उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नियुक्ती
उल्हासनगर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.त्यात उल्हासनगर पश्चिम शहरप्रमुख पदावर कुलविंदरसिंग बैंस उर्फ बिंदरपाऊ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उबाठाचे शहरप्रमुख पिंकी भुल्लर यांचे मागच्या वर्षी निधन झाल्यावर हे पद रिक्त होते.त्यांच्याजागी उद्योगपती कुलविंदरसिंग बैंस उर्फ बिंदरपाऊ नियुक्ती करण्यात आली आहे.येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांचे कसब पणाला लागणार आहे.
याव्यतिरिक्त अंजली राऊत (महिला संघटक,कल्याण जिल्हा अंबरनाथ,उल्हासनगर,कल्याण पूर्व विधानसभा), भीमसेन मोरे (उपजिल्हाप्रमुख,अंबरनाथ विधानसभा),राधाचरण करोतिया (उल्हासनगर महानगरप्रमुख),पांडुरंग लांडे (विधानसभा प्रमुख, उल्हासनगर विधानसभा),सुरेश पाटील (उपशहरप्रमुख, उल्हासनगर),शिवाजी जावळे (विधानसभा उपप्रमुख उल्हासनगर),डॉ.अमोल मोलावडे (शिवसेना सचिव, उल्हासनगर),संतोष शिंदे (उपविधानसभा प्रमुख, अंबरनाथ)सोनाली जावळे (शहर संघटक,अंबरनाथ पूर्व),सोनिया फरकाडे (शहर संघटक,अंबरनाथ पश्चिम),सतीश शिंदे (विभागप्रमुख,उल्हासनगर विभाग 1), रमेश पाटील (उपजिल्हाप्रमुख कल्याण ग्रामीण),राहुल भगत (उपजिल्हाप्रमुख कल्याण ग्रामीण).या नियुक्त्या देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी जाहीर केल्या आहेत.
00000