ठाणे : कोकण मराठी साहित्य परिषद, आनंद विश्व गुरुकुल आणि शारदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष, लेखक, नाटककार आणि कादंबरीकार प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘संन्यस्त ज्वालामुखी’ या स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर आधारित चरित्रकादंबरीचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा रविवार, दि. १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह (मिनी थिएटर) येथे होणार आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमासाठी मा. ना. एकनाथ संभाजी शिंदे (महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री), यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून मा. ना. उदय सामंत (उद्योग व मराठी भाषा मंत्री), मा. ना. प्रताप सरनाईक (परिवहन मंत्री), तसेच मा. प्रा. डॉ. रविंद्र शोभणे ( महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ), डॉ. श्रीकांत शिंदे ( खासदार – कल्याण लोकसभा ) , मा. नरेश म्हस्के ( खासदार – ठाणे लोकसभा महाराष्ट्र प्रदेश समन्वयक शिवसेना ), मा.प्रा.डॉ.सदानंद मोरे (अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळ)मा. संजय केळकर – (आमदार ठाणे शहर), मा.अशोक समेळ ( ज्येष्ठ साहित्यिक ), मा.अशोक बागवे (ज्येष्ठ साहित्यिक ) मा. प्रवीण दवणे ( ज्येष्ठ साहित्यिक ), मा. किशोर कदम -सौमित्र (कवी, अभिनेते) , कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर, शारदा एज्युकेशनचे अध्यक्ष विलास ठुसे उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी या सोहळ्यास नोंदणी करून उपस्थित राहावे असे आवाहन शारदा प्रकाशनाचे प्रा.डॉ. संतोष राणे यांनी केले आहे.
0000