मुंबई :टी.एम.जी. क्रीयेशन्स आणि इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न झालेल्या अनूभुती महागौरव संमेलनात सौ. योगिनी शामकांत दुराफे यांना राज्यस्तरीय अनुभूती जनसेवा सन्मान पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली.
या कार्यक्रमाला गोवा, अमरावती, आणि भारताच्या विविध विभागातून अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. कर्नल रवींद्र त्रिपाठी . सचिव, फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी, हे होते. तसेच डॉ. शुभदा नील, स्रीरोग तज्ञ तथा संचालिका, नील मल्टी स्पेशालिटी रुग्णालय, नवीन पनवेल. माननीय डॉ. साधिका नवाब सहर, ज्येष्ठ साहित्यिक, आणि असोसिएट प्राध्यापक, हिंदी विभाग प्रमुख, तथा शोध निर्देशक मुंबई विश्व विद्यालय. अभंष कुमार, बॉलीवूड व टॉलीवूड अभिनेता तसेच लेखक, दिग्दर्शक सन्माननीय अल्ताफ दादासाहेब शेख, या मान्यवरांची प्रमुख उपस्थित होती. योगिनी दुराफे यांना कला व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग आणि समाजभिमुख कार्य करत असल्यामुळे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.