजी इंग्लिश मिडीयम-दादरची ग्रीष्मा सावंत आदींमध्ये विजेतेपदाच्या दावेदारीसाठी अटीतटीचे सामने होतील. ज्येष्ठ पत्रकार आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांच्या सहकार्यामुळे सदर स्पर्धेतील पहिल्या आठ सबज्युनियर कॅरमपटूना राज्य क्रीडा दिनानिमित्त होणाऱ्या विनाशुल्क १५ वर्षाखालील कॅरम चँम्पियन सुपर लीग स्पर्धेसाठी थेट प्रवेश दिला जाणार आहे.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *