अशोक गायकवाड
कर्जत :सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यशवंत विठ्ठल पवार (माऊली) यांचे वडील कै. ह.भ.प विठ्ठल मारुती पवार यांचे (दि. १२) रोजी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या या निधनाने सर्वत्र वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे, निधनासमयी त्याचे वय ९० वर्षे होते.
कै. ह.भ.प विठ्ठल मारुती पवार यांचे मुळ जन्मगाव कर्जत तालुक्यातील शिंगढोळ असुन त्यांचा जन्म शेतकरी असलेल्या कुटुंबात झाला होता. मोल मजुरी करून आपल्या स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्याच बरोबर आपल्या आयुष्याला वारकरी पंथात सांगितल्या प्रमाणे धर्माची आपल्या आचरणाला भक्ति मार्गाची जोड देत ज्या ज्या ठिकाणी किर्तन असे प्रवचन असे तेथे तेथे हजेरी लावून ते मंत्रमुग्ध होत. त्याचा कष्टकरी जीवनाचा प्रवास वयाच्या पंधराव्या वर्षापासून चालू झाला तो वयाच्या ९० वर्षापर्यंत ते कष्ट करत भक्तीमार्गात मन रमणे, भजन कीर्तन प्रवचन ते मग्न होत असत. ते सतत सर्वाना मदतीसाठी धावून जायचे. सर्वांशी गोड, मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात कुटुंबीय अर्धांगिनी रखुमाई विठ्ठल पवार व मोठा मुलगा यशवंत विठ्ठल पवार भावंडे विश्वास, विलास, मुली मंदा कुंदा, चंदा असा त्यांच्या मुली असून नातवंडे असा मोठा परिवार आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *