कल्याण : क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य – पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद – ठाणे, मैत्री फाउंडेशन (रजि.) – कल्याण व सम्यक संकल्प महाविद्यालय, कल्याण पूर्व यांच्या सयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे सुवर्णा बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सुपुत्र पैलवान खाशाबा जाधव यांच्या जयंती निमित्ताने सम्यक संकल्प महाविद्यालय, कल्याण पूर्व येथे महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रणव देसाई अध्यक्ष मैत्री फाउंडेशन यांनी क्रीडा व युवक सेवा संचनालय या बाबत मार्गदर्शन केले. कल्याण शहरातील अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य व जिल्हा स्तरावर विविध क्षेत्रात खेळणाऱ्या – आदर्श मोर्या (योगा), शुभम कांबळे (कराटे), साहिल पगारे (हॅन्डबॉल), आनंका गायकवाड (स्विमिंग), आस्था नाईकर (स्केटिंग), स्वप्ना यादव (रब्बी), शनिल मनवाड (कराटे), जयेश गायकर (लांब उडी), सुशांत सोनवणे (आट्या पाट्या), दीपक माने (लंगडी), नेहा गायकवाड (कुस्ती), साक्षी मिश्रा (कबड्डी) 12 युवक आणि युवती खेळाडूंचा सन्मान चिंन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत कोळसेवडी वाहतुक शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे समिर सूर्यवंशी, लंगडी असोशीएशनचे प्रवीण खाडे, ग्लोबल कॉलेजच्या प्राचार्य सुप्रिया नाईकर, सम्यक संकल्प महाविद्यालयाचे प्राचार्य खान, मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष प्रणव देसाई, सचिव अतुल उपाध्याया, प्राध्यापक एनएसएस कार्यक्रम अधिकारी इंगळे, कोळसेवडी वाहतुक शाखेचे अधिकारी कर्मचारी, क्रीडा प्रशिक्षक राजेश मानवडे तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
