सामाजिक सेवेचा यथोचित गौरव

 

मुंबई : प्रख्यात वगसम्राट राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित दादू इंदुरीकर यांचे नातू ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक रघुनाथ सरोदे इंदुरीकर यांना महाराष्ट्र शासनाने २०२४ चा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान केला होता. त्यांच्या या प्रतिष्ठित पुरस्काराबद्दल तसेच त्यांनी केलेल्या अविरत सामाजिक कार्याबद्दल अशोक सरोदे इंदुरीकर यांचा महाराष्ट्र राज्य सरकारी राजपत्रित अधिकारी महासंघाचे प्रमुख सल्लागार ग. दि. कुलथे यांच्या शुभहस्ते नुकताच सेवानिवृत्त विक्रीकर कर्मचारी सोहळ्यात शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अशोक सरोदे इंदुरीकर यांनी सेवानिवृत्त संमेलन आयोजकांची या सन्माना बद्दल आपल्या मनोगतात कृतज्ञता व्यक्त केली.
वस्तु आणि सेवा कर अर्थात जीएसटी चे सेवानिवृत्त उपायुक्त अशोक चवरे व महिला कर्मचाऱ्यांसह 3400 सेवानिवृत्त कर्मचारी या स्नेहमेळाव्यास आवर्जून उपस्थित होते. आजकालच्या धकाधकीच्या काळात सेवानिवृत्ती नंतरही मित्र-मैत्रिणी भेटत असल्याने आनंदी व उत्साहपूर्ण वातावरण होते. या कार्यक्रमात जुनी गाणी व दे टाळी अशा मनोरंजनपर कार्यक्रमाचा आस्वाद सर्वांनी आस्वाद घेतला.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *