मुरबाड पोलिसांच्या तपासावर शंका
राजीव चंदने
मुरबाड : मुरबाड तालुक्यातील सरळगांव येथील आंबेडकर चळवळीतील अभ्यासू नामवंत वकील आणि ग्रुप ग्रामपंचायत सरळगावचे विद्यमान सदस्य ऍड प्रफुल रोकडे व त्यांचे भाऊ अक्षय रोकडे यांनी सरळगाव नाक्यावर म्हसा यात्रेकरीता येणा-या लोकांचे स्वागताचा पोस्टर लावत असताना तेथील गुंड प्रवृत्तीचे विष्णु सदाशिव घुडे, वैभव सदाशिव घुडे व अक्षय सदाशिव घुडे यांनी जातीयद्वेष भावनेतून जातीय वाचक शिवगाळ करत बेदम मारहाण केली.याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी अक्षय घुडे, विष्णू घुडे, वैभव घुडे व इतर ५ ते ६ आरोपीं विरोधात ॲट्रॉसिटी व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र राजकीय वरदहस्त असल्याने आरोपी अजूनही मोकाट आहेत. त्यामुळे मुरबाड पोलीस तपास यंत्रणेवर आंबेडकरी समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. मात्र नव्याने आलेले पोलीस निरीक्षक गिते यांनी आरोपी दोन दिवसात अटक करतो अशा वलग्ना केल्या, माझ्यावर विश्वास ठेवा मात्र त्यांच्या वलग्ना हवेतच विरल्या. त्यामुळे पोलीस देखील आरोपीना पाठीशी घालत आहेत हे उघड झालं आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आंबेडकर चळवळीतील नामवंत वकील व ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य ऍड प्रफुल रोकडे व त्यांचा भाऊ अक्षय रोकडे यांनी बाजारपेठेत म्हसा यात्रेतील भाविकांचे स्वागत करण्याचे बॅनर लावण्यासाठी तेथे आले. बॅनर लावत असताना आरोपी अक्षय घुडे यांनी यावर आमदार कथोरे यांचा फोटो आहे. त्यामुळे हा बॅनर लावू नये असा दम दिला. आणि तुमची लायकी नाही, म… समाजाच्या लोकांना बॅनर लावण्यासाठी ही जागा नाही. त्यावर संयम ठेवत ऍड रोकडे यांनी, आम्ही बॅनर बाजूला लावतो, असे सांगत असताना आरोपी विष्णू घुडे,यांनी धावत येत काहीही ऐकून न घेता अक्षय यास मारण्यास सुरवात केली. यावेळी ऍड रोकडे यांनी भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ऍड प्रफुल्ल रोकडे यांना देखील जातीय वाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केली, या मारहाणीत ऍड रोकडे व त्यांचा भाऊ गंभीर जखमी झाला. व मोठ्या प्रमाणात रक्तश्राव होत असल्याने तो खाली कोसळला. आरोपी विष्णू, वैभव, अक्षय त्यावरच न थांबता ऍड प्रफुल्ल व भाऊ अक्षय यांना फरफटत नेले. आणि ऍड प्रफुल्ल रोकडे यांचा गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला. कसे बसे त्यांच्या तावडीतून निसटून त्यांनी मुरबाड पोलीस स्टेशनं गाठले.
सदर घटना इतकी गंभीर असताना देखील, आणि पाच सहा दिवस उलटून गेले तरी मुरबाड पोलीस स्टेशनं चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीते यांनी कोणतेही ऍक्शन न घेता आरोपीना पाठीशी घातले आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, मी आरोपी अटक करतो, काळजी करू नका असे बोलणाऱ्या मुरबाड पी आय गिते यांच्या तपास यंत्रनेवर आंबेडकरी समाजाला संशय निर्माण झाला आहे.येत्या दोन दिवसात आरोपी अटक केले नाहीत तर पोलिसांच्या अपयशाच्या आणि निक्रियतेच्या विरोधात आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून आंदोलनच्या माध्यमातून पोलीस प्रशासना विरोधात संताप व्यक्त करत ऍड प्रफुल्ल रोकडे व भाऊ अक्षय रोकडे यांच्या हल्लेखोरांना अटक साठी मागणी करणार आहेत.
0000